Accident News : भीषण अपघात! ट्रॉली आणि पिकअपची जोरदार धडक; २ जणांचा जागीच मृत्यू

Uttar Pradesh Kanpur Accident News : कानपूरच्या किसान नगर-बिधनू मार्गावर ट्रॉली आणि पिकअपची समोरासमोर जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात दोन्ही चालकांचा जागीच मृत्यू झाला.
Uttar Pradesh Accident News
Uttar Pradesh Accident News Saam Tv
Published On: 
Summary
  • कानपूरच्या किसान नगर-बिधनू मार्गावर ट्रॉली आणि पिकअपची समोरासमोर धडक

  • या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू

  • पिकअपमधील कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर पडल्याने मोठ्या प्रमाणात काचा पसरल्या

  • अपघाताच्या कारणाचा पोलीस तपास सुरू आहे

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये भरधाव ट्रॉली आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. किसान नगर-बिधनू मार्गावरील सीढी इटारा परिसरात गुरुवारी झालेल्या या अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतले आणि पोस्टमार्टमसाठी पाठवले.

मिळालेल्या माहितीनुसार, किसान नगर-बिधनू मार्गावर सीढी इटारा येथील दारूच्या दुकानासमोर हा अपघात झाला. बिधनूकडून किसान नगरच्या दिशेने एक भरधाव वेगाने ट्रॉली जात होती. त्याचवेळी समोरून पिकअप वाहन येत होते. दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर त्यांच्यात जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

Uttar Pradesh Accident News
Egg Yolk : अंड्याचा पिवळा बलक खाल्ल्याने येऊ शकतो हार्ट अटॅक? नेमकं सत्य काय? जाणून घ्या

पिकअपमधून कोल्ड्रिंक्सच्या बाटल्यांची वाहतूक केली जात होती. अपघातानंतर पिकअपमधील कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या रस्त्यावर पडल्या आणि मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर सगळीकडे काचा पसरल्या. अचानक झालेल्या या अपघातामुळे मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्येही काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. या दुर्घटनेत ट्रॉली चालक आणि पिकअप चालकाचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दोन्ही मृतांची ओळख पटवली असून मृत ट्रॉली चालकाचे नाव नीरज कुमार असे आहे. तर पिकअप चालकाची ओळख कुलदीप कुमार (वय 40) अशी झाली आहे.

Uttar Pradesh Accident News
Accident News : मरीन ड्राइव्हवर भीषण अपघात! कारची ट्रेलरला जोरदार धडक; मंत्र्याच्या मुलीसह ४ जणांचा जागीच मृत्यू

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन त्यांच्या कुटुंबीयांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले. दरम्यान, अपघातामुळे किसान नगर-बिधनू मार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली. या प्रक्रियेदरम्यान सुमारे अर्धा तास वाहतुकीवर परिणाम झाला.अपघाताच्या कारणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com