बोगस दाखला सहर बेपत्ता; नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, Video

Sahar Shaikh news : MIMच्या सहर शेखनं महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आणि 'कैसा हराया' म्हणत विरोधकांना डिवचलं... मात्र, आता याच सहर शेख नॉट रिचेबल झालेत... त्यामुळे बोगस दाखल्यामुळे सहर शेख कशा अडचणीत येणार? आणि एमआयएमचं गणित कसं बिघडणार... पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...
Sahar Shaikh Mumbra AIMIM:
MIM corporator Sahar Shaikhsaam tv
Published On

कैसे हराया म्हणत विरोधकांना डिवचणाऱ्या एमआयएमच्या नगरसेविका सहर शेख आणि त्यांचे वडील युनूस शेख सध्या मोठ्या कायदेशीर कचाट्यात सापडलेत. 'बनावट जात प्रमाणपत्र' प्रकरणाचा ठपका ठेवण्यात आल्यानंतर सहर शेख गेल्या 24 तासांपासून 'नॉट रिचेबल' आहेत. मात्र, आता या वादात एक नवे वळण आले असून, त्यांचं नगरसेवक पद धोक्यात आलयं.

Sahar Shaikh Mumbra AIMIM:
Sahar Shaikh: कैसे बोगस दाखला बनाया? MIM च्या सहर शेखकडून दिशाभूल, नगरसेवकपद धोक्यात

सहर शेख यांचं नगरसेवकपद धोक्यात

बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची सहर शेख यांच्याविरोधात तक्रार

यूपीचे रहिवासी असूनही महाराष्ट्राचा ओबीसी दाखला मिळवल्याचा प्राथमिक आरोप

स्थलांतरितांसाठी नमुना 10 आवश्यक असताना नमुना 8 वापरून प्रशासनाची फसवणूकीचा आरोप

ठाणे तहसीलदारांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू; कागदपत्रांमधील अनेक त्रुटी उघड

फसवणूक सिद्ध झाल्यास सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होऊन गुन्हा दाखल होणार

दुसरीकडे हे सगळं निव्वळ राजकारणासाठी सुरु असून सहर शेखचं जात प्रमाणपत्र अधिकृत आहे... त्यामुळे नगरसेविका सहर शेख लवकरच माध्यमांसमोर स्पष्टीकरण देतील, असं विधान एमआयएमचे गटनेते सैफ पठाण यांनी केलयं...

Sahar Shaikh Mumbra AIMIM:
'कैसा हराया...! MIM ची नगरसेविका सहर शेख नॉट रिचेबल, वडिलांचाही पत्ता लागेना

दरम्यान ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जात पडताळणी विभागाकडून या प्रकरणाचा अहवाल लवकरच प्राप्त होणार आहे. जर जात पडताळणी समितीने युनूस शेख यांचे प्रमाणपत्र अवैध ठरवले, तर सहर शेख यांचे नगरसेवकपद धोक्यात येऊ शकतं. तसचं ठाणे महानगरपालिकेत सध्या MIM चे पाच नगरसेवक आहेत. जर सहर शेख यांचे पद रद्द झाले, तर ही संख्या चारवर येईल, जो पक्षासाठी मोठा धक्का मानला जातेय... त्यामुळेच आता सर्वांचे लक्ष समितीच्या अहवालाकडे आणि सहर शेख यांच्या भूमिकेकडे लागलयं..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com