कैसे बोगस प्रमाणपत्र बनाया..., सहर शेख यांचं नगरसेवकपद जाणार? बोगस प्रमाणपत्रावरून राजकारण तापलं

sahar shaikh news : एमआयएमच्या सहर शेखनं महापालिका निवडणुकीत विजय मिळवला आणि 'कैसा हराया' म्हणत विरोधकांना डिवचलं... मात्र, आता याच सहर शेख यांच्या अडचणीत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. नेमकं प्रकरण काय आहे? या स्पेशल रिपोर्टमधून...
Sahar Shaikh news
Sahar ShaikhSaam Tv
Published On

रोहित कदम, साम टीव्ही

राजकीय विरोधकांना आपल्या विधानानं डिवचणाऱ्या मुंब्र्यातील एमआयएम नगरसेविका सहर शेख पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत कारण ज्या विजयावरून त्या डिवतच होत्या तो त्यांचा विजयच मुळी खोट्या प्रमाणपत्रावर आधारित असल्याचं समोर आलंय ठाणे महापालिका निवडणुकीत मुंब्र्याच्या प्रभाग 30 मधून सहर शेख ठाणे महापालिकेवर निवडून आल्या. मात्र त्यांनी निवडणूक लढवताना तब्बल चार शासकीय यंत्रणांची दिशाभूल केल्याचा आरोप केला जातोय. सहर शेख यांच्यावर नेमका काय आरोप होतोय पाहूयात

एकीकडे मुंब्र्यातील राजकीय समीकरणं बदलत असताना दुसरीकडे सहर शेख कायदेशीर कचाट्यात अडकल्यात. एमआयएमचे नेते याची पाठराखण करत असले तरी नियमबाह्य पद्धतीने बोगस प्रमाणपत्र दाखल करून संबंधित यंत्रणांची दिशाभूल करणाऱ्या सहर शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागणार का? याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

सहर शेख यांचं नगरसेवकपद धोक्यात

बोगस जात प्रमाणपत्र सादर करून निवडणूक लढवल्याची सहर शेख यांच्याविरोधात तक्रार

यूपीचे रहिवासी असूनही महाराष्ट्राचा ओबीसी दाखला मिळवल्याचा प्राथमिक आरोप

स्थलांतरितांसाठी नमुना 10 आवश्यक असताना नमुना 8 वापरून प्रशासनाची फसवणूकीचा आरोप

ठाणे तहसीलदारांकडून प्रकरणाची सखोल चौकशी सुरू; कागदपत्रांमधील अनेक त्रुटी उघड

फसवणूक सिद्ध झाल्यास सहर शेख यांचं नगरसेवक पद रद्द होऊन गुन्हा दाखल होणार

Sahar Shaikh news
Maharashtra Live News Update: म्हाडाच्या घरासाठी 2188 अर्ज प्राप्त

या आरोपांनंतर राजकारण चांगलंच तापलंय. भाजपनं अशा लोकांची पार्श्वभूमी तपासली पाहिजे, असा आक्रमक पवित्रा घेतलाय. तर एमआयएमच्या नेत्यांनी मात्र त्यांची पाठराखण केलीय.

Sahar Shaikh news
Maharashtra News Live Update: अशोक खरात प्रकरणी तपास करत असलेल्या SIT ची तिसऱ्यांदा जागा बदलली

एकीकडे मुंब्र्यातील राजकीय समीकरणं बदलत असताना दुसरीकडे सहर शेख कायदेशीर कचाट्यात अडकल्यात. एमआयएमचे नेते याची पाठराखण करत असले तरी नियमबाह्य पद्धतीने बोगस प्रमाणपत्र दाखल करून संबंधित यंत्रणांची दिशाभूल करणाऱ्या सहर शेख यांच्या राजकीय कारकिर्दीला पूर्णविराम लागणार का? याकडं आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com