

म्हाडा मुंबई मंडळाच्या 2026 लॉटरीसाठी 2640 घरे उपलब्ध
सायं. 7 वाजेपर्यंत 2188 अर्ज प्राप्त
त्यापैकी 887 अर्जदारांनी EMD भरली
अंतिम मुदतीपूर्वी अर्जसंख्या वाढण्याची शक्यता
परवडणाऱ्या घरांसाठी नागरिकांची उत्सुकता कायम
बीडच्या परळी तालुक्यातील सिरसाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलीस कर्मचारी दत्तात्रेय निगुळ यांना 2000 च्या लाच घेतल्या प्रकरणी चौकशीसाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले असून या घटनेमुळे पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.
9 वरिष्ठ माओवाद्यांनी केले गडचिरोली पोलीस दल व सीआरपीएफसमोर आत्मसमर्पण
3 एसीएम पदावरील वरिष्ठ माओवाद्यांसह इतर 6 असे एकूण 9 माओवाद्यांनी केले आत्मसमर्पण
महाराष्ट्र शासनाने त्यांच्यावर एकत्रितपणे जाहीर केले होते एकूण 30 लाख रुपयांचे बक्षिस
आत्मसमर्पण करणारे सर्व नक्षली छत्तीसगड राज्यातील
अंधेरी (पूर्व) येथील इरा हॉटेलला अचानक टाळे लागल्याची बातमी समोर आली आहे. कामगारांना पूर्वसूचना नसल्याचाही आरोप यामध्ये करण्यात आला आहे.
भोंदू बाबा खरात याचे प्रकरण महाराष्ट्रभर गाजत असताना नांदेडच्या बिबोली तालुक्यातील बडूर या गाव परिसरात एक तलवार बाबा म्हणून उदयास आला.
मालवणी पोलिसांची अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई केली आहे. त्यामध्ये ३७ किलो गांजा जप्त केला. याची अंदाजे किंमत सुमारे १८.५० लाख इतकी असू शकते. या तीन आरोपींना अटक केली आहे.
महावीर जयंती निमित्ताने मावळच्या तळेगाव दाभाडे मध्ये जैन समाजाच्या वतीने शुभ रात्रीचे आयोजन करण्यात आले होते
या शोभायात्रा घोडे रथ यासह पारंपरिक पद्धतीने वाद्यही वाजवण्यात आले होते.
दरम्यान लहान मुलांचे सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आले.
विविध प्रकारच्या वेशभूषा करून लहान मुले शोभायात्रीत सहभागी झाल्यामुळे ते सर्वांचे लक्ष वेधत होते.
एकंदरीत मावळमध्ये महावीर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली
रायगडच्या पेण तालुक्यातील वढाव गावचे ग्रामदैवत बहीरीदेवाची यात्रा आज संपन्न झाली.
निवडूंग प्रजातीतील काटेरी झाड असलेले पेरकुट अंगावर मारण्याची अनोखी प्रथा येथे आहे.
या याञेसाठी मुंबई, ठाणे, पुणे, कोकणासह महाराष्ट्रातुन मोठ्या संख्येत भाविक या यात्रेसाठी वढाव गावात येतात.
काटेरी पेटकुट अंगावर मारून देखील भक्तांना काही होत नाही. रक्तबंबाळ अवस्थेत भाविक बेधुंद नाचतात, हि प्रथा पाहण्यासाठी हजारो नागरिक देखील येथे येतात.
उल्हासनगच्या मध्यवर्ती रुग्णालयातील सिटीस्कॅन सेंटर बंद
आठ ते दहा दिवसापासून सेंटर बंद असल्याने गोरगरीब रुग्णांचे हाल
मनसे पदाधिकाऱ्यांनी रुग्णालय प्रशासनाला विचारला जाब
पुणे जिल्ह्यासाठी येलो अलर्ट
पुढील ३ तासांत पुण्यासह अन्य जिल्ह्यात पावसाची शक्यता
अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे आणि सातारा येथील तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसासह हलक्या स्वरूपाच्या मेघगर्जनेसह वादळे होण्याची शक्यता
पुणे जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली माहिती
हिंगोलीच्या चुंचा परिसरात असलेल्या तलावात विष प्रयोग झाल्याने हजारो माशा मरून पडल्या आहेत.
या शिवारातील ग्रामस्थांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे
दरम्यान या तलावातील सर्वच माशा मृत झाल्याने आता मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे तर तलावातील पाणी जनावरांनी देखील पिल्याने पशुपालक शेतकरी संकटात सापडले आहेत
पोलीस प्रशासनाने तलावातील पाण्यात माशांवर विष प्रयोग करणाऱ्या अज्ञात आरोपीविरोधात कार्यवाही करून आता या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे
वसई विरार शहर महापालिकेचे नवे आयुक्त म्हणून पृथ्वीराज बी पी यांची नियुक्ती
आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी आज ३१ मार्च रोजी सेवानिवृत होत आहेत
प्रथ्वीराज बी पी हे २०१४ च्या बॅच चे आय पी एस अधिकारी असून ते पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत होते. त्यांनी लातूर जिल्हाधिकारी म्हणून ही काम पाहिले आहे
कोल्हापूर च्या कणेरी येथील श्री सिद्धगिरी संस्थान मठ आणि महाराष्ट्र शासन पर्यटन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आज पासून ४ एप्रिल पर्यंत 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
महोत्सवाचे उद्घाटन आज मंत्री चंद्रकांत दादा पाटील, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या हस्ते करण्यात आलं.
देशातील पारंपरिक हस्तकला आणि दुर्मीळ कलाप्रकारांना प्रोत्साहन देण्यासाठी मठाधिपती अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात आलाय.
पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील थोरांदळे गावात चोरट्यांनी वृद्धाचा खुन केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे
घटनेची माहिती मिळताच पुणे ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे
बीड जिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी सेंटर च्या गेटवर आणि गेटच्या आत मध्ये मोठ्या प्रमाणात उंदरांचा सुळसुळाट दिसून येत आहे.
अनेक उंदीर या परिसरात असल्याचे व्हिडिओमध्ये कैद झाले आहेत.
सोनोग्राफी सेंटरच्या बाजूलाच अपघात विभाग, प्रसुती कक्ष आहे.
यामुळे रूग्णांच्या जिवीताशी खेळ होतोय का ? असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.
सिंदगीजवळ भीषण रस्ते अपघात
आगीच्या ज्वाळांमध्ये दुचाकीस्वाराचा मृत्यू
बसलाही आग बस मधील प्रवासी थोडक्यात प्रवासी बचावले
कन्नोळी टोलगेटजवळ भीषण दुर्घटना
बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात काल सायंकाळी आलेल्या वादळी पावसामुळे पळशी झाशी या गावाच्या शिवारात मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसाने ४ ते ५ एकर क्षेत्रातील मका पिक अक्षरशः आडवी झाली आहे.
या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.
संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या आषाढी वारी पालखी सोहळ्याचे प्रस्थान ८ जुलै रोजी होणार आहे.
, यंदा पुण्यातील मुक्कामाच्या जागेवरून नवा वाद निर्माण झाला असून, यावर अंतिम निर्णय येत्या १३ एप्रिल रोजी घेतला जाणार आहे.
नाशिक जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून गारपीट व अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले आहे,काल नाशिकच्या बागलाण मध्ये गारपीट व पावसामुळे डाळिंब, द्राक्ष, कांदा, गहू या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी बागलाण तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या बांधावर जात झालेल्या नुकसानीची पाहणी करत शेतकऱ्यांना धीर दिला,तर तातडीने नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात, माजी मंत्री यशोमती ठाकूर, के. सी. पाडवी, आ. डॉ. विश्वजीत कदम, रणजित कांबळे, खा. प्रणिती शिंदे, खा. डॉ. कल्याण काळे, खा. डॉ. शोभा बच्छाव, खा. बळवंत वानखेडे, सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव सचिन सावंत वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे यांच्यासह नेते व पदाधिकारी उपस्थित
"सीसीटीव्ही फुटेज हे एक ओपन डॉक्युमेंट आहे.ते प्रशासनाने तात्काळ माध्यमांना उपलब्ध करून द्यावे" सातारा जिल्हा परिषदेत झालेल्या राडा प्रकरणानंतर राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणात अपहरणाचे आरोप असलेले जिल्हा परिषद अध्यक्ष अनिल देसाई यांनी आपली भूमिका स्पष्ट केली असून स्वतःला निर्दोष सिद्ध करण्यासाठी त्यांनी प्रशासनाकडे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करण्याची मागणी केली आहे. "प्रशासनाला हाताशी धरून लोकशाही मूल्यांची हत्या करण्याचे काम जिल्हा परिषदेच्या सभागृहात झाले असून पोलिसांनी आणि प्रशासनाने माझ्यावर केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत.
सुरुवातीला मला 'किडनॅपर' ठरवण्यात आले.त्यानंतर माझ्यावर 'खुनाचा प्रयत्न' केल्याचा आरोप झाला.
पुमा या नामांकित कंपनीचे बनावट शूज आणि, चपल काही दिवसापूर्वी पिंपरी चिंचवड शहरातील विकी फुटवेअर य दुकानात विक्री करण्यात येत असल्याने त्या दुकानावर पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने कारवाई केली होती. त्यानंतर काल पुन्हा एकदा पिंपरी चिंचवड शहर पोलिसांच्या गुन्हे शाखा क्रमांक एक पोलीस पथकाने पिंपरी मार्केटमधील लेजेंड्स चॉईस या दुकानावर कारवाई करून जवळपास आठ लाख 6,184 चे उमा कंपनीचे टी-शर्ट आणि ट्रॅक पॅन्ट जप केले आहेत. पुमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या तक्रारी वरून पोलिसांनी लेजंड चॉईस या दुकानावर कारवाई केली आहे. या प्रकरणात पिंपरी पोलिसांनी इस्माईल इस्तीखर खान वय 31 वर्षे याच्या विरोधात पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता आणि कॉपीराईट कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.
नांदेडमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. नांदेड शहरातील महावीर चौक येथील भगवान महावीर स्तंभाला अभिवादन करण्यात आले. भगवान महावीर स्तंभाला अभिवादन केल्या नंतर नांदेड शहरातून शोभा यात्रा काढण्यात आली. या शोभा यात्रेत भगवान महावीर यांचे अनुयायी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
दोन दिवसापासून शहरातील सगळे ऑटो एलपीजी पंप बंद, संपूर्ण शहरात एकच पंप सुरू आहे. छत्रपती संभाजीनगरच्या सावंगी परिसरात सुरू असलेल्या गॅस पंपावर रिक्षा चालकांची मोठी गर्दी आहे. ऑटो एलपीजी गॅस मिळत असल्याने काल रिक्षा चालकांनी संप केला होता.
जळगाव शहरातील पाचही एलपीजी गॅस पंप बंद असल्याने एलपीजी गॅसवर असलेल्या रिक्षाचालकांनी आपला मोर्चा आता ग्रामीण भागातील एलपीजी गॅस पंपाकडे वळवला आहे. जळगाव शहरापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर गॅस भरण्यासाठी जावं लागत असल्याने ऑटो रिक्षा चालकांना आर्थिक गुरुदंड देखील सहन करावा लागत असून दुसरीकडे एलपीजी गॅसच्या दरातही मोठी वाढ झाली आहे.
बीड तालुक्यातील कुमशी गावात दोन दिवसांपूर्वी दोन गटात राडा झाला होता. लाकडी दांडक्याने सरपंचाच्या गटाने मारहाण केल्याचा आरोप झाला होता. मात्र महिला सरपंचाच्या घरासमोर राडा केला, अश्लील शिवीगाळ केली आणि राजकीय द्वेषातुन दगडफेक झाली असा आरोप सरपंच गटाकडून केला जात आहे. याचे काही व्हिडिओ देखील समोर आले आहेत. मात्र या प्रकरणात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
अमरावतीच्या मेळघाट मध्ये पुन्हा एकदा मजुरांना घेऊन जाणाऱ्या पिकप वाहनाला अपघात.
धारणी तालुक्यातील लवादा जवळच्या अलई नदीवरील पुलावरून अनियंत्रीत होऊन पिकपल गाडी नदीत कोसळली.
अपघातात दोन मजुरांचा मृत्यू तर पाच जखमी मजुरांवर धारणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू.
काही ठिकाणी ऑरेंज अलर्ट,तर काही ठिकाणी येलो अलर्ट देण्यात आलाय. मराठवाडा मध्य महाराष्ट्र विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस होणार. नंदुरबार,धुळे,ठाणे,रायगड,रत्नागिरी, सिंधुदुर्ग,कोल्हापूर,धाराशिव,लातूर नांदेड,यवतमाळ,अमरावती,वर्धा,नागपूर चंद्रपूर,भंडारा,गडचिरोली,गोंदिया या जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता. पुण्याचा राज्यभरात काल मुसळधार पाऊस गारपीट तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला आहे त्यामुळे आता पुढील पाच दिवस ही पावसाचे असणार आहेत.
राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू 16 एप्रिल रोजी वर्धा जिल्ह्याच्या दौऱ्यावर
महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय विश्व हिंदी विद्यालय येथे दीक्षांत समारंभानिमित्त राष्ट्रपतींची उपस्थिती
विद्यापीठाच्या सहाव्या दीक्षांत समारंभाचे आयोजन
रवींद्रनाथ टागोर कल्चरल कॉम्प्लेक्स येथे होणार मुख्य कार्यक्रम
विद्यार्थ्यांसाठी विशेष आणि ऐतिहासिक क्षण ठरणार सोहळा
राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी विद्यापीठ प्रशासनाची जय्यत तयारी
सुरक्षा आणि आयोजनासाठी प्रशासनाकडून विशेष व्यवस्था
नंदुरबार तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या गारपिटीमुळे शनिमांडळ, तलवाडे, तिलाली ,इंदर हट्टी या गावातल्या परिसरात शेती पिकाचे मोठे नुकसान झाल्याचे चित्र आहे. या गारपिटीमुळे परिसरातील कांदा पिकाचे मोठे नुकसान झालं असून, ऐन तोडणीला आलेले कांदा हातातून गेलाचा चित्र दिसून येत आहे. या परिसरातील मका भुईमूग आणि कांदा पिकाची मोठी लागवड होते अशातच अर्धा तास झालेल्या गारपिटीने शेतकऱ्याचा अक्षर कंबर्ड मोडल आहे
बुलढाणा जिल्ह्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीपिकांचे मोठे नुकसान केले आहे. संग्रामपूर तालुक्यातील बावणबीर, सोनाळा व तुनकी शिवारात कांदा, गहू, मका आणि ज्वारी या प्रमुख पिकांना मोठा फटका बसला आहे.
मेळघाट परिसरात अवकाळी मुसळधार पावसाने हजेरी लावली.
या पावसामुळे सुमारे दीडशे क्विंटल मका पूर्णपणे भिजला.
अवकाळी पावसाचा सर्वाधिक फटका चिखलदरा तालुक्याला बसला.
चिखलदरा तालुक्यातील काही भागात गारपिटही झाली.
गंगारखेड, कोटमी, कोरडा, हिरडा, जरीदा, चूरणी, मोहरियाम, कामीदा, भंडोरा आणि काटकुंभ परिसरातील जनजीवन विस्कळीत झाले.
आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्रावर मोजमाप न झाल्याने तीन दिवसांपासून मका पडून होता, त्यामुळे पावसात तो भिजला.
कोणतीही संरक्षणात्मक उपाययोजना नसल्याने नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी नुकसानभरपाईची मागणी केली आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक प्रशासनाचा मोठा निर्णय
संभाव्य गर्दी लक्षात घेता गोदावरी नदीकाठी १२ नवीन घाट उभारणार
नाशिकमध्ये १० तर त्र्यंबकेश्वरमध्ये २ नवीन घाटांची निर्मिती
शहरातील घाटांची संख्या १० वरून २० पर्यंत वाढणार
नाशिकमधील घाटांसाठी तब्बल ३६१.२६ कोटी खर्च अपेक्षित
त्र्यंबकेश्वरमधील घाटांसाठी १४६.१० कोटींचा खर्च
जलसंपदा विभागामार्फत प्रकल्प राबवण्यात येणार
भाविकांच्या सुविधांसाठी मोठ्या प्रमाणावर पायाभूत सुविधांची उभारणी
पुणे सोलापूर अहिल्यानगर धाराशिव जिल्ह्याला जीवनदायीननी ठरलेल्या उजनी धरणातील पाणीसाठा सपाट्याने कमी होतोय. मार्च अखेरीस उजनी धरणात एकूण पाणी साठवण क्षमतेच्या 88 टीएमसी इतका पाणीसाठा आहे. उजनी धरणाच्या 117 टीएमसी क्षमतेपैकी 63 टीएमसी पाणीसाठा हा मृत पाणीसाठा म्हणून गणला जातो तर उर्वरित 54 टीएमसी पाणीसाठा हा जिवंत पाणीसाठा म्हणून गणला जातो.सध्या उजनी धरण 45 टक्क्यांवर असून या उपलब्ध पाणीसाठ्यावर एप्रिल आणि मे महिन्यातील भीषण उन्हाळ्याचा सामना करायचा आहे.
नंदुरबार तालुक्यातील शनिमांडळ परिसरात वादळी वारा आणि गारपटीमुळे कांदा बीज पिकांचे प्रचंड नुकसान....
शेतकरी संजय राजपूत यांनी लावलेल्या दोन एकर कांदा रोपाचे नुकसान....
कांद्याचे रोप तयार करण्यासाठी लावलेल्या पिकाला वादळी वाऱ्याचा फटका....
गारपिटीमुळे कांदा बीज पिकाचे तब्बल 10 ते 12 लाख रुपयांचे नुकसान....
नुकसानग्रस्त शेती पिकांचे पंचनामे होत नसल्याची नाराजी....
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा शेतकऱ्याला थेट इशारा...
नुकसान भरपाई न मिळाल्यास आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची उरणार नाही....
जालना जिल्ह्यात अवकाळी पावसाचा रब्बी पिकांसह आंबा बागांना फटका बसलाय.काल सायंकाळी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे जामवाडी शिवारातील आंबा बागेत मोठ्या प्रमाणात फळगळ झाली आहे. जामवाडी येथील शेतकरी विजय वाढेकर यांचा विक्रीला आलेल्या आंबा पिकाचे अवकाळी पावसामुळे अतोनात नुकसान झाल्याने या शेतकऱ्याला लाखों रुपयांचा आर्थिक फटका बसला आहे. सरकारने फळबागातदारांना मदत करावी अशी मागणी शेतकरी करत आहे.
वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसाने विजेची तार तुटून 9 गायींचा दुर्दैवी मृत्यू...
राहाता तालुक्यातील पाथरे गावातील घटना...
काल संध्याकाळी जोरदार वादळी पाऊस...
पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान...
संजय घोलप यांच्या गोठ्यातील नऊ गायींचा दुर्दैवी मृत्यू....
भोंदू अशोक खरात प्रकरणाला धक्कादायक वळण
नाशिकमधील काही नामांकित डॉक्टर तपास यंत्रणांच्या रडारवर, विश्वसनीय सूत्रांची माहिती
महिलांना गर्भधारणा होऊ नये म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने अशोक खरात काही गोळ्या औषध देत होता का ? व्यक्त केला जातोय संशय
महिलांना संमोहित करण्यासाठी काही मेडिसीनचा वापर केला जात होता का ? हा देखील प्रश्न उपस्थित
SIT च्या तपासात आणखी काही गंभीर बाबी समोर येण्याची शक्यता
चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक झालेल्या पावसामुळे भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना आता बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा फटका अधिकच तीव्र झालाय. बाजार समितीत आवश्यक सुविधा आणि पावसापासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याने कांद्याच्या ढिगांवर थेट पावसाचं पाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं.
2024 च्या विधानसभा निवडणुकीत जालना विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांच्या निवडीस आव्हान देणारी कैलास गोरंट्याल यांची निवडणूक याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली आहे. विधानसभा निवडणुकीमध्ये अर्जुन खोतकर 1 लाख 4 हजार मते मिळवून विजय झाले होते या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी कैलास गोरंट्याल यांचा 31 हजार मतांनी पराभव केला होत. आमदार अर्जुन खोतकर हे बाजार समितीत प्रशासक पदावर असून त्यांनी लाभाचे पद धारण केले आहे शिवाय त्यांनी उमेदवारी अर्जासोबत दिलेले शपथपत्र विहित नमुन्यात नव्हते असा आक्षेप घेत माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी त्यांच्या निवडीला आक्षेप घेत उच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं मात्र सुनावणीनंतर गोरंट्याल यांचे आव्हान उच्च न्यायालयाने फेटाळून लावले आहे. त्यामुळे शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांना न्यायालयाने दिलासा दिला आहे..
हवामान खात्याने पश्चिम विदर्भात 29 मार्च ते दोन एप्रिल पर्यंत वादळी वाऱ्यांसह अवकाळी पावसाचा इशारादिला होता त्यानुसार काल बुलढाणा जिल्ह्यातील चिखली,मोताळा, खामगाव, नांदुरा, संग्रामपूर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस बरसला यामुळे शेतात रब्बीची पिके काढण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली काढून ठेवलेला कांदा भिजला तर वादळी वाऱ्यामुळे केळी गहू व ज्वारी पिकांचे मोठं नुकसान झालं आहे. सध्या रब्बीची पिके काढणीचा हंगाम सुरू आहे व त्यातच अवकाळी पावसाने दिलेल्या दणक्याने शेतकरी पुरता मेटाकुटीला आलेला आहे सतत होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा दर्जाही खालावत आहे. तर बाजारपेठेत पिकांना भाव मिळत नसल्याने शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे....
पुण्याच्या भोर तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे भोर शहरातील मशालीचा माळ परिसरात एका घराचे पत्रे उडून गेल्याची घटना घडली. वाऱ्याच्या वेगामुळे घरावरील पत्रे उडून थेट रस्त्यावर पडली. सुदैवाने त्यावेळी रस्त्यावर कोणीही नसल्याने कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. ही संपूर्ण घटना एका व्यक्तीच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
खामगाव परिसरात अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करताना तहसीलदार सुनील पाटील यांनी धाडसी कारवाई करत टिप्पर वाहन जप्त केले. नांदुरा रोडवरील पारखेड परिसरातून अवैध रेती वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी स्वतः पाठलाग करून MH-28 BB-7314 क्रमांकाचे टिप्पर वाहन अडवले. यावेळी चालकाने वाहन न थांबवता पळ काढण्याचा प्रयत्न करत तहसीलदारांच्या अंगावर वाहन घालण्याचाही प्रयत्न केला. अखेर टिप्पर वाहन ताब्यात घेण्यात आले असून चालकाविरुद्ध ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे...
हत्ती पहायचा, हत्तीवर बसायचं आणि हत्तीवरुन जंगलाची सफारी करायची कोणाला हौस सगळ्यांना असते. मात्र हत्तीवर बसण्याचं स्वप्न अपूर्ण असेल त्यांच्यासाठी अमरावती जिल्ह्यात मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात येणारं कोलकास हे एकमेव हत्ती सफारीचं ठिकाण आहे. हत्तीवर बसून हलत-डुलत जंगल पाहण्याचा आगळावेगळा आनंद घेण्यासाठी मेळघाटातील कोलकास हे ठिकाण पर्यटकांचं खास पसंतीचं आहे.
कोलकास इथं सकाळी नऊ ते बारा आणि दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजतापर्यंत एका हत्तीवर चार जणांना सफारीसाठी नेले जाते. अर्धा तासाच्या या जंगल सफारी दरम्यान घनदाट जंगलातून हत्ती सफारीचा आनंद पर्यटक घेतात. आता उन्हाळ्यात पानगळ झाल्यामुळं हत्ती सफारीचा आगळावेगळा फील येतो. जंगल ओसाड असल्यामुळं चितळ, रानगवे आणि नशीब बलवत्तर असेल तर वाघाचं दर्शन देखील या हत्ती सफारीदरम्यान पर्यटकांना घडते.
चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला कांदा अचानक झालेल्या पावसामुळे भिजून खराब झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. आधीच कांद्याला समाधानकारक भाव मिळत नसताना आता बाजार समितीच्या गलथान कारभारामुळे हा फटका अधिकच तीव्र झालाय.बाजार समितीत आवश्यक सुविधा आणि पावसापासून संरक्षणाची योग्य व्यवस्था नसल्याने कांद्याच्या ढिगांवर थेट पावसाचं पाणी पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. त्यामुळे शेतकऱ्यांचा माल अक्षरशः वाया गेला असून त्यांच्या आर्थिक कंबरड्याला मोठा तडा गेलाय.एकीकडे उत्पादन खर्च वाढलेला आणि दुसरीकडे बाजारभाव घसरलेले असताना अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झालंय
खामगाव तालुक्यातील सुटाळा बुद्रुक येथे भगवान शिव व माता पार्वती यांचा विवाह सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला. शास्त्रोक्त विधी, मंत्रोच्चार आणि “हर हर महादेव”च्या जयघोषात सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर महादेव संस्थान परिसरात भव्य यात्रेला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसर आकर्षक रोषणाईने सजविण्यात आला असून विविध दुकाने, पाळणे व खाद्यपदार्थांच्या स्टॉल्समुळे यात्रेला रंगत आली आहे. गावातील लेकी-सुना माहेरी येत असल्याने सामाजिक एकोपा व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे....
वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे गहू, ज्वारी, आंबा, मका,काढून ठेवलेली हळद यासह इतर शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान.
- नागपुरात गो-गॅस एलपीजी पंप बंद पडले असून आज चौथा दिवस आहे...एलपीजी इंधन वाहन धारक मोठा मनस्ताप, शिवाय आर्थिक फटका गी बसत आहे...
- इराण-इस्रायल तणावाचा परिणाम, इंधन पुरवठ्यावर जागतिक संकटाचे सावट
युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस मिळत नसल्याने चाकण औद्योगिक क्षेत्रातील कामगार स्थलांतरित होतोय तर दुस-या बाजूला आवकाळी पाऊस गारपिठ यामुळे शेतमालाचे नुकसान झालंय अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडलाय असून कष्टाने पिकवलेला शेतमाल चाकण बाजारात फुकट आणि कवडीमोल भावाने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली
यवतमाळ जिल्ह्यात रात्री दरम्यान अवकाळी पावसामुळे अक्षरशः काढणीला आलेला पीक भिजल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं,अचानक आलेल्या वादळ वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली असून अस्मानी संकटामुळे काढणीला आलेला गहू या पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने शेतकरी पुन्हा एकदा मोठ्या आर्थिक सापडलाय नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत बातचीत केली
कराडवाडी येथील सोनाली अजित कराडे २९ वर्षीय महिलेचा मृत्यू! शेतामध्ये शेळ्या चारत असताना ही दुर्घटना घडल्याचं समोर आलं.. पावसामुळे जीवितहानीसह शेती व जनावरांचे मोठे नुकसान…
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर दुहेरी संकट कोसळलं असून पिकांचे आणि जनावरांचे मोठे नुकसान
भंडारा जिल्ह्यातील मध्यरात्री काही भागात हलक्या तर, कुठं मध्यम स्वरूपाच्या अवकाळी पावसान हजेरी लावली. जोरदार वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसानं शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. वादळ सुटल्यानं काही भागातील वीज पुरवठा खंडित झाला होता. या पावसाचा उन्हाळी भारपिकाला फायदा होणार असला तरी, कापणीला आलेल्या पिकांना याचा काही प्रमाणात फटका बसण्याची चिंता शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे.
पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटसह पावसाची शक्यता आहे
चार दिवस पुणे शहराला येलो अलर्ट देण्यात आला आहे
शहर आणि परिसरात कमाल तापमान ३५ अंश सेल्सियस इतके नोंदवण्यात आल आहे
पुढील चार दिवस मात्र पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे
- या संदर्भात सीताबर्डी पोलिसांना 8 एप्रिलपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे कोर्टाचे निर्देश..
- नागपूर येथे आयोजित हिंदू संमेलनात ज्येष्ठ पत्रकार पुष्पेन्द्र कुलश्रेष्ठ यांनी राष्ट्रपित्याने पंडित लक्ष्मीचार्य यांच्या ईश्वर तेरो नाम या गाण्याची चोरी केली. त्यामुळे ते राष्ट्रपिता होऊ शकत नाही असे वादग्रस्त वक्तव्य केले होते..
- राष्ट्रपित्याविषयी अवमानजनक आणि निंदनीय वक्तव्य केल्यामुळे कुलश्रेष्ठ आणि संमेलन संयोजक निशांत गांधी यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला जावा याकरिता नागपूर ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष अश्विन बैस यांनी याचिका दाखल केली आहे..
बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद नगरपरिषदेची विशेष सर्वसाधारण सभा काल पार पडली. या सभेत शहरातील प्रलंबित विकास कामे आणि शहरातील स्वच्छतेच्या व्यवस्थेवरून मोठा गदारोळ बघायला मिळाला. समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष व नगरसेवक सभापती सय्यद नफीस यांनी शहरातील स्वच्छतेच्या बाबतीत सफाई कंत्राटदार अत्यंत हलगर्जीपणा करत असून, शहरात मोठे मोठे कचऱ्याचे ढीग बघायला मिळत आहेत. आठ ते दहा दिवस कचरा उचलला जात नाही. नाल्यांची सफाई वेळेवर होत नाही. मग या सफाई कंत्राटदारावर मेहरबानी कशासाठी...? असा सवाल उपस्थित करत चक्क सभागृहाच्या वेलमध्ये जाऊन जमिनीवर बसून प्रशासनाचा निषेध नोंदवला. यामुळे मात्र सत्ताधाऱ्यांची चांगलीच भांबेरी उडाली.
पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलू नये यासाठी महाआरती
भवानी पेठेतील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे ठिकाण बदलण्याचा निर्णय घेत असल्याचे समजले. हा निर्णय आपल्या परंपरेवर आपल्याला भागावर आणि विठ्ठल भक्तांवर अन्याय करणारा आहे.
सीआरपीएफ मध्ये गांधीनगर, गुजरात येथे काम करत असलेला तळेगाव दाभाडे येथील रहिवासी असलेला जवान प्रशांत कदम हा २५ मार्च रोजी घरातून ड्युटीवर जातो असे सांगून बाहेर पडला. त्यानंतर लोणावळा येथून पुन्हा तो तळेगाव च्या दिशेने कोणाला काही न सांगता आला. फोन देखील बंद ठेवला. २५ मार्च रोजी रात्री सोमाटणे फाटा जवळ हॉटेल अंगण समोर रस्ता क्रॉस करताना त्याला एका अनोळखी गाडीने जोरदार धडक दिली या अपघातात तो गंभीर जखमी झाला. गंभीर जखमी अवस्थेत त्याला पिंपरी चिंचवड येथील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात रुग्णवाहिकेतून घेऊन जात असताना त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. याबाबत तळेगाव पोलीस ठाण्यात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह मिळाल्याची नोंद करण्यात आली
दक्षिण सोलापूर तालुक्यात अवकाळी पावसाची जोरदार हजेरी
अवकाळी पावसासोबत सुरु असणाऱ्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंद्रूप गावातील डीपीला लागली आग
मंद्रूप गावातील डीपी जळाल्यामुळे रात्रभर वीजपुरवठा होता खंडित
त्यामुळे मंद्रूप गावातील गावाकऱ्यांना रात्र काढावी लागली अंधारात..
मावळ तालुक्यातील शासकीय यंत्रणेच्या ढिसाळ कारभारावर आमदार सुनिल शेळके यांनी संताप व्यक्त करत विविध विभागांच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक वडगाव येथे घेण्यात आली होती. या बैठकीत महसूल विभाग, महावितरण, आरोग्य, शिक्षण तसेच इतर विभागातील अधिकारी उपस्थित होते.
बैठकीदरम्यान आमदार शेळके यांनी विभागनिहाय कामकाजाचा आढावा घेत असताना अनेक त्रुटीं निदर्शनास आल्या. दरम्यान नागरिकांच्या तक्रारींना योग्य प्रतिसाद दिला जात नसल्याबद्दल त्यांनी अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. तसेच, कामात होत असलेली दिरंगाई आणि निष्काळजीपणा सहन केला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी त्यांनी सर्व विभागांनी समन्वयाने काम करून नागरिकांना तत्पर आणि पारदर्शक सेवा द्यावी, असे निर्देश दिले. कामात सुधारणा न झाल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही आमदार शेळके यांनी दिला...
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.