Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?

Pune MHADA Lottery 2026: पुण्यामध्ये म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी निघाली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी १ महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला.
Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?
Pune MHADA LotterySaam Tv
Published On
  • पुणे म्हाडाच्या ४४६२ घरांसाठी लॉटरी

  • पुणे म्हाडा लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी एक महिन्याची मुदतवाढ

  • आता १५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार अर्ज

  • म्हाडाच्या ४४६२ घरांसाठी ऑनलाइन करा अर्ज

  • १३ लाखांपासून पुणे म्हाडाची घरे मिळणार

पुण्यामध्ये हक्काचे घर असावे यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेकांचे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात त्यांना हक्काचे घर घेता येणार आहे. पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ म्हणजे म्हाडातर्फे काही दिवसांपूर्वी तब्बल ४,४६२ घरांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली होती. या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या लॉटरीसाठी अर्ज करू न शकलेल्या अनेक नागरिकांसाठी अर्ज भरण्याची मुदत वाढ एक महिन्यांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता नागरिकांना १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. मुदतवाढ देण्यात आल्यामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे या लॉटरीसाठी आता १५ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याची सुवर्णसंधी आहे.

पुण्यातील म्हाडाच्या लॉटरीसाठी नागरिकांकडून खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. पण तांत्रिक अडचणींमुळे अर्ज भरण्यात अडथळे येत आहेत. हेच लक्षात घेता म्हाडाने अर्ज करण्यासाठी मुदत वाढ दिली आहे. १५ सप्टेंबर ही अर्ज करण्याची शेवटची तारीख होती. पण आता म्हाडाने अर्ज करण्यासाठी १ महिन्याची म्हणजे १५ ऑक्टोबरपर्यंतची मुदतवाढ दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे पुण्यातील म्हाडाच्या या घराच्या किंमती १३ लाखांपासून सुरु होत असल्याची माहिती आहे.

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?
MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?

म्हाडाच्या पुणे विभागांतर्गत १५ टक्के सामाजिक आणि २० टक्के सर्वसमावेशक योजनेतील ४४६२ घरांसाठी लॉटरी निघाली आहे. या लॉटरीसाठी २४ ऑगस्ट रोजी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. या लॉटरीसाठी अर्ज करण्याची आधीची अंतिम मुदत १५ सप्टेंबर होती. पण आता या मुदतीमध्ये १५ ऑक्टोबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे या लॉटरीसाठी अर्ज करण्यासाठी बराच वेळ आहे. ज्यांना आतापर्यंत अर्ज करता आले नाहीत ते आता महिनाभरात कधीही अर्ज करू शकतात.

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?
MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?

म्हाडाने या लॉटरीसाठी मुदत वाढवण्याचे ठरवले यामागचे कारण म्हणजे अनेक अर्जदारांना ऑनलाईन अर्ज करताना तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागला होता. म्हाडाच्या घरांसाठी अर्ज केलेल्या नागरिकांनी अर्ज करताना अपलोड कलेले डोमिसाइल सर्टिफिकेट आणि उत्पन्नाच्या दाखल्याची महाआयटीकडून तपासणी केली जाते. आयकर विविरणाची प्राप्तिकर विभागाकडून ऑनलाइन पडताळणी करण्याच्या प्रक्रियेसाठी बराच वेळ लागत असल्याने अर्जदारांना अडचणी येत होत्या. अर्जदारांना येणाऱ्या या सर्व अडचणी लक्षात घेता म्हाडाने एक महिन्याची मुदतवाढ करण्याचा निर्णय घेतला.

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?
पुण्यात अवघ्या १३ लाखांत हक्काचं घर, म्हाडाचा ४४६२ फ्लॅटचा धमाका, लोकेशनची नावं समोर, वाचा A टू Z माहिती

पुण्यातील म्हाडाच्या या लॉटरीमध्ये एकूण ४४६२ सदनिका आहेत. यामध्ये पुणे महानगरपालिका हद्दीतील १४६८ सदनिका, पिंपरी-चिंचवड क्षेत्रातील १४०६ सदनिका आणि पीएमआरडीए (PMRDA) हद्दीतील १५८८ सदनिकांचा समावेश आहे. EWS गटातील कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न ६ लाखांपर्यंत असणं आवश्यक आहे. LIG गटासाठी ९ लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा पुरावा १ ऑगस्ट २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीशी संबंधित असावा असे सांगितले जात आहे.

Pune MHADA Lottery: गुड न्यूज! पुण्यात म्हाडाच्या ४,४६२ घरांसाठी लॉटरी, अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; शेवटची तारीख काय?
MHADA Lottery : ठाणे, कल्याणमध्ये फक्त २० लाखांत घर, दिवाळीआधी म्हाडाची १००० घरांची लॉटरी निघणार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com