MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?

MHADAMumbai Lottery: म्हाडाच्या २६४० घरांची लॉटरी कधी निघणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. तर त्यांची ही प्रतीक्षा आता संपवणार आहे. या आठवड्यात लॉटरी लागण्याची शक्यता आहे.
MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?
MHADAMumbai Lottery saam tv
Published On
  • मुंबईतील म्हाडाच्या २,६४० घरांच्या लॉटरी लवकरच

  • म्हाडाकडून या आठवड्यात तारीख केली जाणार जाहीर

  • गोरेगाव, ताडदेव, मानखुर्द, चेंबूर, वांद्रे, पवईसह अनेक प्राईम लोकेशनवर असणार घरं

  • लॉटरीसाठी ७५ हजारांहून अधिक अर्ज आले आहेत

मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण अनेकांचे घराचे स्वप्न खरं होणार आहे. मुंबईतील प्राईम लोकेशनवर त्यांना घरं घेता येणार आहे. म्हाडाच्या मुंबईतील २६४० घरांची लॉटरी ही या आठवड्यात निघणार आहे. या लॉटरीची सर्वजण गेल्या अनेक महिन्यांपासून प्रतीक्षा करत आहेत. पण अद्याप तारीख जाहीर करण्यात आली नाही. आता या आठवड्यात केव्हाही या लॉटरीची तारीख जाहीर केली जाईल.

मिळालेल्या माहितीनुसार, म्हाडाकडून या आठवड्यामध्ये २,६४० घरांच्या लॉटरीची तारीख जाहीर करण्यात येणार आहे. म्हाडाकडून ३० मार्च रोजी या घरांची लॉटरी जाहीर करण्यात आली होती. सुरूवातीला १५ मे आणि नंतर ५ जूनला ही लॉटरी निघणार असल्याचे सांगण्यात आले होते. पण या घरांच्या किमती आणि आचारसंहितामुले लॉटरीला मुदतवाढ देण्यात आली होती. आता ही तारीख कधी जाहीर केली जाईल याची सर्वजण वाट पाहत आहेत. अशामध्ये आता याच आठवड्यात या लॉटरीची तारीख जाहीर केली जाईल असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?
Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

म्हाडाच्या २६४० घरांची लॉटरी निघाली आहे. ही घरं मुंबईतील गोरेगाव, मानखुर्द, ताडदेव, विक्रोळी, बोरीवली, चेंबूर, वांद्रे, घाटकोपर, गिरगाव, वडाळा, पवई, माझगाव, दादर आणि अँटॉप हिल या प्राईम लोकेशनवर असणार आहेत. या लॉटरीमध्ये अत्यल्प उत्पन्न गटासाठी १४५ घरं, अल्प उत्पन्न गटासाठी १८५ घरं, मध्यम उत्पन्न गटासाठी ७९८ घरं आणि उच्च उत्पन्न गटासाठी ८३९ घरं असणार आहेत.

MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?
MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

महत्वाचे म्हणजे, २६४० घरांच्या लॉटरीसाठी ७५,३६६ अर्ज आले आहेत. याचाच अर्थ असा की, एका घरासाठी २८ ते २९ जणांनी अर्ज केला आहे. त्यामुळे या लॉटरीमध्ये काहीचं घराचं स्वप्न पूर्ण होईल तर अनेकांचे घराचे स्वप्न अपूर्ण राहिल. या लॉटरीमध्ये सर्वाधिक गोरेगावमधील पंतप्रधान आवास योजनेतील घरांना पसंती मिळत आहे. गोरेगावमधील १३ घरांसाठी १७,७५५ अऱ्ज आले आहेत. या ठिकाणच्या एका घराची किंमत ३२ लाख ३६ हजार रुपये इतके आहे. या ठिकाणच्या एका घरासाठी १३६५ जणांमध्ये स्पर्धा आहे.

MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?
MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज

म्हाडाच्या या लॉटरीमध्ये सर्वात महागडे घर ताडदेवमध्ये आहेत. ताडदेवच्या क्रिसेंट टॉवरमध्ये ६ कोटी ८२ लाख रुपयांचे घर आहे. याठिकाणी फक्त २ घरांसाठी २१ अर्ज आले आहेत. याठिकाणी सर्वात स्वस्त घरं ही मानखुर्द येथे आहेत. या घरांची किंमत २९ लाख ३७ हजार रुपये इतकी आहे. याठिकाणी ४ घरं आहेत. या घरांसाठी ४८ अर्ज आले आहेत.

MHADA Lottery: मुंबईत हक्काच्या घराचं स्वप्न होणार पूर्ण, २६४० घरांची लॉटरी, कुठे असणार किती घरं?
MHADA Lottery : खुशखबर! म्हाडाच्या ५००० घरांची लॉटरी लवकरच, तारीख आली समोर; कुठे किती घरं असणार?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com