MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज

Mumbai Mhada Lottery: म्हाडा लॉटरीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. म्हाडाच्या सोडतीला विलंब झाला त्यामुळे ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले आहेत.
MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज
Mhada LotterySaam Tv
Published On
  • म्हाडाच्या २,६४० घरांच्या सोडतीला अनिश्चित विलंब

  • ७५,९२७ अर्जदारांचे सुमारे ३७५ कोटी रुपये अडकले

  • अनेक अर्जदारांनी कर्ज, FD आणि क्रेडिट कार्ड वापरून EMD भरला

  • जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोडत होण्याची शक्यता

संजय गडदे, मुंबई

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) २,६४० परवडणाऱ्या घरांच्या सोडतीला अनिश्चित काळासाठी विलंब झाल्याने तब्बल ७५,९२७ अर्जदारांचे सुमारे ३७५ कोटी रुपये अडकून पडले आहेत. या विलंबामुळे म्हाडाला या रकमेवर १० ते १२ कोटी रुपयांचे व्याज मिळण्याची शक्यता व्यक्त होत असून, अर्जदारांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

मूळतः ही सोडत १५ मे रोजी होणार होती. मात्र अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाल्याने अर्ज भरण्याची मुदत दोनदा वाढवण्यात आली. त्यानंतर विधान परिषद निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सोडत पुढे ढकलण्यात आली. अद्याप नवीन तारीख जाहीर करण्यात आलेली नाही.

अर्जदारांनी भरलेली अर्नेस्ट मनी डिपॉझिट (EMD) रक्कम अजूनही म्हाडाकडेच जमा असून, त्यामुळे हजारो अर्जदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. अनेकांनी ही रक्कम उभी करण्यासाठी कर्ज घेतले, मुदतठेवी मोडल्या किंवा क्रेडिट कार्डचा वापर केला. गोरेगाव येथील एका अर्जदार महिलेने ५० हजार रुपये जमा करण्यासाठी दागिने गहाण ठेवले असल्याचे सांगितले.

MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज
Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

तर आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील एका अर्जदाराने २५ हजार रुपये क्रेडिट कार्डद्वारे भरल्याने दरमहा ईएमआय आणि व्याजाचा भार सहन करावा लागत असल्याची तक्रार केली. कांदिवलीतील आणखी एका अर्जदाराने १ लाख रुपयांचा EMD भरण्यासाठी मुदतठेव मोडली असून, घरही मिळाले नाही आणि पैशांवर कोणताही परतावा मिळाला नसल्याची खंत व्यक्त केली. अर्जदारांनी म्हाडाकडे सोडतीची तारीख तातडीने जाहीर करावी किंवा विलंबाच्या कालावधीसाठी EMD वर व्याज द्यावे, अशी मागणी केली आहे.

MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज
Mhada Lottery: खुशखबर! मुंबईतील २६४० घरांसाठी अर्ज करण्याची मुदत वाढली, जाणून घ्या नवी डेडलाइन

दरम्यान, म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने नाव न जाहीर करण्याच्या अटीवर सांगितले की, राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असल्याने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वेळेची प्रतीक्षा आहे. त्यानंतर सोडतीची तारीख जाहीर केली जाईल. जुलैच्या पहिल्या आठवड्यात सोडत होण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. म्हाडाच्या नियमानुसार, सोडतीत घर न मिळालेल्या अर्जदारांचा EMD साधारणतः आठवडाभरात परत केला जातो. मात्र सोडतच लांबल्याने हजारो अर्जदारांचे पैसे अनेक महिन्यांपासून अडकून पडले असून, त्यांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

MHADA Lottery: म्हाडाच्या सोडतीला विलंब! ७५ हजारांहून अधिक अर्जदारांचे ३७५ कोटी अडकले; १०-१२ कोटींच्या व्याजाचा अंदाज
MHADA Lottery: मुंबईत घ्या हक्काचं घर! म्हाडाच्या सोडतीसाठी अर्ज करण्यासाठी ३ दिवस शिल्लक; कुठे अन् कसा कराल अर्ज?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com