Mumbai : MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार

Mumbai Crime News : मुंबईतील मालवणी परिसरात MHADA फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने शिक्षिकेची 11.22 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली आहे. एका तरुणीसह तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस तपास सुरू आहे.
Mumbai :  MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai Crime NewsSaam Tv
Published On
Summary
  • शिक्षिकेला MHADA मध्ये फ्लॅट मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक

  • एकूण 11.22 लाख रुपये टप्प्याटप्प्याने उकळले

  • बनावट ऑफर लेटर MHADA कार्यालयात उघड झाले

  • आरोपींविरोधात गुन्हा दाखल; पोलिस तपास सुरू

मुंबईतील मालवणी परिसरात घर मिळवून देण्याच्या आमिषाने एका शिक्षिकेची तब्बल 11.22 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी पीडित शिक्षिका रुक्सार शेख यांनी मालवणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून त्यांच्या जुन्या मैत्रिणीसह तिघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, रुक्सार शेख या 32 वर्षीय शिक्षिका असून त्यांची मुख्य आरोपी सफिना शेख हिच्याशी कॉलेजपासून ओळख होती. 2013 पासून दोघींमध्ये मैत्रीचे संबंध होते. याच विश्वासाचा गैरफायदा घेत सफिनाने एप्रिल 2024 मध्ये रुक्सार यांना अँटॉप हिल किंवा वडाळा परिसरात MHADA चा फ्लॅट मिळवून देण्याचे आमिष दाखवले. अधिकृत लॉटरी प्रक्रियेशिवाय “ओळखीच्या माध्यमातून” फ्लॅट मिळवून देऊ शकते, असा दावा करून तिने रुक्सार यांचा विश्वास संपादन केला.

Mumbai :  MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Mumbai : ५ रुपयांची बॉटल १० रुपयांना, पाण्याच्या नावाखाली रेल्वे प्रवाशांची लूट; बोरिवली स्थानकावरील धक्कादायक प्रकार

सफिनाने फ्लॅटसाठी एकूण 25 ते 30 लाख रुपये खर्च येईल, असे सांगितले. त्यानंतर तिने विविध कारणे सांगत टप्प्याटप्प्याने रुक्सार यांच्याकडून एकूण 11.22 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. काही महिन्यांनंतर, 30 जानेवारी 2025 रोजी सफिनाने रुक्सार यांना MHADA कडून दिले असल्याचा दावा करत एक “प्रोव्हिजनल ऑफर लेटर” दिले. मात्र या पत्राविषयी संशय निर्माण झाल्याने रुक्सार यांनी त्यांच्या मेहुण्यासोबत वांद्रे येथील MHADA कार्यालयात जाऊन चौकशी केली. तेव्हा हे पत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट झाले.

Mumbai :  MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Crime News : ट्रेनच्या लोकोपायलटवर गोळीबार, दुचाकीवरून आले होते हल्लेखोर; हल्ल्याचे कारण धक्कादायक

फसवणुकीचा प्रकार लक्षात आल्यानंतर रुक्सार यांनी सफिनाकडे पैसे परत मागितले. मात्र सफिना त्यांचे फोन टाळू लागली. तसेच तिची आई साबिरा शेख आणि भाऊ अब्दुल करीम यांनी सुरुवातीला प्रक्रिया पूर्ण होईल, असे सांगून वेळ काढला. नंतर त्यांनी रुक्सार यांना सफिनाशी संपर्क करू नये, असा इशारा दिल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

Mumbai :  MHADA च्या फ्लॅटचं आमिष शिक्षिकेला दाखवलं, मैत्रिणीनेच घातला लाखोंचा गंडा, मुंबईतील धक्कादायक प्रकार
Shocking : मावशीचा अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढला, नंतर ब्लॅकमेल करत बलात्कार केला, भाच्याच्या कृत्यानं कुटुंब हादरलं!

तक्रारीनुसार, तिघांनी संगनमताने बनावट कागदपत्रांच्या आधारे विश्वास संपादन करून आर्थिक फसवणूक केली. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी समन्स बजावले होते, मात्र कोणीही हजर न राहिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा पुढील तपास मालवणी पोलीस करत असून आरोपींचा शोध सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com