FDA ची मोठी कारवाई! शॅम्पू-केमिकल मिसळून बनवत होते दूध; 24 जणांच्या आवळल्या मुसक्या

Fake Milk Racket Busted in Pune: मंचरमध्ये उघडकीस आलेल्या भेसळयुक्त दूध प्रकरणात पोलिसांनी २४ आरोपींना अटक केली आहे. २०२४ पासून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये शॅम्पू, केमिकल आणि पाम तेल वापरून बनावट दूध पुरवठा केला जात होता.
Manchar fake milk racket busted: Police seize chemicals, arrest 24 accused in major adulteration case
Manchar fake milk racket busted: Police seize chemicals, arrest 24 accused in major adulteration casesaam tv
Published On

सागर आव्हाड, साम टीव्ही

दूध भेसळप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासाला वेग आला असून, पोलिसांनी या गुन्ह्याच्या तपासादरम्यान एकूण २४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. अन्न व औषध प्रशासन आणि पुणे ग्रामीण पोलिसांनी मंचर परिसरात उघडकीस आणलेल्या दूध भेसळ घोटाळ्याचे नवीन धागेदोरे समोर आले आहेत.

Manchar fake milk racket busted: Police seize chemicals, arrest 24 accused in major adulteration case
Maharashtra Milk Price Hike: सर्वसामान्यांना फटका! गाई-म्हशीचं दूध 2 रूपयांनी महागलं; कधीपासून होणार दरवाढ लागू?

२०२४ पासून या भेसळ युक्त दुधाचे वितरण होत असून राज्यातील अहिल्यानगर, सांगली, जालना, पुणे ग्रामीण सारख्या अनेक जिल्ह्यांमध्ये हे दूध जात होतं, प्राथमिक तपासातून हे पुढे आले असल्याचं पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदीप गिल यांनी सांगितले. अटक केलेल्या २४ जणांचा विविध पद्धतीने या गुन्ह्यात सहभाग आहे. दूध भेसळीसाठी आरोपींकडून विविध साहित्याचा वापर केल्याचे समोर आले आहे. दूध भेसळीसाठी शाम्पू, पाम तेल, केमिकल आणि वे-पावडरचा वापर करून बनावट दूध तयार केले जात असल्याचा प्रकार तपासातून निष्पन्न झाला असल्याचं सुद्धा पोलिस अधीक्षक गिल यांनी सांगितलं.

Manchar fake milk racket busted: Police seize chemicals, arrest 24 accused in major adulteration case
तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

इमल्सीफायर, पाम तेल, व्हे पावडर, शॅम्पू आणि इतर साहित्य वापरून एक मिश्रण तयार केलं जात होते आणि त्याचा वापर भेसळयुक्त दूध तयार केलं जात असायचं. भेसळयुक्त दुधात तेल आणि पाण्याचे कण एकत्र ठेवण्यासाठी इमल्सीफायर नावाचे रासायनिक पदार्थी वापरले जाते. पाम तेल हे इतर खाद्यतेलांपेक्षा आणि दुधाच्या खऱ्या फॅटपेक्षा स्वस्त आणि व्यावसायिक नफ्यासाठी कृत्रिम दुधामध्ये पाम तेलाचा वापर केला जातो. संबंधित ठिकाणी असलेल्या गोडाऊन मधून या सारखे विविध साहित्य जप्त केलं गेलं आहे. याप्रकरणी प्रथम १० जणांना अटक करण्यात आली होती आता ही संख्या २४ वर गेली आहे

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com