तुम्ही पिताय भेसळयुक्त दूध? महाराष्ट्रात भेसळमाफियांचा उच्छाद, भेसळमाफियांना होणार थेट मृत्यूदंडाची शिक्षा?

FDA Seizes Thousands of Litres of Suspected Milk, Warns of Severe Action: तुमच्या घरात येणारं दूधही भेसळयुक्त असू शकतं... होय... राज्यात FDAनं भेसळमाफीयांविरोधात मोठी मोहिम उभारलीय. भेसळमाफीयांना आता थेट मृत्यूदंडाची शिक्षा होणार असल्यानं अनेकांचे धाबे कसे दणाणलेत ? पाहूयात या रिपोर्टमधून...
FDA officials inspect and seize suspected adulterated milk during raids across Maharashtra.
FDA officials inspect and seize suspected adulterated milk during raids across Maharashtra.saam tv
Published On

तुम्हालाही सकाळी उठल्या उठल्या गरमागरम दूध, चहा किंवा कॉफी पिण्याची सवय आहे का? मग जरा थांबा...कारण तुमची हीच सवय तुमच्या आणि तुमच्या कुटुंबाच्या जीवावर बेतू शकते. कारण तुमचं दूध भेसळयुक्त आहे....आणि हेच रॅकेट मोडून काढण्यासाठी राज्यात एफडीएनं ठिकठिकाणी दूध भेसळमाफियांवर कारवाई केलीय... छत्रपती संभाजीनगरच्या फुलंब्रीत तर FDAनं 3 हजार 500 लिटर संशयित दूध आणि दूध पावडर जप्त करत...1 लाख 32 हजारांचं दूध जागीच नष्ट केलयं...

परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहरातही दूध भेसळीचा धक्कादायक प्रकार घडलाय...घरात तापवण्यासाठी ठेवलेले दूध रबरसदृश घट्ट पदार्थात रूपांतर झाल्यानं FDAनं संबंधित दूध विक्रेत्यांच्य़ा दुकानावर छापे टाकलेत...लातूरच्या किल्लारीमध्ये FDAनं भेसळयुक्त दूध आणि मिल्क पावडर जप्त केलीय.. त्यातील 7 हजार 500 लिटर दुधाच्या नमुन्यांची तपासणी करण्यात येणार आहे...

दरम्यान शिर्डीतील सावळीविहीर गावातही सहा महिन्यात संबंधित दूध संकलन केंद्राचे 22 टँकर रिजेक्ट असूनही त्याची कुठलीच नोंद नसल्यानं FDAनं दूध संकलन केंद्राचा परवाना निलंबित केलाय...दरम्यान राज्यातील वाढत्या भेसळीचा मुद्दा विधानसभेत चांगलाच गाजलाय...सामान्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या भेसळमाफियांना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी थेट इशारा दिलाय...अन्नातल्या भेसळीविरोधात 1 लाखापासून थेट मृत्यूदंडापर्यंत शिक्षेची तरतूद असून त्याची कठोरपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचं झिरवळांनी विधानसभेत सांगितलंय.

दूध हे लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांच्याच आहाराचा मुख्य भाग आहे. मात्र, नफेखोरीसाठी चाललेला हा भेसळीचा जीवघेणा धंदा ग्राहकांच्या आरोग्य़ाशी खेळ करण्याचा प्रकार आहे....आता एफडीएने सुरू केलेली ही कारवाई केवळ काही दिवसांची मोहीम न ठरता, या रॅकेटच्या मुळाशी जाऊन दूध भेसळमाफियांना कायमचं जेलमध्ये पाठवायला हवं. त्याशिवाय सामान्यांच्या आरोग्याशी सुरू असलेला खेळ थांबणार नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com