

मुंबई-दिल्लीमध्ये घातपाताचा कट उधळला
एटीएस आणि दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई
एकाला कुर्ल्यातून घेतलं ताब्यात
संजय गडदे, साम टीव्ही
मुंबई आणि दिल्लीमध्ये मोठा घातपात करण्याच्या तयारीत असलेल्या दोन संशयित तरुणांचा घातपाताचा कट उधळलाय. महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथक आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने संयुक्त कारवाई करून ताब्यात घेतलंय. एकाला कुर्ला तर दुसऱ्याला खडवली येथून ताब्यात घेण्यात आलं आहे. पोलिसांनी कारवाई करत मोठा कट उधळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेशी संबंधित काही हालचालींची माहिती दिल्ली पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर दिल्ली पोलिसांनी ही माहिती महाराष्ट्र दहशतवादी पथकाला देण्यात आली. या दोन्ही यंत्रणांनी मिळून कारवाई केली. या दोघांकडून मोबाईल फोन, इलेक्ट्रॉनिक उपकरणे आणि काही महत्त्वाचे कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. चौकशीत त्यांचे काही दहशतवादी संपर्क असल्याची शक्यता तपासली जात आहे.
अटक केल्यानंतर पुढील चौकशीसाठी या दोघांना दिल्लीला नेण्यात आले आहे. तसेच त्यांच्या संपर्कातील इतर काही तरुणांवरही दहशतवादी पथकावर नजर आहे. तर योग्य वेळी कारवाई केली जाऊ शकते. या प्रकरणात तपास सुरू असून ATS कडून अधिकृत माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.
तत्पूर्वी, गेल्या काही दिवसांपासून मुंबई आणि आसपासच्या शहरात संशियत व्यक्तींविरोधात कारवायांमध्ये मोठी वाढ झालीये. मागील महिन्यात पाकिस्तानशी संबंध असलेल्या एकाला दहशतवादी संघटनेची साथ देत असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र एटीएसने मुंबई उपनगरमध्ये छापे टाकले होते. महाराष्ट्र दहशतवादी तपास पथकने गोवंडीमध्ये तीन ठिकाणी छापे टाकले होते. तर कुर्ल्यामध्ये एका ठिकाणी छापे टाकण्यात आले होते.
या कारवाईदरम्यान चार संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं. संशयित लोक बंदी घातलेल्या दहशतवादी संघटना आणि पाकिस्तानी सूत्रधारांच्या संपर्कात असल्याचा एखाद्या मोठ्या कटाची आखणी करत असल्याचा संशय होता. त्यामुळे अलीकडच्या काळात अटकसत्र आणि गेल्या महिन्यात केलेल्या कारवाया यांच्यातील दुवा जोडून संपूर्ण दहशतवादी जाळे उलगडण्याचा प्रयत्न यंत्रणाकडून केला जातोय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.