

गॅस सिलेंडरच्या तीव्र तुटवड्यामुळे आज एक दुर्दैवी घटना घडली असून वंचित बहुजन आघाडीचे माजी सरपंच शंकरराव सिरसाठ यांचा जीव गेला आहे. सकाळी सुमारे नऊ वाजल्यापासून गॅस मिळवण्यासाठी रांगेत उभे असलेल्या सिरसाठ यांना दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास चक्कर आली आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला.
ओडिशातील नयागढ येथे काल मध्यरात्री 12 ते 12.30 दरम्यान 55 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत 5 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. सर्व जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रशासनाकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 10 हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली असून जखमींनाही आवश्यक मदत दिली जात आहे.
साताऱ्यातील सोनगाव कचरा डेपोच्या बाजूला असणाऱ्या द्रोण आणि पत्रावळी बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग लागली आहे.सायंकाळच्या सुमारास ही आग लागली असून या मध्ये कारखान्यातील साहित्य जळून खाक झालं आहे.ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे कर्मचारी दाखल झाले असून आग विझवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.या आगी मुळे या कारखान्यातील साहित्य जळाल्याने मोठे नुकसान झाले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम आशियातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर प्रिन्स मोहम्मद बिन सलमान यांच्याशी दूरध्वनीवर चर्चा केली. या संवादात दोन्ही नेत्यांनी प्रादेशिक स्थैर्य राखण्यावर भर दिला. विशेषतः आंतरराष्ट्रीय व्यापारासाठी महत्त्वाच्या समुद्री मार्गांना (shipping lines) खुलं ठेवण्याची गरज अधोरेखित करण्यात आली. या चर्चेमुळे जागतिक व्यापार आणि ऊर्जा पुरवठ्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता व्यक्त करण्यात आली.
IPL 2026 च्या उद्घाटन सामन्यात RCB ने SRH विरुद्ध टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. RCB च्या गोलंदाजांनी सुरुवातीलाच जोरदार आघात करत SRH चा पहिला खेलाडू अभिषेक शर्मा याला केवळ 7 धावांवर झेलबाद केले. या विकेटमुळे SRH ला सुरुवातीलाच धक्का बसला असून RCB ने सामन्यावर पकड मजबूत केली आहे.
IPL 2026 च्या उद्घाटन सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने सनरायझर्स हैदराबाद(SRH) विरुद्ध टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. सामन्याची सुरुवात रोमांचक वातावरणात झाली असून दोन्ही संघ विजयी सुरुवातीसाठी सज्ज आहेत. RCB च्या या निर्णयामुळे SRH वर मोठा स्कोर उभारण्याचे दडपण आले आहे. चाहत्यांमध्ये या सामन्याबद्दल प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे.
नवी मुंबईतील बिल्डर गुरुनाथ चिंचकर यांच्या आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणात एनसीबीच्या काही अधिकाऱ्यांसह नवी मुंबई अमली पदार्थ विरोधी पथकातील अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. खंडणीच्या आरोपांमुळे ही कारवाई करण्यात आली आहे. संबंधित अधिकाऱ्यांची नावे समोर येत असून तपास सुरू आहे. या घटनेमुळे पोलीस यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
परळी बसस्थानक परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अवघ्या दीड वर्षाच्या चिमुकलीला बसस्थानकात अनोळखी महिलांच्या ताब्यात देऊन माता फरार झाल्याची घटना घडली आहे. “मी बाथरूमला जाऊन येते, तोपर्यंत मुलीला सांभाळा,” असे सांगून त्या महिलेने दोन प्रवासी महिलांकडे मुलीला सोपवले आणि तिथून काढता पाय घेतला. मात्र बराच वेळ उलटूनही ती महिला परतली नाही. बसस्थानक परिसरात शोध घेऊनही तिचा कोणताही पत्ता लागला नसल्याने. अखेर या प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्या आईचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे...
पुण्यात हडपसरजवळील देवाची उरळी कचरा डेपो येथे भूमी ग्रीन कंपनीच्या रिजेक्ट कचऱ्याला अचानक आग लागली. घटनेनंतर परिसरात धुराचे लोट पसरले. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे वाहन आणि आरोग्य विभागाची दोन अग्निशमन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सध्या आग विझवण्याचे काम सुरू असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या घटनेमुळे परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
2014 पासून देशात अंधश्रद्धेवर लोकांचा खूप विश्वास बसायला लागलाय.....भोदूंगीरी, भगतगिरी बाबा आणि साधू सगळे चमत्कार घडवतात असा लोकांचा समज झालाय.
अंधश्रद्धेला खतपाणी घालण्याचा प्रकार देखील सुरू झाला. राजकारणी लोक सुद्धा बाबा बुवांच्या च्या मागे लागले.
भरधाव कारच्या धडकेत तरुणीचा मृत्यू, नाशिकच्या उपनगर भागातील घटना
तरुणी नाशिक पुणे महामार्गावरील उपनगर परिसरात उभी असताना अपघात
भरधाव कारची ४ ते ५ दुचाकींना धडक, अपघातात एका तरुणीचा मृत्यू तर ३ ते ४ जण जखमी झाल्याची माहिती
वृद्ध कार चालकाला पोलिसांनी घेतलं ताब्यात, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
वाढती उष्णता आणि विद्युत प्रवाहित तारांमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत बांबूंचे झुळूक मोठ्या प्रमाणात जळून खाक झालेत. नगरसेविका वैशाली लांजेवार यांनी समय सूचकता दाखवीत नागरिकांच्या मदतीनं आणि अग्निशमन दलाच्या मदतीने आग आटोक्यात आणली. यामुळे मोठी दुर्घटना टळल्याची घटना भंडाऱ्याच्या साकोलीतील प्रभाग क्रमांक एक मध्ये घडली.
भिवंडी तालुक्यातील पडघा नजिकच्या सापे गावात गोदामास भीषण आग...
गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागण्याची घटना...
भिवंडी तालुक्यातील कल्याण पडघे रस्त्यावरील सापे ग्रामपंचायतीच्या हद्दीत
Ypm म्युनिफक्युचुलर गॅस लायटर कंपनीला भीषण आग लागली असून या आगीत लाखोंचे नुकसान झाले आहे.
आखाती देशांतील सुरू असलेल्या युद्धाचा थेट परिणाम आता दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांच्या उद्योगावर होताना दिसत आहे. एलपीजी गॅसच्या टंचाईमुळे खवा, मिठाई आणि इतर दुग्धजन्य पदार्थ तयार करणाऱ्या व्यावसायिकांसमोर मोठे संकट उभे राहिलेय
गावातील काही तरुण शेतीच्या कामासाठी नदी परिसरात गेलेले असताना, त्यांना पाण्यावर तरंगताना हा मृतदेह आढळून आला. त्यानंतर त्यांनी तात्काळ याची माहिती भोरच्या राजगड पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी पोहचून स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर बाहेर काढला
साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या नांदुरी येथील श्री सप्तशृंगी देवीच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली आहे, या यात्रेला जाणाऱ्या भाविकांची मोठी गर्दी लक्षात घेता, त्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या धुळे विभागाने कंबर कसली आहे, भाविकांच्या सुरक्षित आणि सुकर प्रवासासाठी धुळे परिवहन विभागातर्फे तब्बल 240 जादा बसेसचे नियोजन करण्यात आलंय.
बीड एसटी महामंडळाचे आगार प्रमुख सतीश तिडके यांनी एका गुत्तेदाराकडून पैसे घेतल्याचा व्हिडिओ काल व्हायरल झाला होता. यानंतर छत्रपती संभाजीनगर येथील प्रादेशिक व्यवस्थापक यांच्याकडून बदलीचे आदेश काढण्यात आले आहेत. सतीश तिडके यांची आगार प्रमुख बीड येथून सहाय्यक यंत्र अभियंता येथील कार्यशाळेत बदली करण्यात आली आहे.
पालीमधील माणगाव बुद्रुक येथील धनगरवाडीवरील घटना
शॉक सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती
आगीत घरातील धान्य, कपडे, फर्निचर, इलेक्ट्रॉनिक साहित्य यासह घरातील इतर वस्तू जळून खाक
गेल्या अनेक दिवसांपासून हातगाडी लावण्यावरून वाद होते.
अखेर हॉटेल चालकाकडून गाडी वाल्याच्या उजव्या हातावर कोयता मारून हा तोडण्याचा प्रयत्न केला आहे.
जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल केले असून स्वारगेट पोलीस पुढील तपास करत आहे
बिबट्याला डार्ट मारण्यात वनविभागाला यश
बेशुद्धीचे इंजेक्शन मारण्यात यश
आता बिबट्याला जेरबंद करण्याचे प्रयत्न सुरू
आज सकाळी 6 वाजेपासून ते 11 एप्रिल 2026 च्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदी आणि शस्त्रबंदीचे आदेश
पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी एकत्र येण्यास बंदी
पोलीस,शासकीय कर्मचारी, तसेच विवाह, अंत्ययात्रा आणि परवानगी घेतलेल्या धार्मिक मिरवणुकांना सूट
सभा, मोर्चे, मिरवणुका आणि ध्वनीक्षेपकासाठी परवानगी देण्याचे अधिकार संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडे
आषाढी यात्रा नियोजनाची आज पंढरपुरात बैठक झाली. या बैठकीमध्ये आठ जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे पंढरपुरकडे प्रस्थान होणार असल्याचे निश्चित करण्यात आले आहे. तर ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 24 जुलै रोजी पंढरपुरात येईल. 25 जुलैला आषाढी एकादशीचा सोहळा होणार आहे. दुपारी चार ऐवजी तीन वाजता यंदा प्रस्थान होणार आहे. या अनुषंगाने आज वारकरी महाराज मंडळी आणि आळंदी संस्थांच्या वतीने पंढरपुरात परंपरेप्रमाणे बैठक घेण्यात आली.
कल्याण पूर्वेतील विनायक कॉलनी परिसरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मद्यधुंद तरुणांनी रस्त्याच्या बाजूला पार्क करण्यात आलेल्या दुचाकीची तोडफोड केली आहे.
संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद आहे. सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे
सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचा शताब्दी वर्ष पार पडत आहेत.
शताब्दी वर्ष महोत्सव निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून विविध कार्यक्रमांचे वर्षभर आयोजन करण्यात आले आहे.
शताब्दी वर्षाच्या शुभारंभ निमित्ताने बोध चिन्हाचे उद्घाटन करत केक कापत जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 100 सोसायटींच्या संचालकांचा उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरव करण्यात आला.
तसेच शताब्दी वर्षाचा प्रारंभ म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँकेच्यावतीने सांगली शहरातून बाईक रॅली काढून करण्यात आला.
हातकणंगले तालुक्यातील आळते गावात ऊस शेताच्या बांधावर गाजांची झाडे लावल्या प्रकरणी पोलिसांची कारवाई..
६ ते ८ फूट उंचीची गांजाची ८ झाडे सरबांदावर लावल्या प्रकरणी छापा टाकून पोलिसांची कारवाई..
सुकुमार भूपाल चौगुले (वय ७२ ) रा. ढवळे मळा आळते याला अटक..
१७ किलो वजनाची व २ लाख ५२ हाजार रुपयांची गांजाची झाडे जप्त..
अंबप वठार मार्गावर असणाऱ्या 25 एकर जमिनीमध्ये लागली आग
आगीत गवत, आंबा व सागवान झाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान
नुकसानीची पोकळी शेतकऱ्यांच्या खिशाला न परवडणारी
शासनाकडून होणाऱ्या आर्थिक नुकसानीची भरपाई व्हावी..नागरिकांची मागणी
- नाशिकच्या सातपूर परिसरातील ध्रुव नगर येथे बिबट्या दिसल्याची माहिती
- नागरिकांना बिबट्या दिसल्यानंतर सर्च मोहीम सुरू
- वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल
- नागरीवस्तीमध्ये बिबट्या दिसल्याने उडाला गोंधळ
दुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या कुठेही तुटवडा दिसून येत नाही आहे. जिल्ह्यात गॅस आणि इंधनाच्या आढावा घेतला असून मुबलक प्रमाणावर इंधन आणि गॅस उपलब्ध आहे त्यामुळे नागरिकांनी घाबरू नाही जिल्हाधिकारी मित्तली सेठी यांचे आवाहन. दररोज सुमारे 7 हजार गॅस सिलेंडरचे वितरण केले जात असून, 13 हजारांहून अधिक सिलेंडरचा साठा उपलब्ध आहे. म्हणजेच, किमान तीन दिवस पुरेल इतका गॅस साठा जिल्ह्यात उपलब्ध असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना वेळेवर सिलेंडर मिळावा यासाठी व्यवस्था अधिक सक्षम करण्यात आली आहे. याआधी एका मिनिटाला सुमारे 200 बुकिंग होत होती, मात्र आता ही क्षमता 400 पेक्षा अधिक बुकिंगपर्यंत वाढवण्यात आली आहे. तर इंधनाचाही साठा मुबलक असून, जिल्ह्यातील 86 पेट्रोल पंपांवरून पेट्रोल आणि डिझेलचा नियमित पुरवठा सुरू आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता घाबरून जाऊ नये, नागरिकांना काही अडचण आल्यास HPCL, BPCL आणि IOCL कंपन्यांच्या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. मित्तली सेठी यांनी केले आहे. एकूणच, नंदुरबार जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा पुरवठा सुरळीत असून कोणतीही टंचाई नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
गोराईमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. 35 वर्षीय महिलेची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची ही बातमी आहे. नारायण पिजी गेस्ट हाऊसमध्ये भाडेतत्वावर ही महिला राहत होती.
पुण्यात पोलीस भरती दरम्यान धावत असताना युवकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे. शिवाजीनगर ग्राउंड वरती झाला दुर्दैवी मृत्यू झाल्याचे कळाले आहे. सोळाशे मीटर रनिंग करत असताना पुरुषोत्तम बुरकुल या युवकाचा मृत्यू झाला.
दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका विमानाने आपत्कालीन लँडिंग केले आहे. अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार, विमान सुरक्षितपणे उतरले असून सर्व प्रवासी सुखरूप आहेत.
गेल्या २ वर्षा पासून पुणे मनपा बधाई चौक, कोथरूड येथील डि पी रोड येथील नागरिकांच्या घरासमोर कचरा वर्गीकरण करत आहे व त्याच बाजूला गणेश मंदीर देखील आहे वारंवार सदर फिदर पॅाइंट हलवण्याबाबत तक्रार करून सुद्धा मनपा अधिकारी तिथेच कचरा वर्गीकरण करतात व कचरा व दुर्गंधी पसरवतात व घातक द्रव्य तिथे सांडवतात तरी वारंवार तक्रार देऊन एकत नाही म्हणून सदर कचरा गाडी जो परंत पॅाइंट बंद होत नाही तो परंत मनपाला भेट देणार.
नाशिक जिल्ह्यातील येवला कृषी उत्पन्न बाजार समिती आजपासून सलग सहा दिवस बंद राहणार असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले आहे. मार्च अखेर बँकेला सुट्टी व इतर सार्वजनिक सुट्ट्यांमुळे कांद्यासह इतर भुसार धान्य लिलाव बंद राहणार आहे, आधीच कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसताना आता लिलाव प्रक्रियाच ठप्प झाल्याने शेतकरी अधिकच चिंतेत सापडला आहे. बाजार समिती बंद असल्याने नेहमी वर्दळ असलेल्या ठिकाणी आता शुकशुकाट बघण्यास मिळत आहे.
- भोंदू अशोक खरातची आज सलग १० व्या दिवशी SIT चौकशी
- सलग १० व्या दिवशी SIT कडून खरातची चौकशी
- SIT पथक अशोक खरातला घेऊन गोपनीय स्थळी
- काल रात्री दाखल झालेल्या २ नव्या गुन्ह्यांसंदर्भात खरातची चौकशी होण्याची शक्यता
रुपाली चाकणकर यांनी राजीनामा दिला हे योग्यच आहे. कारण हे प्रकरण अतिशय भयंकर आहे. खरंतर खरातला कायद्याने शिक्षा व्हावी, असे मला वाटत असले तरी अशा नराधमांना चौकात उभे करून सुया टोचून टोचून मारले पाहिजे, असा संताप भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला. एका दिवसासाठी कायदा बदलून या नराधमाला भर चौकात शिक्षा दिली पाहिजे, असेही मुनगंटीवार म्हणाले.
मराठी नवीन वर्षातील पहिल्या चैत्री यात्रेचा सोहळा उद्या पंढरपुरात साजरा होत आहे. वारीसाठी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. उन्हाचा पाराने चाळीशी गाठल्याने भाविकांची संख्या घटली आहे. उद्या पहाटे चैत्री एकादशीच्या निमित्ताने विठ्ठल रूक्मिणीची नित्य पूजा होणार आहे.
धाराशिवमध्ये शिवरायांचा पुतळा हटवण्यात आला. त्यानंतर परिसरात पोलीस -गावकरी आमने-सामने आले.
मुंबईच्या चारकोपमध्ये गॅस सिलेंडर चोरीची धक्कादायक घटना घडली. तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे.
वांद्रे - वरळी सी लिंकच्या वांद्रे एक्झिट टोल नाक्यावर वादातून कारचालकाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना काल रात्री सुमारे ११.५० वाजण्याच्या सुमारास घडली. टोल कर्मचाऱ्यांशी झालेल्या वादानंतर कारचालकाला कथितपणे मारहाण करण्यात आली. या घटनेमुळे टोल नाक्यावर काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सुमारे दहा मिनिटांनंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. या प्रकरणातील अधिक तपशील अद्याप समोर आलेले नाहीत.
निवासी शिक्षण केंद्रासाठी महापालिकेने मंजूर केले १ कोटी ७९ लाखांचा निधी
स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आला आहे
बाणेर येथे मागासवर्गीय आदिवासी विद्यार्थीनीसाठी निवासी शिक्षण केंद्र उभारण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आळ आहे
या कामासाठी जवळपास २ कोटी १६ लाख रुपये खर्च होणार आहे
मुंबई उच्च न्यायालयाची पुणे महापालिकेला नोटीस देण्यात आलीये
पदपथावर लागलेल्या वाहनांवर वाहतूक पोलीस दंड आकारतात मात्र महापालिकेचा पण दंड आकारला जातो
याला आव्हान देणारी याचिका दाखल करण्यात आली होती
चार आठवड्यात प्रतिज्ञापत्राद्वारे बाजू मांडण्याच्या सूचना यावेळी मुंबई हाय कोर्टाने दिल्या आहेत
विजय सागर यांनी या संदर्भात याचिका दाखल केली आहे
पुण्यातील होटल असोसिएशनची पुण्याच्या जिलाधिकाऱ्यांकडे मागणी
गॅस पुरवठाबाबत स्पष्टता द्या
अनेक हॉटेल्स सध्या बंद आहेत तर काही बंद होण्याच्या मार्गावर आहेत
गॅस नसल्याने हॉटेल व्यवसायावर परिणाम
पाईपलाईन द्वारे गॅस जोडणी करण्याच्या प्रशासनाच्या सूचना
सावंतवाडी बाजारपेठेत या हंगामातील हापूस व पायरी आंबा दाखल झाला आहे. आंब्याचे दर मात्र अक्षरशः गगनाला भिडले आहेत. हापूस आंब्याचे दर तब्बल सोळाशे ते अडीच हजार रुपये डझन इतके झाले आहेत. तर काही ठिकाणी हापूस अडीच हजारांपासून थेट साडेतीन हजार रुपयांपर्यंत विकला जात असल्याचे चित्र आहे. पायरी आंब्याचे दर देखील कमी नाहीत. पायरी आंबा ९०० ते १६०० रुपये डझनाने विक्री होत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांसाठी आंबा खरेदी करणे मुश्किल बनले आहे. यंदा आंब्याचे उत्पादन केवळ आठ ते दहा टक्क्यांपर्यंतच मर्यादित राहिल्याने बाजारात आवक कमी आणि मागणी जास्त असे समीकरण निर्माण झाले आहे. परिणामी दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एकीकडे आंबा बाजारात दाखल झाला असला, तरी वाढलेल्या किमतींमुळे ‘आंबा सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर’ गेल्याचे दिसून येत आहे. आंबा खरेदीसाठी खास कोकणात आलेल्या पर्यटकांना आंब्याचे दर ऐकून आंबा खरेदी कसा करायचा असा प्रश्न पडला आहे. हंगाम पुढे सरकत असताना दर कमी होणार का? याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.
कराड तालुक्यातील टेंभू उपसा सिंचन योजनेच्या पहिल्या टप्प्यात मोठी पाण्याची गळती
कृष्णा नदीवर आधारित आणि आशियातील सर्वात मोठ्या उपसा जलसिंचन प्रकल्पांपैकी एक असलेल्या टेंभू योजनेच्या पहिल्या टप्प्यातील पाईपलाईनमध्ये तांत्रिक बिघाड झाला आहे.
पाईपलाईनमधील एअर वॉल्वचे झाकण प्रेशरमुळे उडून गेल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे.
घटनास्थळी २० ते ३० फूट उंच पाण्याचे फवारे उडताना दिसत आहेत, ज्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
स्थानिक कोरेगाव आणि टेंभूच्या नागरिकांनी या घटनेती माहिती तात्काळ प्रशासनाला दिली असून आता या प्रवाहाची मोटार बंद करण्यात आली आहे. मात्र, या घटनेचा व्हिडिओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील पापरी परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळीचा तडाखा...
द्राक्ष बागा,बेदाणे,पेरू,आंबा,मका ज्वारी पिकांचे मोठे नुकसान
वादळी वाऱ्यासह झालेल्या तुफान गारपीटमुळे 7 एकरावरील काढणीला आलेली द्राक्ष बागा उध्वस्त
शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान, शेतकरी राजा हवालदिल
अचानक आलेल्या वादळी वाऱ्यामुळे तयार झालेले द्राक्षांचे घड मातीमोल
म्हाडा घोटाळा प्रकरणी ४५ बड्या बिल्डरांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला
नाशिक जिल्हा न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय, ४५ बड्या व्यावसायिकांवर अटकेची टांगती तलवार
संशयितांची आता उच्च न्यायालयात धाव घेण्याची तयारी
म्हाडाला आर्थिक दुर्बल घटकांचा कोटा टाळण्यासाठी नकाशे आणि कागदपत्रांमध्ये छेडछाड तसच फेरफार करून कोट्यावधींची फसवणूक
म्हाडाची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल आहे गुन्हा
संशयितांचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग
रायगड आणि पुणे जिल्ह्याला जोडणारा वरंध घाट दुरुस्तीच्या कामासाठी बंद
पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी काढली अधिसुचना
पुणे जिल्हा हद्दीतील हिरडोशी परिसरात रस्त्याच्या दुरुस्तीचे काम करण्यात भोर घाट मार्ग बंद ठेवण्याचे आदेश
25 मार्च ते 30 एप्रिल दरम्यान वरंध घाट रस्ता बंद रहाणार
नागरीक, प्रवासी आणि पर्यटकांनी पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सुचना
सांगलीच्या गोंधळेवाडी येथून पंढरपूरसाठी निघालेल्या चैत्रवारी दरम्यान मेंढरांचा रिंगण सोहळा पार पडला आहे. पंढरपुरकडे मार्गस्थ होताना श्री संत बाळूमामांच्या मेंढरांनी श्री संत बागडेबाबांच्या पालखीभोवती रिंगण घातले.टाळ-मृदुंगाचा निनाद,विठ्ठल नामस्मरणाचा गजर यामुळे हा मेंढरांचा रिंगण डोळ्यांचे पारणे फेडणारा ठरला.ह.भ.प.तुकाराम बाबा महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली ही चैत्रवारी पायी दिंडी पंढपुरकडे निघाली आहे. सागवानी आकर्षक रथात पालखी सह शेकडो विठ्ठल भक्त या चैत्रवारीत सहभागी झाले आहेत. बाळूमामांच्या मेंढरांच्या रिंगण सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होतं.
मोहोळ तालुक्यातील अनेक भागात अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं नुकसान झालं आहे.येवती-पापरी आणि पेनूर परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचा नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे यांनी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला. "सरकार आणि लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेब खंबीरपणे तुमच्या पाठीशी आहेत" असा शब्द देत त्यांनी हतबल झालेल्या बळीराजाला धीर दिला आहे. द्राक्ष बागा, केळी, आणि इतर नगदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.अनेक शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडताना खासदारांसमोर अश्रूंना वाट मोकळी करून दिली.
वाशिम जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाअंतर्गत येत असलेल्या ७५ लघु प्रकल्पात केवळ 27.8 टक्के इतकाच जलसाठा शिल्लक राहिल्याने वाशिम जिल्ह्यात येणाऱ्या दिवसात पाणी टंचाईच संकट अधिक गडद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
वाशिम जिल्ह्यात गत पावसाळ्यात दमदार पाऊस पडला असतानाही मार्च महिनाही अजून संपला नसताना अनेक प्रकल्प तळ गाठण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी टंचाईची शक्यता निर्माण होऊन ग्रामीण भागात जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर येण्याची शक्यता आहे.
डॉ बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाचा समर शेड्युल जाहीर..
समर शेड्युलअंतर्गत फ्लाइट्सची संख्या आणि कनेक्टिव्हिटी वाढविण्यात आली आहे..
सदरील शेड्युल 26 मार्च ते 24 ऑक्टोबर पर्यंत असणार, या बदलामुळे प्रवाश्यांना अधिक
उन्हाळ्यात दुपारच्या फ्लाईट कमी करून बहुतेक उड्डाणे सकाळी ठेवण्यात येणार, तर काही फ्लाइट्सची वेळ सायंकाळी आणि रात्री करण्यात आली आहे..
या बदलामुळे उन्हाळ्यात हवाईमार्गे पर्यटनास फ्लाइट्सचे पर्याय आणि सुधारित कनेक्टिवीटी मिळणार..
अशोक खरात विरोधात शुक्रवारी रात्री उशिरा दोन गुन्हे दाखल
एका महिलेची लैंगिक शोषणाची तर एका इसमाची फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल
नेवासा येथील व्यावसायिकाला व्यवसायिक बरकतीसाठी वेगवेगळ्या अंगठ्या लाखो रुपयांना विकून फसवणूक केल्याप्रकरणी खरात विरोधात गुन्हा
तर एक विवाहित महिलेचा तिच्या पतीसोबत वाद होत असल्याने त्यावर सल्ला घेण्यासाठी गेली असता तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची महिलेची तक्रार
अशोक खरात विरोधात आत्तापर्यंत एकूण 10 गुन्हे नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल
2 आर्थिक गुन्हे फसवणुकीचे तर 8 गुन्हे लैंगिक शोषणाचे
लैंगिक शोषणाचे एकच मोडस वापरल्याच समोर
नागपुरात शुक्रवारी 40.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद, शुक्रवार ठरला या मोसमातील सर्वाधिक उष्ण दिवस
तर 41.2 अंशासह अमरावती विदर्भातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले
एकीकडे पावसाचा अलर्ट असताना नागपूरकरांना उन्हाच्या झळा सहन करावा लागल्या
विदर्भाच्या सात जिल्ह्यात शुक्रवारी दिवसाचे तापमान 40 अंशांवर गेले
यात अमरावती, अकोला, वर्धा, चंद्रपूर, नागपूर आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश आहे
पुढील सहा ते सात दिवस कडक उन्हासह पाऊस आणि वादळी वारा वाहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे
नागपुरात बनावट नोटांच्या काळाबाजार प्रकरणात शिक्षा, दोघांना सात वर्षांची सक्तमजुरी
जिल्हा व सत्र न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल प्रत्येकी ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला
दंड न भरल्यास सहा महिन्यांची अतिरिक्त शिक्षा सुनावली
जमरूल उर्फ मणिरूल हुसेन आणि अजीम शेख अशी दोषींचे नाव...
तहसील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गस्ती दरम्यान पोलिसांनी दोघांना पकडले
५०० रुपयांच्या २४३ बनावट नोटा जप्त झडतीत मोठा साठा उघड
अनेक नोटांवर एकच क्रमांक आढळला पंचनामा करून गुन्हा नोंदवला होता...
यामध्ये नाशिक चलनी मुद्रणालयाकडून तपासणी अहवालात सर्व नोटा बनावट असल्याचे स्पष्ट
रिझर्व्ह बँकेकडूनही बनावट असल्याची पुष्टी न्यायालयात ठोस पुरावे सादर
९ साक्षीदारांची साक्ष, पंचनामा आणि अहवाल निर्णायक, पुराव्यांच्या आधारे गुन्हा सिद्ध
भारती विद्यापीठ परिसरातील एका हॉटेलमध्ये गॅस गळतीमुळे अचानक भडका उडाल्याची घटना घडली.
या दुर्घटनेत चार जण किरकोळ जखमी झाले असून हॉटेलचे किरकोळ नुकसान झाले आहे.
हे हॉटेल सकाळी व संध्याकाळी सुरू असते. सायंकाळी सव्वासहा वाजण्याच्या सुमारास कामगारांनी हॉटेल उघडले असता गॅसचा तीव्र वास येत होता.तसेच गॅस प्रेशरचा आवाजही ऐकू येत होता.
परिस्थिती लक्षात घेऊन कामगारांनी तात्काळ लाईट बंद केली. मात्र काही क्षणांतच गॅसचा भडका उडून आग लागली.घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या संकटाच्या पार्श्वभूमीवर भारताने संतुलित आणि प्रभावी धोरण राबवले असून, यामध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारची महत्त्वाची भूमिका आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. केंद्र शासनाच्या निर्देशानुसार या संकटकाळात महाराष्ट्रात पीएनजी (पाईप्ड पद्धतीने वितरण) वितरणाला गती देण्यात येत असून खतांच्या उपलब्धतेसाठी सातत्याने आढावा घेतला जात असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.