Maharashtra Politics: १६ आमदार अपात्रता प्रकरणात शिंदे गटाकडून वेळकाढूपणा? ठाकरे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

Shiv Sena 16 MLA Disqualification Case: शिंदे गटाकडून वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. कारण, शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे चक्क ६००० हजार पानांचं लेखी उत्तर सादर केल्याची माहिती आहे.
Shivsena 16 MLA Disqualification case Latest Updates
Shivsena 16 MLA Disqualification case Latest Updatessaam tv
Published On

Shiv Sena 16 MLA Disqualification Case: एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून बंड केलं. त्यानंतर आमदार अपात्रतेचा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहचला. प्रदीर्घ सुनावणी घेत कोर्टाने अपात्रतेच्या कारवाईचा निर्णय विधानसभा अध्यक्षांकडे सोपावला. यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असे निर्देश कोर्टाकडून विधानसभा अध्यक्षांना देण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षानंतर राहुल नार्वेकरांनी शिंदे गटाच्या आमदारांना नोटीस पाठवली. (Latest Marathi News)

Shivsena 16 MLA Disqualification case Latest Updates
Chandrayaan 3 Update: विक्रम लँडरमधून प्रज्ञान रोव्हर आलं बाहेर; चंद्रावर पुढील १४ दिवस काय होणार?

यावर शिंदे गटाकडून (Eknath Shinde) वेळकाढूपणा केला जात असल्याचा आरोप केला जात आहे. कारण, शिंदे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे चक्क ६००० हजार पानांचं लेखी उत्तर सादर केल्याची माहिती आहे. या ६ हजार पानांच्या लेखी उत्तरात आमदारांनी नेमकं काय म्हटलं आहे? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर ठाकरे गट आता काय भूमिका घेणार याकडेही सर्वांचं लक्ष लागून आहे.

सुप्रीम कोर्टाने दिलेली मुदत संपल्याचा दावाही ठाकरे गटाकडून (Uddhav Thackeray) केला जात आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी बुधवारी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांना नोटीसची वेळ संपली असून कारवाई कधी होणार असा प्रश्न विचारला. यावर राहुल नार्वेकरांनी आपली भूमिका स्पष्ट केली. “आमदारांच्या अपात्रता प्रकरणात उचित कारवाई सुरू आहे, असं राहुल नार्वेकर यांनी म्हटलं आहे.

Shivsena 16 MLA Disqualification case Latest Updates
Maharashtra Rain Update: राज्यात पावसाचा जोर कधी वाढणार? हवामान विभागाने दिली महत्वाची माहिती

ज्यावेळी विधानसभा अध्यक्ष अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेत असतात त्यावेळी ते ‘क्वाजय ज्युडिशियल ऑथेरिटी’ म्हणून काम करत असतात याचं मला भान आहे. त्यामुळे या संदर्भात अधिक चर्चा न करता योग्य कायदेशीर व नियमानुसार कारवाई केली जाईल, असंही राहुल नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, आमदारांना सुनावणीसाठी कधी बोलावलं जाईल यावरही राहुल नार्वेकरांनी महत्वाची प्रतिक्रिया दिली. “लवकरच सुनावणी चालू करण्यात येईल. इतर प्रक्रिया सुरू आहेत. मी आश्वासित करतो की, यात कोणत्याही प्रकारची दिरंगाई होणार नाही. तसेच नियमांचं पालन करून योग्य निर्णय घेतला जाईल,” अशी माहिती राहुल नार्वेकरांनी दिली.

Edited by - Satish Daud

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com