Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचार

Sanjay Raut On Dhirendra Shastri: धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त विधान केले. त्यावरू राजकारण चांगलेच तापले आहे. याबाबत आता ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया देत धीरेंद्र शास्त्रींना खडेबोल सुनावले.
Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचार
Dhirendra ShastriSaam
Published On

Summary -

  • धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानामुळे राजकारण तापलं

  • शिवाजी महाराजांबाबतच्या वक्तव्यावरून संताप व्यक्त केला जातोय

  • संजय राऊत यांनी धीरेंद्र शास्त्रींवर टीका केली

  • यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही निशाणा साधला

बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्याबाबत केलेल्या विधानामुळे राजकारण चांगलेच तापले आहे. शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्यात गुरू-शिष्याचे नातं होते, असा दावा त्यांनी केला होता. त्यांच्या या विधानानंतर शिवप्रेमी संतप्त झाले असून राजकीय नेते देखील संतप्त प्रतक्रिया देत आहेत. याच मुद्द्यावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी धीरेंद्र शास्त्री यांच्यासोबत भाजप सरकारवर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना धीरेंद्र शास्त्री यांच्या विधानावर प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सरसंचालक या दोन प्रमुख मान्यवर व्यक्ती ज्यांना इतिहासाचे भान असले पाहिजे खास करून छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या उपस्थितीत अशा बुवा आणि महाराजांना आणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची मोडतोड करण्याचे कारण काय? शिवाजी महाराज हे इतिहासातल्या आपल्या ऊर्जेचा अखंड प्रवाह आहे ते कधी थकले नाही, झुकले नाही आणि म्हणून जो महाराष्ट्र आमचा आहे तोही थकत नाही आणि दिल्ली पुढे झुकत नाही. पण हा नवा इतिहास. हे कोण बाबा आहेत? कुठे आहे? माहित नाही मला हे जे कोण महाराज. नवीन हिंदुत्ववाद सुरू झाला आहे. लोकांचा नवीन इतिहास लिहित आहेत किंवा बदलत आहेत महाराष्ट्राला हे मान्य नाही.'

Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचार
Dhirendra Shastri : गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा; धीरेंद्र शास्त्रींचा आयोजकांना अजब सल्ला, चर्चांना उधाण

यावेळी संजय राऊत यांनी मुख्यमंत्री आणि सरसंघ चालकांवर देखील निशाणा साधला. ते म्हणाले की, 'खरं म्हणजे हे जे बुवा आहेत तरुण कुणीतरी ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर जेव्हा बोलत होते तेव्हा राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांना थांबवायला पाहिजे होतं किंवा सरसंघ चालकांनी त्यांना रोखायला हवं होतं आणि त्यांना महाराष्ट्राच्या भावना इतिहासाबाबत जाणीव करून द्यायला पाहिजे होती. ते बुवा म्हणजे कोणी या पृथ्वीवरील महान व्यक्ती नाही. त्यांचे वय काय? अभ्यास काय? ते असं म्हणत आहेत की मुलं जन्माला घाला चार मुलं. तुम्ही आधी घाला. तुम्ही ब्रह्मचारी अजून तुमचं लग्न झालेलं नाही आणि दुसऱ्यांना सांगत आहात एक मुलं आरएसएसला द्या. तुम्ही द्या. तुमची ५- २५ मुलं जन्माला घाला आणि आणि हवी तेवढी द्या काहीही हरकत नाही. स्वतःपासून हे जे संत बुवा महाराज आहेत त्यांनीही सुरुवात स्वतःपासून करायला हवी.

Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचार
Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

तसंच, 'हे हिंदुत्व नाही भाजप किंवा संघ या माध्यमातून पुरस्कार करत आहे किंवा खरात बाबांसारखे हे त्यांचे प्रचारक आहेत. हे हिंदुत्ववादी अजिबात नाही. एका बाजूला तुम्ही लोकसंख्या नियंत्रणासाठी सरकार मंत्रालय स्थापन करतं आणि कोट्यावधी खर्च करत आहे आणि दुसऱ्या बाजूला अशा माध्यमातून तुम्ही लोकसंख्या वाढवण्याचा प्रचार करत आहेत. ते बाबा असं का नाही बोलले एक मूल प्रत्येकाने आपलं भारतीय सैन्यात दाखल व्हायला पाहिजे. असं बोलले असते तर आम्ही त्याचं स्वागत केलं असतं. एक मूल बलिदानासाठी भारतीय राष्ट्रसेवेसाठी दिला असता हे त्यांना का सुचत नाही. दुर्दैवाने महाराष्ट्रात येऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या अशा प्रकार इतिहासाची मोड तोड करणं हे जर दुसरा कोणी केला असतं तर ऐवढ्यात भारतीय जनता पक्षाने शिवरायांचा अपमान झाला असे बोंबलत रस्त्यावरती उतरले असते.', असं देखील संजय राऊत यांनी सांगितले.

Dhirendra Shastri: हेच जर दुसरं कुणी केलं असतं तर....; शिवरायांबाबत वादग्रस्त विधान करणाऱ्या धीरेंद्र शास्त्रींचा संजय राऊतांनी घेतला समाचार
Sanjay Raut: शिंदेंना दिल्लीत जाऊन गुजराती नेत्यांच्या पायाशी बसावं लागतं, संजय राऊत यांची खरपूस टीका

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com