Dhirendra Shastri : गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा; धीरेंद्र शास्त्रींचा आयोजकांना अजब सल्ला, चर्चांना उधाण

Dhirendra Shastri Controversial statement : धीरेंद्र शास्त्रींची गरबा महोत्सव आयोजकांना अजब सल्ला दिला आहे. गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा, असं धीरेंद्र शास्त्री म्हटलं आहे.
Dhirendra Shastri on Garba
Dhirendra Shastri newsSaam tv
Published On
Summary

धीरेंद्र शास्त्री यांनी गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमूत्र शिंपडण्याचा सल्ला दिलाय

धीरेंद्र यांच्या विधानामुळे सोशल मीडियात दोन गट तयार झालेत

धीरेंद्र शास्त्रींनी लव्ह जिहादसारख्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी गरबा महोत्सवात धार्मिक नियम ठेवण्याची गरज असल्याचं म्हटलंय

सोशल मीडियावर हा मुद्दा चर्चेचा विषय ठरलाय

नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी बागेश्वर धाममधील धीरेंद्र शास्त्री यांनी गरब्याबाबत एक मोठं विधान केलं आहे. गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा, असं धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. काहींनी सनातन धर्माची रक्षा करण्यासाठी योग्य असल्याचं म्हटलं आहे. तर काहींनी समाजात द्वेष पसरवणारं वक्तव्य म्हटलं आहे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री सध्या त्यांच्या आजोळी पोहोचले आहेत. तेथून धीरेंद्र शास्त्री रविवारी लवकुश नगर येथील बंबर बनी यांच्या दर्शनासाठी पोहोचले. यावेळी त्यांनी आयोजित गरबा महोत्सवावर प्रश्न उपस्थित केले. धीरेंद्र शास्त्री यांनी म्हटलं की, कोणीही सनातनी व्यक्ती हज यात्रेला जात नाही. आमची एकच इच्छा आहे की, कोणताही इतर धर्माचा व्यक्ती आमच्या गरबा महोत्सवात येऊ नये'.

Dhirendra Shastri on Garba
Famous Actress Mother Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या आईचा मृत्यू, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

शास्त्री यांनी गरबा आयोजन समितीला सल्ला देताना म्हटलं की, 'गरब्याच्या गेटवर गोमूत्र ठेवावं. ते गोमूत्र गरबा खेळण्यास येणाऱ्या व्यक्तीवर शिंपडवावं. असे केल्याने इतर धर्माचे लोक गरबा खेळायला येणार नाहीत, असा अजब सल्ला धीरेंद्र शास्त्रींनी दिला आहे.

Dhirendra Shastri on Garba
Kalyan APMC Market : कल्याणमध्ये घोटाळ्याचा बाजार; समितीत आजी-माजी संचालकांच्या नातेवाईकांचा भरणा

धीरेंद्र शास्त्री यांनी पुढे म्हटलं की, 'लव्ह जिहादसारख्या घटना रोखण्यासाठी करणे गरजेचे आहे. गरबा महोत्सवात गैरधर्मीयांची घुसखोरी रोखली पाहिजे'. धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचं वक्तव्य सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर दोन गट पडले आहेत. काही जण त्याचं समर्थन करत आहेत. तर काही जण धीरेंद्र शास्त्री यांच्या वक्तव्याचा विरोध करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com