Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?

Dhirendra Shastri: बांदा येथील हनुमान कथेदरम्यान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या विधानामुळे खळबळ उडालीय. देशात जातीवाद नसावा तर राष्ट्रवाद आणि असावा असं विधान त्यांनी केलंय.
Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?
Published On
Summary
  • धीरेंद्र शास्त्रींच्या तिरंग्यावरील विधानाने खळबळ

  • उत्तर प्रदेशातील बांदा येथे हनुमान कथेदरम्यान वक्तव्य

  • जातीवादाऐवजी राष्ट्रवादाचा संदेश देण्याचा दावा

उत्तर प्रदेशात बांदा येथे या केलेल्या विधानामुळे खळबळ उडालीय. ज्या दिवशी तिरंग्यामध्ये चंद्र येईल, त्या दिवसापासून ना शर्मा वाचेल ना वर्मा. ना क्षत्रिय वाचतील, ना रैदास वाले वाचतील. ना तुलसीदास वाले. ना उच्चवर्णीय वाचेल ना मागसवर्गीय, असे विधान धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलं, त्यांच्या विधानामुळे खळबळ उडालीय.

Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?
Meerut Crime: बरं झालं माझं लग्न झालं नाही, मेरठच्या सौरभ हत्याकांडावर धीरेंद्र शास्त्रींची मिश्किल टिप्पणी

उत्तर प्रदेशातील बांदा येथे पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांची हनुमान कथा सध्या बांदा येथे सुरू आहे. हनुमान कथेदरम्यान मोठ्या संख्येने भाविकही येत आहेत. या कार्यक्रमात बोलताना धीरेंद्र शास्त्री हे विधान केलंय. तिरंग्याबाबत केलेल्या विधानानंतर त्यांनी बांगलादेशचं दिलं. बांगलादेशात एका विधवा महिलेवर ४०-४० लोकांनी अत्याचार केला. यामुळे देशात जातीवाद नको तर देशात राष्ट्रवाद असला पाहिजे.

धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले की, आजच्या जगात ज्या व्यक्तीकडे सत्ता आहे, तोच व्यक्ती शक्तीमान आणि यशस्वी आहे. तसेच या जगात तोच वाचू शकतो जो एकजूट आहे, मुस्लिमांमध्ये ७२ पंथ असून यात पठाण, खान, शिया आणि सुन्नी आहेत. परंतु जेव्हा त्यांच्या धर्माचा विचार केला जातो तेव्हा ते फक्त मुस्लिम असतात.

Dhirendra Shastri: 'जिस दिन तिरंगे में चांद आ गया उस दिन...; धीरेंद्र शास्त्री नेमकं काय म्हणाले?
Dhirendra Shastri : गरबा खेळायला येणाऱ्यांवर गोमुत्र शिंपडा; धीरेंद्र शास्त्रींचा आयोजकांना अजब सल्ला, चर्चांना उधाण

भारतातील नऊ राज्यांमध्ये हिंदूंची घटती लोकसंख्या दर्शवते की आपण हिंदू असूनही, आपण एकत्र येऊ शकलो नाहीये. जर तुम्ही हिंदू विचारसरणी असलेल्यांव्यतिरिक्त इतर कोणत्याही हिंदूला विचारले तर ते स्वतःला वर्मा, शर्मा, पंडित किंवा इतर काही म्हणून ओळख सागंतात. पण माझी विनंती आहे,आपण सर्वांनी स्वत:ची ओळख स्वतःला जातीने नव्हे तर हिंदू म्हणून ओळख सांगावी.

हिंदूंना वाचवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे हिंदूंनी त्यांची लोकसंख्या वाढवणे. जर मुस्लीमांमध्ये प्रत्येकाला ३० मुले होऊ शकतात, तर हिंदूंना का होऊ शकत नाही? यामुळे हिंदूंनी ४ मुलांना जन्म दिला पाहिजे. दोन मुलं घरासाठी १ मुलगा स्वयंसेवक संघासाठी आणि एक १ मुलगा हिंदू राष्ट्रासाठी कामी येईल. हिंदूंमध्ये फूट पाडण्याचा कट रचला जातोय. जातीवादामुळे हिंदूना कमकूवत केलंय. यामुळे देशात जातीवाद नव्हे तर राष्ट्रवाद असला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com