Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान

Mahayuti: ठाण्यामध्ये महायुतीच्या वतीने लोकतंत्र बचाव यात्रा काढण्यात आली या यात्रेदरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर सडकून टीका केली. तसंच महायुतीवर देखील मोठं विधान केले.
Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान
Devendra Fadnavis -Eknath Shindesaam tv
Published On: 
  • एकनाथ शिंदे यांचे महायुतीच्या एकीवर मोठे विधान

  • महायुतीतील मतभेद बाजूला ठेवण्याचे एकनाथ शिंदे यांचे आवाहन

  • विधानपरिषद निवडणुकीतील पराभवानंतर महायुतीत वाद

विधानपरिषद मनिवडणुकीमध्ये झालेल्या पराभवानंतर महायुतीत वादाची ठिणगी उडाली आहे. भाजपने पराभवाचे खापर शिंदेसेनेवर फोडले. या सर्व वादादरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केले आहे. आपापसातले मतभेद सोडून द्या आणि एकत्र राहा, असे म्हणत एकनात शिंदे यांनी महायुतीच्या एकीवर वक्तव्य केले. ठाण्यातील महायुतीच्या लोकतंत्र बचाव पदयात्रेदरम्यान त्यांनी हे विधान केले. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील सडकून टीका केली. २०१९ मध्ये सर्वात मोठी व्होटचोरी झाल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, 'मित्रपक्षाच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम २०१९ मध्ये झाले. २०१९ मध्ये सर्वात मोठी व्होटचोरी झाली. नोटचोरी करणारे आता व्होटचोरीवर बोलत आहेत. विरोधक पुरावे देत नाहीत फक्त फेक नेरेटिव्ह पसरवत आहेत. ते राजकीय पोळी भाजत आहेत. देशात अराजकता पसरवण्याचे काम सुरू आहे. हे देश तोडणारे आहेत. देश जोडणारे फक्त मोदी आहेत. यांना आडवं करण्याचे काम करायचे आहे. हे काम आपल्याला चांगले जमते.'

Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान
Mahayuti Clash: महायुतीत दोस्तीत कुस्ती; सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रवादीची पुण्यात कोंडी?

एकनाथ शिंदे यांनी यावेळी तरुणांना मोदींसोबत उभे राहा असे आवाहन केले. ते म्हणाले की, 'तरुणांना माझी विनंती आहे मोदी तुमच्या पाठिशी आहे. तरुणाई चोर- भ्रष्टाचाऱ्यांच्या मागे येणार नाहीत. ते मोदींसोबतच राहणार आहे. मोदी हटवण्याच्या गोष्ट तुम्ही करत आहेत तर मोदी कधी हटणार नाही. जेवढी तुम्ही मोदींवर टीका कराल तेवढं तुम्ही खोल खड्ड्यात जाल. विरोधकांच्या आंदोलनात परकीय शक्तींचा हात आहे. हे देशाच्या विरोधात काम करत आहेत त्यांचा बुरखा फाडायचा आहे. सर्वोच्च न्यायालयावर मोर्चा हा संविधानचा आपमान आहे. त्यांना असा जमालगोटा द्या की २०२९ मध्ये उठलेच नाही पाहिजे.

Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान
Mahayuti Candidate List : पुणे, सोलापूर ते नाशिक, नागपूर; पाहा महायुतीच्या १७ उमेदवारांची यादी एका क्लिकवर

विरोधकांकडून मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप शिंदेंनी केला. ते म्हणाले की, 'विरोधकांकडून दबाव आणण्याचा प्रयत्न होत आहे. मोदींना बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. २०१४ च्या आधीचा आणि नंतरचा भारत बघा. कधी बॉम्बस्फोट झाले आहे का? देशाला लाभलेला पंतप्रधान हिंमतवान आहे. जशात तसे उत्तर देणारा आहे. काश्मीरच्या लालचौकात तिरंगा फडकला आहे ही हिंमत आजपर्यंत कुणामध्ये नव्हती. हे सगळं मोदींमुळे झालं आहे. मोंदींनी केले ते कुणीच करू शकत नाही. तरुणांनो तुमच्या खांद्याचा वापर दुसऱ्याला करून देऊ नका. मोदीजी तुमच्यासोबत आहेत.

Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान
Mahayuti dispute: महायुतीत पुन्हा बिनसलं? उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या दिल्ली दौऱ्यानं वाढली धडधड

तसंच, 'विरोधकांना देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास नकोय. देशाच विकास त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यांना कावीळ झाल्यासारखं सगळं पिवळं दिसत आहे. त्यांना औषध द्या नाही तर मी देईन. मी डॉक्टर नसलो तरी ऑपरेशन करतो. सत्ता येते सत्ता जाते पण देशभक्ती मनात ठेवणारे हे सच्चे देशभक्त असतात. भगवा आपण हातामध्ये ठेवला आहे त्याची ताकद कायम ठेवा. आपापसातले मतभेद बाजूला ठेवा आणि एकत्र काम करा. मोदींच्या मागे आपण ताकदीने उभे राहू या.', असा सल्ला त्यांनी आपल्या मित्रपक्षांना दिला आहे.

Maharashtra Politics: आपापसातले मतभेद सोडून द्या, एकत्र राहा; एकनाथ शिंदेचं महायुतीच्या एकीवर मोठं विधान
Mahayuti: छत्रपती संभाजीनगरात भाजप-शिंदेसेना आमनेसामने; पराभवावरून आमदारानं डिवचलं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.