पुणे शिक्षक मतदारांच्या यादीत अजब घोळ, मतदाराचं नाव 'बॉम्बस्फोट', वडिलांचं नाव 'बॉम्ब'

Maharashtra MLC Election 2026: राज्यात विधान परिषदेच्या 5 जागांसाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी आयोगानं मतदारसंघातील मतदारांची नोंदणीही केली. मात्र, यादी प्रसिद्ध झाल्यानंतर आयोग वादात सापडलाय. नेमकं प्रकरण काय आहे?
Pune Teachers Constituency voter list Bomb Blast name controversy
Pune Teachers Constituency voter list Bomb Blast name controversysaam tv
Published On: 

राज्यात लवकरच विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या एकूण 5 पाच जांगासाठी निवडणूक होणार आहे. मात्र, पुणे शिक्षक मतदारसंघाच्या अंतिम मतदार यादीतील नोंदीवरून नवा वाद पेटण्याची चिन्हे आहेत. पुणे शिक्षक मतदारसंघाच्या सातारा जिल्ह्याशी संबंधित यादीत मतदाराचे नाव आणि वडिलांच्या नावाच्या नोंदीची सध्या जोरदार चर्चा रंगलीये. पुणे शिक्षक निवडणुकीसाठी नोंदवण्यात आलेल्या मतदाराचं अजब नाव काय आहे ते आधी पाहूयात...

मतदाराचे नाव - प्रशांत दादासाहेबांचे बॉम्बस्फोट

वडिलांचे नाव - दादासाहेबांचा बॉम्ब

त्यामुळे पुणे शिक्षक मतदारसंघाची निवडणूक आता वादाच्या भोवऱ्यात सापडलीये. मतदार यादीतील घोळाविरोधात शिक्षक निवडणुकीसाठीच्या इच्छुक उमेदवारांनी थेट हायकोर्टात धाव घेतलीये...

शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी मतदारांची संख्या आणि पात्रता मर्यादित असते. त्यामुळे अशा प्रकारची नोंद मतदार यादीत कशी आली, असा प्रश्न उपस्थित केला जातोय. विशेष म्हणजे, 22 सप्टेंबरला निवडणूक जाहीर झाल्यानंतर अवघ्या 4 दिवसांनी मतदार नोंदणी बंद करण्यात आली. तसंच, गेल्या 5 वर्षांत मतदारांची संख्या 32 हजारांवरून 12 हजारांवर घसरल्यानं निवडणुकीच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यामुळे आधीच SIR प्रक्रियेमुळे मोठं वादंग निर्माण झालेलं असताना आता पुणे शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे निवडणूक आयोग पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलाय....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com