आदित्य ठाकरे प्रदीप पूर्णेकरांच्या घरी; एकनाथ शिंदे अ‍ॅक्शन मोडमध्ये; थेट पोलिस आयुक्तांना दिले आदेश

Eknath Shinde Calls Thane Police Commissioner: प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबीयांची आदित्य ठाकरे यांनी भेट घेतली. दरम्यान, हत्या प्रकरणाचे राजकारण करणे दुर्दैवी असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले.
EKANATH SHINDE ORDERS FAIR PROBE IN PRADEEP PURNEKAR
EKANATH SHINDE ORDERS FAIR PROBE IN PRADEEP PURNEKARsaam tv
Published On: 

प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येची घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे; मात्र घटनेचे राजकारण होणे त्याहून जास्त दुर्दैवी असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यात बोलताना व्यक्त केले. शिवसेना पुर्णेकर कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभी असून, या घटनेची निष्पक्ष चौकशी करण्याचे निर्देश आपण घटना घडल्यावर तत्काळ ठाणे पोलीस आयुक्तांना दिले असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

EKANATH SHINDE ORDERS FAIR PROBE IN PRADEEP PURNEKAR
Pune : पिंपरी-चिंचवड महापालिकेत एसीबीचा मोठा छापा; मुख्य अभियंता लाच घेताना जाळ्यात

दरम्यान, मीनाक्षी शिंदे यांनी आपल्या पदाचा राजीनामा माझ्याकडे पाठवला असून, पूर्णेकर हत्या प्रकरणाशी त्यांचे नाव वारंवार जोडले जात असल्याने त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत हा निर्णय घेतला असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. या राजीनाम्यामध्ये त्यांनी या दुर्दैवी घटनेचा उल्लेख केला असून, त्या घटनेशी आपले नाव वारंवार जोडले जात असल्याने पक्षाला त्रास होत असल्याची भावना व्यक्त केली आहे.

EKANATH SHINDE ORDERS FAIR PROBE IN PRADEEP PURNEKAR
Pune : पुण्यात इंजिनियरिंग शिक्षण घेणाऱ्या २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?

पूर्णेकर हत्या प्रकरणाबाबत बोलताना शिंदे म्हणाले की, संबंधित घटना अत्यंत दुर्दैवी आणि दुःखद आहे. मात्र या घटनेचे राजकीय भांडवल करणे त्याहून अधिक दुर्दैवी आहे. या प्रकरणातील कायदेशीर प्रक्रिया सुरू असून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. शस्त्रही जप्त करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे. पहिल्याच दिवशी मी स्वतः पोलीस आयुक्तांना फोन करून या घटनेचा तपास निष्पक्षपणे झाला पाहिजे. कोणालाही पाठीशी घालण्याचे कारण नाही,” असे सांगितल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे तपास यंत्रणेवर दबाव आणण्याऐवजी पोलिसांना त्यांचे काम करू द्यावे आणि जनतेनेही संयम राखावा, असे आवाहन त्यांनी केले. पूर्णेकर कुटुंबीयांच्या दुःखात आम्ही सहभागी असून, या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी स्पष्ट भूमिका मांडली.

EKANATH SHINDE ORDERS FAIR PROBE IN PRADEEP PURNEKAR
Pune Police: वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यासह महिला पोलिसाचं तडकाफडकी निलंबन, पुणे पोलिस दलात खळबळ; कारणेही तितकीच धक्कादायक

ठाण्यातील कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही शिंदे यांनी भाष्य केले. बाहेरून येणाऱ्या काही लोकांकडून ठाणेकरांना त्रास देण्याचे प्रकार सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. जाळपोळ, महामार्ग बंद करणे, नौपाड्यात पोलिसांवर दगडफेक होणे आणि पोलिस जखमी होणे, या प्रकारांवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. ठाणेकरांच्या शांततेला धक्का लागू देणार नाही आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवणे ही सरकारची जबाबदारी आहे, असे शिंदे यांनी स्पष्ट केले. वाहतूक कोंडीमुळे नागरिकांना त्रास होणार नाही, याची काळजी घेण्याच्या सूचनाही दिल्याचे त्यांनी सांगितले.

शिवसेना कायमच युतीधर्माचे पालन करते

विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना-भाजप युतीच्या भूमिकेबाबतही शिंदे यांनी स्पष्ट संदेश दिला. शिवसेना नेहमी युतीधर्म पाळते आणि युतीधर्माचे पालन झाले पाहिजे, ही शिवसेनेची भूमिका कायम आहे, असे त्यांनी सांगितले. युतीमध्ये काही ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती झाल्या असल्या तरीही या निवडणुकीत शिवसेनेने युतीधर्म पाळला असल्याचे शिंदे यांनी आवर्जून नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.