सावधान, मुंबईसाठी पुढचे 3 तास महत्त्वाचे ! अतिमुसळधार पावसाचा इशारा; महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

Mumbai Rain Alert : हवामान विभागाने पुढील तीन तास मुंबईत अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे उद्भवणाऱ्या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत मिळावी यासाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आले आहेत.
Mumbai Rain  Alert
MUMBAI RAIN ALERT: NEXT 3 HOURS CRUCIAL AS IMD WARNS OF EXTREMELY HEAVY RAINFALLsaam tv
Published On
Summary
  • मुंबईसाठी पुढील तीन तास अतिमुसळधार पावसाचा इशारा

  • दादर, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंडसह अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू आहे.

  • महापालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करत आपत्कालीन हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत.

मुंबईत सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे. दादर, माटुंगा, सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडूप आणि मुलुंड परिसरात पावसाची तुफान बॅटिंग सुरू आहे. अजूनही : मुंबईकरांवरील पावसाचे संकट अजून टळलेले नाही, कारण हवामान विभागाकडून पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती देण्यात आली आहे.

Mumbai Rain  Alert
Navi Mumbai: सहा मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू , मुलगी जखमी

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले आहे. अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. अंधेरी सबवेमध्ये सुमारे अडीच फुटांपर्यंत पाणी साचल्याने येथील वाहतुकीचा खोळंबा झालाय. वीरा देसाई रोडही पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. गोरेगावच्या फिल्म सिटी रोड आणि संतोषनगर परिसरातील मुख्य रस्त्यांवर 2 ते 3 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. अशात मुंबईसाठी नवीन इशारा हवामान विभागाने दिला आहे.

महापालिकेकडून हेल्पलाईन नंबर जारी

पुढील तीन तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पाऊस होईल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुढचे तीन तास पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. यासाठी दक्षता म्हणून आपात्कालीन नंबर जारी करण्यात आलाय. 196 हा आपात्कालीन कक्षाचा नंबर आहे. मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे काम असेल तरच बाहेर पडा, अशी सुचना महापौर रितू तावडे यांनी दिली आहे.

Mumbai Rain  Alert
Weather Update: महाराष्ट्रासह २३ राज्यात वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा अलर्ट

नवी मुंबईतील सानपाडा परिसरात रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. अनेक वाहने पाण्यात बुडाली आहेत. सायन-पनवेल हायवेवर पाणी साचल्याने मैलोन्मैल वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. रायगड जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com