Navi Mumbai: सहा मजली इमारतीचा स्लॅब कोसळला; ३९ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू , मुलगी जखमी

Ceiling Slab Collapse Man Died : नवी मुंबईतील कामोठे सेक्टर १० येथील साई सिद्धी सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडली. बेडरूमचा स्लॅब कोसळल्याने ३९ वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला.
Ceiling Slab Collapse  Man Died
Navi Mumbai Shocker: Ceiling Slab Collapse Kills Father, Injures 12-Year-Old Daughter
Published On

विकास मिरगणे, साम प्रतिनिधी

राज्यातील अनेक जिल्ह्यात पावसानं धुमाकूळ घातलाय. मुंबईसह उपनगरात मुसळधार पाऊस होत आहे. पावसामुळे अनेक ठिकाणी झाडं कोसळल्याची घटना घडल्या. तर जोरदार पावसामुळे शहरातील वाहतूक मंदावली आहे. तर काही नुकसानीच्या घटना घडल्या, काही ठिकाणी जीवितहानी झाली आहे. नवी मुंबईतील कोमोठे येथे इमारतीच्या एका प्लॅटचा स्लॅब कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय.

कामोठे सेक्टर १० मधील साई सिद्धी सोसायटीत घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत घरातील बेडरूमचा स्लॅब कोसळून ३९ वर्षीय सुरेश लोखंडे यांचा मृत्यू झाला, तर त्यांची १२ वर्षीय मुलगी वेदिका लोखंडे जखमी झाली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून इमारतीच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.

Ceiling Slab Collapse  Man Died
Navi Mumbai: पाण्यात पसरलं हायव्होल्टेज करंट; विजेचा धक्का लागून २ कॉलेज विद्यार्थिनी गंभीर जखमी, नवी मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

कामोठे सेक्टर १०, प्लॉट क्रमांक ६१ येथील सहा मजली साई सिद्धी सोसायटीमधील फ्लॅट क्रमांक १०१ मध्ये सुरेश लोखंडे आपल्या कुटुंबासह राहत होते. बुधवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास सुरेश लोखंडे आणि त्यांची मुलगी वेदिका बेडरूममध्ये झोपलेले असताना अचानक बेडरूममधील स्लॅबचा काही भाग कोसळला.

Ceiling Slab Collapse  Man Died
Mumbai rain: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत पावसाचा धुमाकूळ; रस्ते पाण्याखाली- नागरिकांचे हाल, पुढचे २ दिवस सतर्कतेचे

या दुर्घटनेत स्लॅबचा मोठा भाग सुरेश लोखंडे यांच्या छातीवर व शरीरावर पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर काही भाग मुलगी वेदिकाच्या अंगावर पडल्याने ती जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच सोसायटीतील रहिवाशांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी सुरेश लोखंडे यांना मृत घोषित केले. जखमी वेदिका लोखंडे हिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com