Maharashtra Cabinet Meeting : त्या शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?

Maharashtra Cabinet Meeting update : महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या जमिनीविषयी राज्य सरकारने महत्वाचा निर्णय घेतलाय. या निर्णयामुळे हजारो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.
त्या शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Maharashtra Government saam tv
Published On

मुंबई: राज्य सरकारची आज गुरुवारी कॅबिनेट बैठक पार पडली. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसाठी महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीत आकारी पड जमिनी मूळ खातेदारांना परत करण्याविषयी निर्णय झाला. हा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत सुधारणा करण्यात आल्याची माहिती हाती आली आहे.

आज गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांसापासून सरकारी कामगारांपर्यंत महत्वाचे निर्णय घेण्यात आले. महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत १९६६ च्या कलम २२० मध्ये सुधारणा करण्यासाठी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते.

त्या शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Cabinet Meeting : नव्या सरकारची नव्या वर्षाची पहिली बैठक, अजित पवार गैरहजर राहणार?

मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेल्या सुधारणांमुळे शासकीय थकबाकीपोटी लिलाव होऊन सरकारजमा झालेल्या सुमारे ४ हजार ८४९ एकर आकारी पड जमिनी शेतकऱ्यांना परत दिल्या जाणार आहेत. या निर्णयाने छोट्या आणि अल्प भूधारक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या बैठकीत सुधारणा विधेयक मांडण्यास मंजूरी देण्यात आलीय.

तगाई किंवा तत्सम थकबाकी न भरल्याने महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० नुसार अशा जमिनींचा लिलाव होऊन त्या आकारी पड म्हणून शासन जमा करण्यात येताहेत. अशा जमिनी थकबाकीची देय रक्कम आणि त्यावरील व्याज १२ वर्षाच्या आत भरणा केल्यास मूळ खातेदारांना परत करण्याची तरतूद कायद्यात आहे.

त्या शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Mahayuti Cabinet: महायुतीच्या 62 टक्के मंत्री डागाळलेले,17 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, कोणत्या पक्षाचे किती मंत्री?

१२ वर्षांचा कालावधी पूर्ण झाल्यावर असा जमिनी मूळ मालकांना परत करण्याची तरतूद नव्हती. आता अशा जमिनी प्रचलित बाजारमूल्याच्या २५% रक्कम वसूल करून मूळ खातेदारांना किंवा त्यांच्या वारसांना परत करण्याची तरतूद महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम २२० मध्ये करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. तसेच विधेयक विधानमंडळाच्या आगामी अधिवेशनात सादर करण्यात येईल.

त्या शेतकऱ्यांना सरकार देणार जमिनी; फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, नेमका कुणाला लाभ?
Cabinet Room 602 : मंत्रालयातील खोली क्र. 602 चं गुढ काय? पाहा स्पेशल रिपोर्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com