Cabinet Meeting: शासकीय कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, 'या' बँकेत येणार वेतन

State Government Decision On Employee Salary: सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आता मुंबई मध्यवर्ती बँकेतून मिळणार आहेत.
Cabinet Meeting
State Government Decision On EmployeeMint
Published On

राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. आता कर्मचाऱ्यांचा पगार भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेत जिल्हा मध्यवर्ती बँकेत जमा होणार आहेत. ज्या सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार थकले होते त्या कर्मचाऱ्यांचे पगार सुद्धा याच बँकेतून मिळणार आहेत. याबाबतचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली, यात कर्मचाऱ्यांच्या पगाराविषयी निर्णय घेण्यात आला.

शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते प्रदान करण्यासाठी तसेच महामंडळ, सार्वजनिक उपक्रम यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीसाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते उघडण्यास परवानगी सरकारने दिलीय. सन २०२४-२०२५ या वर्षासाठी मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्त्यांचे प्रदान करण्यासाठी संबंधित आहरण व संवितरण अधिकाऱ्यांना बँक खाते उघडण्यास मान्यता देण्यात आली.

Cabinet Meeting
UCO Bank Job: युको बँकेत अधिकारी होण्याची संधी; ६२ रिक्त पदांसाठी भरती सुरु, पात्रता काय? जाणून घ्या सविस्तर

तसेच निवृत्तीवेतनधारकांची वैयक्तिक बँक खाते उघडण्याकरीता तसेच शासनाच्या सार्वजनिक उपक्रम , महामंडळे यांच्याकडील अतिरिक्त निधी गुंतवणूकीकरीता बँकेस प्राधिकृत करण्यास देखील बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. विशेष म्हणजे भाजप नेते प्रवीण दरेकर अध्यक्ष असलेल्या मुंबई बँकेत कर्मचाऱ्यांचे वेतन आणि भत्ते जमा केले जाणार असल्याचा निर्णय घेतलाय त्यामुळे या निर्णयावरही विरोधक जोरदार टीका करण्याची शक्यता आहे.

Cabinet Meeting
Pravin Darekar : महाविकास आघाडीच्या सत्तेसाठी मनोज जरांगेंनी सुपारी घेतलीये: प्रवीण दरेकर

मंत्रिमंडळाच्या निर्णयानंतर प्रविण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिलीय. शासनाच्या यादीवर मुंबई जिल्हा बँकेला घेऊन व्यवहार करण्याची मुभा दिल्याबद्दल शासनाचे आभार. ज्या जिल्हा बँकेला सलग अ वर्ग आहे, अशा बँकांना व्यवहार करण्याला परवानगी असते. हा निकषामध्ये मुंबई जिल्हा बँक बसत आहे. अनेक योजना आणि सरकारी उपक्रमांना मुंबई जिल्हा बँकेची मदत दिलीय. लाडक्या बहिणींची ७० हजार झिरो बॅलन्स खाती उघडण्याचा निर्णय एकमेव मुंबई जिल्हा बँकेने घेतल्याची माहितीही दरेकर यांनी यावेळी दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com