
मंत्रालयातील एका गूढ खोलीची राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो. त्या मंत्रालयातही अंधश्रद्धा जोपासली जातेय. कारण कक्ष क्रमांक 602 मध्ये कार्यरत असणाऱ्या मंत्र्याबाबत नेहमीच वाईट घडतं, अशी चर्चा आहे. त्यामुळे 602 क्रमांकाचा कक्ष नको रे बाबा...असं म्हणण्याची वेळ आली आहे.
बहुमत मिळाल्यानं मोठ्या आत्मविश्वासाने महायुती सरकार कामाला लागलं आहे. मंत्र्यांना नुकतंच बंगल्यांचंही वाटप झालं आहे. तिजोरीत खडखडाट असताना मंत्र्यांच्या दालनाचं नुतनीकरण सुरु आहे. महायुतीतल्या तिन्ही पक्षातील नाराजीनाट्य आणि राज्यातल्या वाढत्या गुन्हेगारीबाबत चर्चा असतानाच राजकीय अंधश्रद्धेवरही चर्चा सुरू आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांना मिळालेली मंत्रालयातील खोली क्रमांक 602 सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. काय तिचे गूढ पाहूया.
मंत्रालयातील खोली क्र. 602 चं गुढ काय?
- अडीच दशकांपासून ज्या मंत्र्यांना ही कॅबीन मिळाली त्यांना वाईट गोष्टींचा सामना करावा लागल्याची चर्चा
- १९९९ तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री छगन भुजबळ यांना कॅबीन मिळाल्यानंतर २००३ मध्ये त्यांचं नाव तेलगी प्रकरणात आलं
- अजित पवारांचा सिंचन घोटाळ्यात नाव आल्यानंतर राजीनामा
- २०१४ एकनाथ खडसे यांचं नाव जमीन घोटाळ्यात आल्याने गच्छंती
- भाजपेच पांडुरंग फुंडकर यांचा २०१८ मध्ये अचानक हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
- भाजपा नेते अनिल बोंडे यांचा २०१९ मध्ये निवडणुकीत पराभव
- सध्या 602 हे कक्ष भाजपाचे मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्या सामाजिक कार्य विभागाकडे
- 602 क्रमांकाच्या कॅबीनचा इतिहास पाहाता शिवेंद्रराजे यांच्या समर्थकांकडून चिंता
- 602 कॅबीनचा वापर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सुरू तर शिवेंद्रराजेंचं कामकाज शेजारच्या कॅबीनमधून सुरू
महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना मिळालेला 'रामटेक' बंगलाही अशाच काही कारणांमुळे त्यांनी नाकारला आहे. पुरोगामी महाराष्ट्रात राज्याचा कारभार चालणार मंत्रालय हे पॉवर सेंटरच अंधश्रद्धेच्या विळख्यात अडकल्याची चर्चा रंगलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.