Onion Farmer: कांदा उत्पादकांचे 500 कोटी बुडाले; कांद्याचे भाव जवळपास 55 टक्क्यांनी कमी

Onion Farmer Loss 500 Crore : राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी रडकुंडीला आलाय. बाजारात कांद्यांचे दर खाली आल्याने बळीराजाच मोठं नुकसान झालंय.
Onion Farmer
Onion Farmer Loss 500 Crore Mint
Published On

कांद्याचे भाव जवळपास 55 टक्क्यांनी कमी झाले आहेत. आठवड्यात राज्यातील बाजारात अडीच लाख टन कांद्याची आवक झाली होती. क्विंटलमागे दोन हजारांची घट गृहीत धरली तरी राज्यातील कांदा उत्पादकांना मागील सात दिवसांमध्येच तब्बल 500 कोटींचा फटका बसलाय. पाहूया एक रिपोर्ट. बाजारात खरीप कांद्याची आवक वाढली आहे.

सोलापूर, नगर तसेच नाशिक जिल्ह्यांतील बाजारांमधील आवक जास्त दिसत आहे. कांद्याचे दर पडल्याने शेतकरी मात्र रडकुंडीला आलाय. उत्पादन खर्चही निघत नसल्यानं कांदा उत्पादक शेतकरी हतबल झालाय. गेल्या आठवड्यात राज्यात काय चित्र होत ते पाहूया. राज्यातील बाजारांमध्ये मागील 7 दिवसांमध्ये जवळपास अडीच लाख टन कांदा विक्रीसाठी आला होता. तर भावपातळी सरासरी 1700 ते 2200 रुपयांच्या दरम्यान राहिली. दोन आठवड्यांपूर्वीचा भाव 3500 ते 4 हजार रुपये होता.

Onion Farmer
Nashik Farmer : बायकोचे दागिने गहाण ठेवून कांदा पिकवला, पण भावच मिळाला नाही; रडत रडत शेतकऱ्याने घेतली मोठी शपथ

या भावाशी जर आपण तुलना केली तर भावात 55 टक्क्यांपर्यंत घसरण झाली आहे. क्विंटलमागे दोन हजारांची घट गृहीत धरली तरी कांदा उत्पादकांना 500 कोटींचा फटका बसलाय. त्यामुळे शेतकरी 20% निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करतायत. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडलाय. एकीकडे पडलेले बाजारभाव तर दुसरीकडे वातावरणातील बदलामुळे कांदा शेतातच सडण्यास सुरुवात झालीय.

Onion Farmer
Onion Market : कांदा दराबाबत शेतकरी संतप्त; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

महाराष्ट्रासोबतच मध्य प्रदेश, राजस्थान, गुजरात, पंजाब, हरियाना आणि तमिळनाडू राज्यांतही आवक हळूहळू सुधारताना दिसत आहे. आवक वाढून भाव पडल्याने निर्यात शुल्क काढून कांदा निर्यातीला प्रोत्साहन देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. राज्यातील नेत्यांनी केंद्राकडे तसा पाठपुरावा केला. कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी आहे. मात्र निर्यात शुल्कामुळे आपल्या कांद्याचे भाव वाढतात. केंद्र सरकार यावर काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com