Onion Market : कांदा दराबाबत शेतकरी संतप्त; लासलगाव बाजार समितीत शेतकऱ्यांनी लिलाव पाडला बंद

Manmad Nashik News : कांद्याचे सरासरी बाजार भाव सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त लासलगाव येथे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद
Lasalgaon Bajar Samiti
Lasalgaon Bajar SamitiSaam tv
Published On

अजय सोनवणे 

मनमाड (नाशिक) : लासलगावसह देशांतर्गत कांद्याची मोठी आवक विक्रीसाठी दाखल होत असल्याने लासलगाव बाजार समितीत गेल्या दहा दिवसात कांद्याच्या बाजारभावात २५०० रुपयांची मोठी घसरण झाली आहे. कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाले आहेत. यावेळी लासलगाव येथील बाजार समितीत सकाळी शेतकऱ्यांनी कांद्याचे होणारे लिलाव बंद पाडले आहेत. 

मागील काही दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण होत असल्याचे पाहण्यास मिळत आहे. यामुळे कांद्याचे सरासरी बाजार भाव सोळाशे ते सतराशे रुपयांपर्यंत कोसळल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाला आहे. यामुळे लासलगाव येथे शेतकऱ्यांनी कांद्याचे लिलाव बंद पडून आपला निषेध व्यक्त केला आहे. 

Lasalgaon Bajar Samiti
Dharangaon Crime : वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला; गिरणा नदीत मध्यरात्रीची घटना

कांदा निर्यातीवर असलेले २० टक्के निर्यात शुल्क हटवण्याची मागणी करत विक्री झालेल्या कांद्याला एक हजार ते दोन हजार रुपये अनुदान देण्याची मागणी यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी केली. आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सकाळच्या सत्रात ८०० वाहनातून कांद्याची आवक दाखल झाली. कांद्याला जास्तीत जास्त २५०१ रुपये, तर कमीत कमी ७०० रुपये तर सरासरी २७०० रुपये भाव मिळाला. प्रतिक्विंटलला बाजार भाव मिळाल्यामुळे दररोज कांद्याच्या घसरणीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. 

Lasalgaon Bajar Samiti
Sangli District Bank : जिल्हा बँकेकडून कर्जदारांना जप्तीची नोटीस; वसुलीसाठी सांगली जिल्हा बँक ऍक्शन मोडवर

सोलापुरातही कांदा लिलाव बंद 

दरम्यान सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी पुकारलेल्या बंदनंतर प्रशासन आणि कामगारांमध्ये बैठक झाली. या बैठकीनंतर देखील माथाडी कामागर आज दिवसभर काम करणार नसल्याच्या भूमिकेवर ठाम राहिले. दरम्यान आज सोलापुरात कांद्याचे लिलाव होणार नाही. माथाडी कामगार काम करणार नसल्याने आज दिवसभरात कांद्याचे लिलाव होणार नाही. मात्र शेतकऱ्यांनी बाजारात आणलेला कांदा संध्याकाळनंतर उतरवून घेतला जाणार आहे. मात्र कांद्याचे लिलाव उद्या सकाळी नेहमीप्रमाणे होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com