Dharangaon Crime : वाळू माफियांचा महसूलच्या पथकावर प्राणघातक हल्ला; गिरणा नदीत मध्यरात्रीची घटना

Jalgaon News : नदी मधून वाळू वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठीचा लिलाव झाला नसल्याने वाळू उपसा करण्यास बंदी तरी गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात चोरून वाळूची वाहतूक
Dharangaon Crime
Dharangaon CrimeSaam tv
Published On

जळगाव : नदी पात्रातून सध्या वाळू उपसा करण्यास मनाई आहे. तरी देखील छुप्या पद्धतीने वाळूचा उपसा करून अवैध वाळू वाहतूक सुरु आहे. अशाच प्रकारे अवैध वाळू वाहतूक रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर वाळू माफियांनी प्राणघातक हल्ला केला. सदरची धक्कादायक घटना धरणगाव तालुक्यातील चांदसर येथे घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. 

नदी मधून वाळू वाहतूक करण्यास मनाई करण्यात आलेली आहे. गिरणा नदीतील वाळू उपसा करण्यासाठीचा लिलाव झाला नसल्याने नदीतून वाळू उपसा करण्यास बंदी करण्यात आलेली आहे. असे असले तरी गिरणा नदीतून मोठ्या प्रमाणात चोरून वाळूची वाहतूक करण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनाला न जुमानता वाळू माफिया चोरून वाळूची मोठ्या प्रमाणात वाहतूक करताना दिसून येत असतात. 

Dharangaon Crime
Plastic Ban : बंदी असलेल्या ३७५ किलो कॅरीबॅग जप्त; नंदुरबार पालिकेची मोठी कारवाई

रात्रीच होते वाळू वाहतूक 

दिवसा वाळूची वाहतूक करता येणे शक्य नसल्याने रात्रीच्या अंधारात चोरटी वाहतूक केली जात असते. प्रामुख्याने बांभोरी, निमखेडी, आव्हाणे, चांदसर या ठिकाणाहून रात्रीच्या वेळी छुप्या पद्धतीने वाळू वाहतूक करण्यात येत असते. शिवाय हि वाली वाहतूक रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनातील अधिकारी किंवा पोलिसांवर वाळू माफियांकडून हल्ला चढविला जात असल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यानुसारच चांदसर येथे रात्री महसूल पथकावर हल्ला करण्यात आला आहे. 

Dharangaon Crime
Hingoli Crime : धक्कादायक.. खुनाच्या आरोपातील संशयिताचा कोठडीतून व्हिडिओ कॉल; पैशांसाठी पोलिसानेच करून दिले संभाषण

जीव वाचविण्यासाठी अंधारात पळत सुटले   

धरणगाव तालुक्यातील चांदसर बु. गावाच्या गिरणा नदी पात्रात हा थरार घडला आहे. मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास गस्तीवर असलेल्या महसूल पथकावर या वाळू माफियांनी अचानक हल्ला केल्याची खळबळजनक घटना. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर महसूल पथकातील सदस्य जीव वाचवण्यासाठी नदीपात्रात वाट दिसेल तिकडे पळत सुटले होते. या घटनेने खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com