Plastic Ban : बंदी असलेल्या ३७५ किलो कॅरीबॅग जप्त; नंदुरबार पालिकेची मोठी कारवाई

Nandurbar News : बंदी असतानाही कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे ठिकठिकाणी पाहण्यास मिळते. या विरोधात नंदुरबार नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला, विक्री अथवा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई
Nandurbar Corporation
Plastic BanSaam tv
Published On

सागर निकवाडे

नंदुरबार : राज्यात एकल प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली आहे. असे असताना देखील सर्रासपणे प्लास्टिक पिशव्यांचा वापर केला जात आहे. यामुळे नांदुरबार शहरात पालिकेच्या वतीने कारवाई करण्यात आली आहे. यात पालिका प्रशासनाने विक्रेत्यांकडून तब्बल ३७५ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. 

एकल प्लास्टिक अर्थात कॅरीबॅग वापरावर बंदी करण्यात आली आहे. प्लास्टिक पिशवी विक्री अथवा वापर करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचे आदेश आहेत. मात्र बंदी असतानाही कॅरीबॅगचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याचे ठिकठिकाणी पाहण्यास मिळते. या विरोधात नंदुरबार नगरपालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यात प्रामुख्याने विक्री करणाऱ्यांवर हि कारवाई करण्यात आली आहे. 

Nandurbar Corporation
Gharkul Yojana : घरकुल लाभार्थ्यांचे केंद्राकडे १८ कोटी थकले; अनुदान नसल्याने घराचे काम अपूर्णच

आठवडाभरापासून कारवाई 

नंदुरबार पालिका हद्दीत मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांच्या वापर मोठ्या प्रमाणात सुरू असल्याचे निदर्शनास आले होते. यामुळे सदरची बाब लक्षात घेता नंदुरबार पालिकेने कारवाईची धडक मोहीम राबविली आहे. साधारण आठवडाभर राबविण्यात आलेल्या मोहिमेदरम्यान झालेल्या कारवाईमध्ये ३७५ किलो एकल वापर प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करण्यात आल्या आहेत. त्यांची एकूण किंमत १० हजार रुपये आहे.

Nandurbar Corporation
Pimpri Chinchwad Crime : पिंपरी चिंचवडमधील घरफोडीतील संशयित महिला ताब्यात; ९ तोळे दागिने हस्तगत

कारवाई सुरूच राहणार 

नंदुरबार पालिकेकडून शहरात राबविण्यात आलेल्या कारवाईने कॅरीबॅग विक्री व वापर करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे. दरम्यान मागील आठवड्यापासून कारवाई करण्यात येत असून या आठवड्यात देखील अशा प्रकारची कारवाई सुरू राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र पथक स्थापन करण्यात आले असल्याची माहिती पालिका मुख्याधिकारी यांनी दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com