Mahayuti Cabinet: महायुतीच्या 62 टक्के मंत्री डागाळलेले,17 मंत्र्यांवर गंभीर गुन्हे, कोणत्या पक्षाचे किती मंत्री?

Mahayuti Minister Case Registered: महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात समाविष्ट झालेल्या मंत्र्यांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सरकारमधील जवळपास ६२ टक्के मंत्री डागाळलेले आहेत.
Mahayuti Cabinet
Mahayuti Minister Case Registeredsaam tv
Published On

भरत मोहळकर, साम प्रतिनिधी

महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह 42 मंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र या मंत्रिमंडळात तब्बल 26 टक्के मंत्र्यांवर गुन्हे दाखल असल्याचं समोर आलंय. यामध्ये 17 मंत्र्यांवर भ्रष्टाचार, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण, फसवणूक, शासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे किंवा मारहाणीचा प्रयत्न करण्याच्या कलमांखाली गुन्हे दाखल असल्याचं समोर आलं आहे. पाहुयात कोणत्या मंत्र्यांवर किती गुन्हे दाखल आहेत?

१) नितेश राणे

एकूण केस- ३८

गंभीर गुन्ह्यांची कलमं- ६६

हत्येचा प्रयत्न, खंडणी, फसवणूक, अपहरण, चिथावणीखोर वक्तव्य यासारखे गंभीर गुन्हे आहेत

२) अजित पवार

एकूण गुन्हे – ४०

गंभीर गुन्हे – २०

अजित पवारांवर भ्रष्टाचाराच्या विविध कलमांखाली गंभीर गुन्हे दाखल आहेत.

३) जयकुमार गोरे

एकूण केस- ५

विविध १८ कलमांतर्गत गंभीर गुन्हे दाखल

हत्येचा प्रयत्न, फसवणूक, नकली कागदपत्रं बनवणं, याबरोबरच भ्रष्टाचाराचे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

४) शिवेंद्रराजे भोसले

केस-ल ०६

विविध १६ गंभीर स्वरुपाच्या कलमांतर्गत गुन्हे दाखल

हत्येचा प्रयत्न, फसवणूक, कागदपत्रांची छेडछाड, शासकीय कामात अडथळा आणणे, अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल आहेत

५) गिरीश महाजन

केस- ०२

विविध १२ कलमांतर्गत गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल

फसवणूक, अपहरण, खंडणी, चोरी अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत

६) जयकुमार रावल

केस- २

गंभीर कलमांतर्गत गुन्हे- ९

फसवणूक, खात्याची चुकीची माहिती देणे, संपत्ती बळकावण्याचा प्रयत्न अशा गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल.

७) धनंजय मुंडे

केस- ४

गंभीर स्वरुपाची कलमं- ६

फसवणूक, अपहरण यासारखे गंभीर गुन्हे आहेत

८) हसन मुश्रीफ

केस- ३

गंभीर स्वरुपाची कलमं- ६

भ्रष्टाचाराच्या कलमांसह फसवणूकीचे गंभीर गुन्हे

९) प्रताप सरनाईक

केस- ९

गंभीर कलमं- ५

पीएमएलए कायदा, भ्रष्टाचार, खंडणी यासारखे गंभीर गुन्हे

१०) संजय शिरसाट

केस- ३

गंभीर कलमांतर्गत गुन्हे- ४

फसवणूक, स्वतःला शस्त्राने दुखापत करणे, यासारखे गंभीर गुन्हे आहेत

११) माणिकराव कोकाटे

केस-१

गंभीर कलमांतर्गत गुन्हा- ६

कागदपत्रांची छेडछाड, फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे आहेत.

Mahayuti Cabinet
Maharashtra Politics : महायुतीचं खातेवाटप ठरलं? कोणाला कोणते खाते मिळणार? वाचा एका क्लिकवर

१३) एकनाथ शिंदे

केस- ९

गंभीर -२

निवडणुकीत प्रभाव टाकण्यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद

१३) देवेंद्र फडणवीस

केस- ४

गंभीर कलमं- २

फसवणूकीच्या गंभीर गुन्ह्याची नोंद

१४) चंद्रकांत पाटील

केस – २

गंभीर कलमं- २

दरोडा तसंच गंभीर दुखापत करण्याचा प्रयत्न आणि दरोड्याची तयारी या गंभीर कलमांखाली गुन्हा.

१५) मंगलप्रभात लोढा

केस -२

गंभीर – १

शासकीय अधिकाऱ्याचा अपमान करणे

२६) गणेश नाईक

केस- २

गंभीर गुन्हे- १

शासकीय अधिकाऱ्याला धमकावणे याबरोबरच आंदोलन पेटवण्याचा प्रयत्न

१७) विखे पाटील

केस- १

गंभीर केस- १

शासकीय अधिकाऱ्याला धमकावण्यासारखा गंभीर गुन्हा

Mahayuti Cabinet
Cabinet Expansion: निष्ठावंतांना डच्चू, आयारामांची चंगळ, भाजपने मंत्रिपदासाठी वापरला 60-40 फॉर्म्युला?

गंभीर गुन्हे दाखल नसलेले मंत्री

मेघना बोर्डीकर

केस -१२

आकाश फुंडकर

केस -६

चंद्रशेखर बावनकुळे

केस- ४

संजय राठोड

केस- २

आशिष शेलार

केस- १

पंकज भोयर

केस १

आशिष जयस्वाल

केस-१

भरत गोगावले

केस-१

पंकजा मुंडे

केस -२

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com