

फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळाचा निर्णयांचा धडाका
मुख्यमंत्री फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्वाची बैठक
शेती, विद्यार्थ्यांसाठी घेतले महत्वाचा निर्णय
फडणवीस सरकारने नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी निर्णयांचा धडाका लावला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक झाली. मंत्रिमंडळाने आज बुधवारी ५ महत्वाचे निर्णय घेतले. यात शेतीसाठी सिंचन,शिष्यवृत्तीत वाढ या निर्णयांचा समावेश आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत काय निर्णय घेण्यात आले?
अहिल्यानगर जिल्ह्यातील साकळाई उपसा सिंचन योजनेसाठी १ हजार २३४ कोटी रुपयांच्या तरतूदीस मान्यता देण्यात आली आहे. सुमारे ३२ अवर्षणग्रस्त गावांना लाभ होणार आहे. यासाठी ९ हजार ६०० हेक्टर क्षेत्राला सिंचन सुविधा मिळणार मिळणार आहे. (जलसंपदा, विभाग)
महाराष्ट्र राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण स्थापन करण्यात येणार आहे. राज्यातील ५४ नदी प्रदुषित पट्ट्यांबाबत पूनरूज्जीवन प्रकल्प राबविण्यात येणार आहे. (पर्यावरण व वातावरणीय बदल, विभाग )
अमरावती महापालिकेला क्रीडा संकुलासाठी मौजे नवसारी येथील १६७०८ चौ.मी.जागा निश्चित करण्यात आली आहे. (महसूल, नोंदणी व मुद्रांक शुल्क, विभाग)
अनुसूचित जाती आरक्षण उपवर्गीकरणाबाबत निवेदन देण्यात येणार आहे. अर्जांबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येणार आहे. (सामाजिक न्याय विभाग)
भूमि अभिलेख विभागात आता भूकरमापक पदाऐवजी परिरक्षण भूमापक पद असणार आहे. हे पद पदोन्नती आणि विभागीय भरतीद्वारे भरता येणार आहे. यामुळे राज्यातील भूकरमापक संवर्गातील कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. (महसूल विभाग)
राज्यातील हजारो दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ करण्यात आली आहे. आठवी ते बारावीच्या दिव्यांग विद्यार्थांना मोठा दिलासा मिळाला आहे. तब्बल बारा वर्षानंतर शिष्यवृत्तीच्या रकमेत वाढ करण्यात आली आहे. (दिव्यांग कल्याण विभाग)
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.