Eknath Shinde On Budget 2024 : रोटी, कपडा, मकान देणारा मोदी सरकारचा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

CM Eknath Shinde On Budget 2024: रोटी, कपडा, मकान देणारं मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
CM Eknath Shinde On Budget 2024
CM Eknath Shinde On Budget 2024Saam Tv
Published On

CM Eknath Shinde On Budget 2024:

रोटी, कपडा, मकान देणारं मोदी सरकारचा अर्थसंकल्प आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. ते म्हणाले आहेत की, आज कौशल्य विकास सुरु करण्यात आलं आहे. आशा सेविकांसाठी यांना योजना आणली. कोणतीही दरवाढ न करता पायाभूत सुविधांसाठी ११ हजार कोटी अर्थसंकल्पात आहे. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी संसदेत मांडलेल्या अर्थसंकल्पावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना आपली प्रतिक्रिया दिली आहे.

शिंदे म्हणाले, आम्ही ३ कॉरिडॉर उभे करत आहेत. रस्ते त्याचबरोबर रेल्वेची कनेक्टिविटी मोठ्या प्रमाणावर मजबूत कशी होईल, यावर भर दिला जात आहे. ५ ट्रिलयन डाॅलरचं मोदींचं टार्गेट आहे. या विकासकामांमुळे त्याला गती येईल. . ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CM Eknath Shinde On Budget 2024
Budget 2024: सूर्योदय योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अर्थसंकल्पात मोठी घोषणा, देशभरात 300 युनिट वीज मिळणार मोफत

ते पुढे म्हणाले, ''हा सर्व समावेशक अर्थसंकल्प असून विकसित भारत या ध्येयाकडे वाटचाल करणारा हा अर्थसंकसल्प आहे.'' शिंदे म्हणाले, विरोधकांच्या योजना कागदावर होत्या त्या आम्ही प्रत्यक्षात आणल्या. ८० कोटी लोकांना मदत केली. विरोधकांना आरोप करण्याशिवाय काही राहिलं नाही.  (Latest Marathi News)

मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले, इंडिया आघाडीकडे १ नेता उरला नाही. त्यांचा सुपडा साफ झाला आहे. अबकी बार ४०० पार ही गॅरेंटी जनतेने घेतली आहे. घरी बसणाऱ्यांना लोकं घरीच बसवतात, काम करणाऱ्यांना पून्हा निवडून आणतात, असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे याना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.

CM Eknath Shinde On Budget 2024
Budget 2024 : निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प, माजी अर्थमंत्र्यांची टीका

देशाचे भविष्य घडवणारा हा अर्थसंकल्प : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंतरिम अर्थसंकल्प सर्वसमावेशक आणि नाविन्यपूर्ण असल्याचे म्हटले आहे. तसेच हा अर्थसंकल्प विकसित भारताच्या युवक, गरीब, महिला, शेतकरी या चार स्तंभांना बळ देईल. त्यांनी याला देशाचे भविष्य घडवणारा अर्थसंकल्प म्हटले आहे. हा अर्थसंकल्प भारताला २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र बनवण्याची हमी देतो, असंही ते म्हणाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com