Budget 2024 : निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला अर्थसंकल्प, माजी अर्थमंत्र्यांची टीका

Jayant Patil on Budget 2024 : जयंत पाटील म्हणाले आहेत की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे.
Nirmala Sitharaman
Nirmala SitharamanSaam Tv
Published On

Mumbai News :

मोदी सरकारच्या (Modi Government) दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी मांडला. अंतरिम अर्थसंकल्प असल्यांने यात फार मोठ्या घोषणा करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे विरोधकही या अर्थसंकल्पावर (Budget 2024) टीका करत आहेत. राज्याचे अर्थमंत्री जयंत पाटील यांनी देखील आजच्या अर्थसंकल्पावर सडकून टीका केली आहे.

निराशाजनक, नकारात्मक आणि नाविन्य नसलेला हा अर्थसंकल्प आहे, अशी जोरदार टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज सादर झालेल्या अर्थसंकल्पावर केली आहे. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Nirmala Sitharaman
Budget 2024 News: ४० हजार रेल्वे डबे 'वंदे भारत'ला जोडले जाणार; रेल्वेप्रवाशांसाठी अर्थसंकल्पात कोणती मोठी घोषणा? जाणून घ्या

जयंत पाटील म्हणाले आहेत की, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेले अंतरिम बजेट ही निव्वळ धूळफेक आहे. देशातील बेरोजगारी आणि महागाई कमी करण्यासाठी कोणतीही उपाययोजना या अर्थसंकल्पात नाही. या बजेट मध्ये देशातील दलित आणि आदिवासींसाठी नक्की काय आहे असा प्रश्न मला पडतो, असंही जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. (Latest Budget Update)

पुढे बोलताना ते म्हणाले की, या अर्थसंकल्पात सर्वाधिक वेळा पंतप्रधानांचा उल्लेख केला गेला. प्राप्तिकर स्लॅबमध्ये देखील कोणतेही बदल या अर्थसंकल्पात केले गेलेले नाहीत. देशाच्या अर्थव्यवस्थेची खरी परिस्थिती समोर येऊ नये म्हणूनच बहुधा यावर्षी पहिल्यांदाच देशाचा आर्थिक पाहणी अहवाल मांडला गेलेला नाही असाही टोला जयंत पाटील यांनी सरकारला लगावला.

Nirmala Sitharaman
Income Tax Slab 2024: करदात्यांना दिलासा नाही; टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल नाही, काय आहे कारण?

अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे

(Budget 2024 Key Highlights)

  • PM kisan Yojana चा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा

  • आयुषमान भारत योजना सर्व आशासेविकांना लागू

  • पुढची पाच वर्षे विकासाची असतील

  • नवीन मेडिकल कॉलेज उभारणार

  • ९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय

  • १ कोटी महिलांना लखपती दीदी केलं

  • लखपती दीदी योजनेतून आत्मनिर्भर केलं

  • आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुषमान भारत योजना लागू

  • धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणार

  • पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन

  • राज्यांना व्याजमुक्त कर्ज देणार

  • ७५ हजार कोटींचे व्याजमुक्त कर्ज

  • इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com