Budget 2024 News: ४० हजार रेल्वे डबे 'वंदे भारत'ला जोडले जाणार; रेल्वेप्रवाशांसाठी अर्थसंकल्पात कोणती मोठी घोषणा? जाणून घ्या

Budget 2024 Update News: वंदे भारत रेल्वे योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. अंतरिम अर्थसंकल्पात 40 हजार रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली.
Budget 2024 News
Budget 2024 NewsSaam Digital
Published On

Budget 2024 Update

वंदे भारत रेल्वे योजना मोदी सरकारची महत्त्वाकांक्षी योजना आहे. देशभरात या ट्रेनचं जाळं तयार करून रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा देण्याचा सरकारचा मानस आहे. त्याच पार्श्वभूमीवर आजच्या अंतरिम अर्थसंकल्पात तीन रेल्वे कॉरिडॉर सुरू करण्याच्यासोबत 40 हजार सामान्य रेल्वे डबे वंदे भारतमध्ये रूपांतरित केले जाणार असल्याची घोषणा करण्यात आली. पॅसेंजर गाड्यांचे कामकाज सुधारले जाईल. पंतप्रधान गती-शक्ती योजनेंतर्गत कामांना गती दिली जाईल. मालवाहतूक प्रकल्पही विकसित केला जाणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं.

तीन मुख्य कॉरि़डॉरमध्ये ऊर्जा, खनिज आणि सिमेंट कॉरिडॉर, पोर्ट कनेक्टिविटी कॉरिडॉर आणि हाय ट्रॅफिक डेन्सिटी कॉरिडॉरचा समावेश आहे. पीएम गतीशक्ती योजनेंतर्गत या कॉरिडॉरना चालना मिळणार आहे. याव्यतिरिक्त वेगवान आणि सुरक्षित रेल्वे प्रवास सुनिश्चित करण्यासाठी हाय ट्रॅफीक डेन्सिटी कॉरिडॉर मदत करणार आहे.

Budget 2024 News
Budget 2024 Update: 7 IIT,16 IIIT, 15 AIIMS आणि 390 विद्यापीठ; अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी काय दिलं?

आधुनिक भारताची वेगवान ओळख म्हणून वंदे भारत ट्रेनकडे पाहण्यात येते आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. देशात वेगवान आणि सुरक्षित दळणवळणासाठी केंद्र सरकार सर्वच स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात रस्ते जोडणीच्या प्रकल्प वेगाने पुढे सरकत आहे. आता वंदे भारत ट्रेन प्रकल्प लवकरच विस्तारणार आहे.

Budget 2024 News
Budget 2024 News: अर्थसंकल्पातील पहिली मोठी घोषणा, नागरिकांचं परवडणाऱ्या घरांचं स्वप्न पूर्ण होणार

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com