अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सहावा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. अंतरिम अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा करण्यात आल्या. अर्थसंकल्पात टॅक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे करदात्यांना कोणताही दिलासा या बजेटमध्ये मिळालेला नाही.
आज सादर झालेला अर्थसंकल्प हा अंतरिम अर्थसंकल्प आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नवीन सरकार पुन्हा एकदा अर्थसंकल्प मांडेल. त्यावेळी टॅक्स स्लॅबबाबत काही मोठ्या घोषणा होऊ शकतात, असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.
प्रत्येक अर्थसंकल्पात प्राप्तिकरात सूट मिळण्याबाबत अपेक्षा व्यक्त केल्या जातात, यावेळीही लोकांना आशा होती. मात्र सरकारने अंतरिम अर्थसंकल्पात टक्स स्लॅबमध्ये कोणताही बदल केलेला नाही. (Latest Budget Update)
निर्मला सीतारामन यांच्या घोषणेनुसार, ७ लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही कर नाही. पाच वर्षांत करदात्याच्या सेवांमध्ये सुधारणा झाली आहे. अंदाजानुसार, राज्याची वित्तीय तूट जीडीपीच्या ५.८ टक्के आहे, असंही अर्थमंत्री यांनी सांगितलं. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
0 ते 3 लाख रुपयांवर 0 टक्के कर
3 ते 6 लाखांवर 5 टक्के कर
6 ते 9 लाखांवर 10 टक्के कर
9 ते 12 लाखांवर 15 टक्के कर
12 ते 15 लाख 20 टक्के कर
15 लाख पेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर
2.5 लाखांपर्यंत 0 टक्के कर
2.5 लाख ते 5 लाखांवर 5 टक्के कर
5 लाख ते 10 लाखांवर 20 टक्के कर
10 लाखांपेक्षा जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर
(Budget 2024 Key Highlights)
PM kisan Yojana चा 38 लाख शेतकऱ्यांना फायदा
आयुषमान भारत योजना सर्व आशासेविकांना लागू
पुढची पाच वर्षे विकासाची असतील
नवीन मेडिकल कॉलेज उभारणार
९ कोटी महिलांच्या आयुष्यात बदल झालाय
१ कोटी महिलांना लखपती दीदी केलं
लखपती दीदी योजनेतून आत्मनिर्भर केलं
आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांना आयुषमान भारत योजना लागू
धार्मिक पर्यटनाला प्रोत्साहन देणार
पर्यटन क्षेत्रात विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन
राज्यांना व्याजमुक्त कर्ज देणार
७५ हजार कोटींचे व्याजमुक्त कर्ज
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देणार
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.