पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमानंतर दिल्लीत परतताच प्रधानमंत्री सूर्योदय योजनेचा शुभारंभ केला होता. ही योजना जनतेच्या घरांच्या छतांवर सौर पटल लावण्याच्या हेतूने आखण्यात आली आहे. त्याचबरोबर त्यातून तयार होणारी वीजही लोकांना वापरता येणार असून वीज बिलात बचत होणार आहे. यातच आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी याचबद्दल अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. याचबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊ...
अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी 2024 च्या अर्थसंकल्पात घोषणा केली आहे की, प्रधानमंत्री सूर्योदय योजनेअंतर्गत 1 कोटी घरांच्या छतावर सौर ऊर्जा पॅनेल बसवण्यात येतील. तसेच या 1 कोटी घरांना 300 युनिट मोफत वीज दिली जाणार आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
या योजनेच्या पात्रतेबद्दल बोलायचं झालं, तर जे लोक आर्थिक दुर्बल वर्ग आणि मध्यमवर्गातून येतात त्यांना या योजनेचा लाभ घेता येईल. तसेच ज्यांचे वार्षिक उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, ते देखील या योजनेसाठी अर्ज करू शकतात. (Latest Marathi News)
जर तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला या योजनेसाठी पात्र मानले जाणार नाही. याशिवाय तुमचे उत्पन्न 1 किंवा 1.5 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही करदाते असाल तर, तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही.
दरम्यान, तुम्हालाही प्रधानमंत्री सूर्योदय योजनेत सामील व्हायचे असेल, तर त्यासाठी तुम्हाला solarrooftop.gov.in या अधिकृत पोर्टलवर जावे लागेल. तेथून पुढील प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.