LPG Shortage: पुण्यातील हॉटेलचा अजब कारभार! जेवणाच्या बिलात लावले चक्क 'गॅस चार्जेस'; ग्राहकाचा संताप

Pune LPG Shortage: पुण्यातील वानवडी परिसरातील एका हॉटेलमध्ये धक्कादायक घटना घडली आहे. एका हॉटेलमध्ये ग्राहकांकडून अतिरिक्त गॅस चार्जेस आकारले जात आहे. याबाबत एका ग्राहकाने पोस्ट केलीये.
LPG Shortage
LPG ShortageSaam Tv
Published On
Summary

पुण्यातील वानवडी येथील हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार

हॉटेलमालकांकडून अतिरिक्त गॅस चार्जेस वसूल

ग्राहकांची लूट होतेय

देशात सध्या इंधनाचा तुटवडा आहे. त्यामुळे एलपीजी गॅस वेळेत मिळत नाहीये. त्यामुळे हॉटेलचालकांवर याचा वाईट परिणाम झाला आहे. अनेक हॉटेलमालकांनी हॉटेल्स बंद केले आहेत. दरम्यान, अशातच आता जे हॉटेल्स सुरु आहे ते ग्राहकांकडून गॅस चार्जेस घेताना दिसत आहे. पुण्यातील एका हॉटेलमध्ये हा प्रकार घडला आहे.

LPG Shortage
LPG cylinder shortage: गॅस सिलिंडर संपला, कामगारांनी देसी जुगाड करत बनवलं जेवण; VIDEO व्हायरल

पुण्यातील वानवडी येथील ग्रीन संपन्न हॉटेलमध्ये ग्राहकांकडून अतिरिक्त पैसे उकळल्याची घटना घडली आहे. अतिरिक्त गॅस चार्जेस लावल्याचा आरोप एका ग्राहकाने केला आहे. या ग्राहकाच्या मुख्य बिलासोबत आणखी एक बिल आहे. त्यामध्ये अतिरिक्त 'गॅस चार्जेस' दाखवल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत ग्राहक जगताप यांनी एक सोशल मिडिया पोस्ट केली आहे.

ग्राहकाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की, वानवडी भागातील एका हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो. तिथे १११० रुपयांच्या बिलासोबत १०० रुपयांचा अतिरिक्त "गॅस चार्जेस" लावलेले पाहून आश्चर्य वाटलं. वेटरला याबाबत विचारले तर त्याने सांगितले की, गॅस मिळत नसल्याने ब्लॅकने घ्यावे लागतात. त्यामुळे हा अतिरिक्त चार्ज ग्राहकांकडून गेतला जात आहे. दरम्यान, गॅसचा तुववडा नसल्याचं सांगितलं जात आहे तरीही हॉटेलवाल्यांना गॅस का मिळत नाही. जर खरंच तुटवडा असेल तर हॉटेल्स बंद का नाहीत, असा प्रश्न पडला आहे. ग्राहकांवरच भुर्दंड टाकला जातोय, याला जबाबदार कोणस तसेच सरकारचे यावर काहीच म्हणणे नाही का, असा प्रश्न पडला. शेवटी तोही एक व्यावसायिक आहे आणि सरकार मदत करत नसेल तर आपण तरी त्याला मदत करू, असा विचार करून मी बिल भरलं आहे, असं त्या ग्राहकाने सांगितले.

LPG Shortage
LPG Shortage : धक्कादायक! जालन्यामध्ये ११० सिलिंडरची चोरी, एजन्सीचे गोडाऊन फोडून चोरट्यांनी डाव साधला

सध्या अनेक हॉटेल्स बंद आहेत. परंतु हॉटेलमालकांकडून हा अतिरिक्त चार्ज लागत असल्याने ग्राहकांच्या खिशाला मात्र फटका बसत आहे. ग्राहकांना गॅस चार्जेस म्हणून अतिरिक्त पैसे द्यावे लागत आहेत, यामुळे ग्राहकांनी संताप व्यक्त केला आहे.

LPG Shortage
Mumbai-Pune Expressway Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेसवर भयंकर अपघात, ५ गाड्या एकमेकांवर आदळल्या, ३ जणांचा जागीच मृत्यू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com