Ekvira Devi Temple: एकवीरा देवी गडावर राडा, २ गटात तुंबळ हाणामारी अन् दगडफेक; १५ भाविक जखमी, VIDEO व्हायरल

Ekvira Devi Temple Rada: लोणावळ्याजवळील एकवीरा देवी गडावर भाविकांच्या दोन गटात तुफान राडा झाला. दोन्ही गटाने एकमेकांना मारहाण करत दगडफेक केली. या घटनेत १५ जण जखमी झाले. याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
Ekvira Devi Temple: एकवीरा देवी गडावर राडा, २ गटात तुंबळ हाणामारी अन् दगडफेक; १५ भाविक जखमी, VIDEO व्हायरल
Ekvira Devi Temple RadaSaam TRv
Published On

Summary -

  • एकवीरा देवी गडावर दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी

  • दगडफेकीत १५ भाविक जखमी

  • पालखीच्या वादातून घटना घडली

  • पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली

दिलीप कांबळे, मावळ

एकवीरा देवी गडावर चैत्र पौर्णिमेनंतर दोन गटांत तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. एकवीरा देवी गडावर दर्शनासाठी आलेल्या भक्तांचे दोन गट आमनेसामने आले. लाथाबुक्क्या आणि दगडाने एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या मुळे गडावर तणावाचे वातावरण होते. या हाणामारीमध्ये १५ जण जखमी झाले आहेत. काहींचे पाय तर काहींचे हात फॅक्चर झाले आहेत. या हाणामारीचा व्हिडीओ समोर आला आहे.

चैत्र पौर्णिमेनिमित्त लोणावळ्यातल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी गडावर मोठ्या उत्साहात यात्रा पार पडली. या यात्रेसाठी राज्यभरातून तसेच मुंबई रत्नागिरी, पनवेल, भिवंडी आणि ठाणे येथून असंख्य पालख्या गडावर दाखल झाल्या होत्या. त्यातच पालखी पुढे नेण्याच्या कारणावरून रात्री उशिरा पनवेल कोळीवाडा आणि कल्याण कोळीवाडा येथील दोन गटांमध्ये वाद झाला. या वादानंतर दगडफेक करण्यात आली. पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थितीवर नियंत्रण मिळविले.

Ekvira Devi Temple: एकवीरा देवी गडावर राडा, २ गटात तुंबळ हाणामारी अन् दगडफेक; १५ भाविक जखमी, VIDEO व्हायरल
Lonavala Places : फ्रेंड्ससोबत फिरायला जाताय? मग या ठिकाणी नक्कीच जा

दुसऱ्या दिवशी या वादाचे पुनर्वसन तुंबळ हाणामारीत आणि दगडफेकीत झाले. सलग दोन दिवस सुरू असलेल्या या घटनेत सुमारे १५ जण जखमी झाले असून त्यांना खासगी रुग्णालयात औषध उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. अचानक झालेल्या या प्रकारामुळे गड परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दरम्यान, या घटनेदरम्यान करण्यात आलेल्या दगडफेकीत स्थानिक दुकानदार आणि रिक्षाचालकांचेही नुकसान झाले आहे. काही ठिकाणी दुकानं बंद ठेवावी लागली. वीजपुरवठाही काही काळ खंडित झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर झाली होती.

Ekvira Devi Temple: एकवीरा देवी गडावर राडा, २ गटात तुंबळ हाणामारी अन् दगडफेक; १५ भाविक जखमी, VIDEO व्हायरल
Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू

महत्त्वाचे म्हणजे, या घटनेचा मंदिरातील धार्मिक विधी किंवा यात्रेशी कोणताही थेट संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. काही अफवा पसरवल्या जात असल्याने प्रशासनाने नागरिकांना त्यावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन मंदिर ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली असून संबंधित प्रकरणाविषयी गुन्हा दाखल करण्यात येत आहे. सध्या परिसरात शांतता असून भाविकांनी निस्संकोचपणे दर्शनासाठी यावे, सर्व व्यवस्था सुरळीत सुरू असल्याचे प्रशासनाने सांगितले आहे.

Ekvira Devi Temple: एकवीरा देवी गडावर राडा, २ गटात तुंबळ हाणामारी अन् दगडफेक; १५ भाविक जखमी, VIDEO व्हायरल
Lonavala Tourism : लोणावळ्याजवळ वसलंय 'हे' प्राचीन शिल्पकलेचा अद्भुत वारसा जपणारे ठिकाण

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com