Shreya Maskar
कार्ला लेणी महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात, लोणावळ्याजवळ मळवली येथे आहेत. कार्ला लेणी हा 16 प्राचीन बौद्ध गुहांचा समूह आहे.
असे बोले जाते की, कार्ला लेणी इ.स.पूर्व दुसऱ्या शतकापासून ते इ.स. पाचव्या शतकादरम्यान कोरल्या गेल्या आहेत, ज्यामध्ये सर्वात जुन्या गुंफा इ.स.पूर्व १६० च्या आसपासच्या आहेत
कार्ला लेणी भारतीय प्राचीन दगडी वास्तुकला आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. यात प्राचीन भारतातील कलात्मक कौशल्य, अध्यात्मिक भक्ती आणि व्यापार मार्गांचा प्रभाव दर्शवितात.
कार्ले लेणीमध्ये भव्य प्रवेशद्वार, सिंहस्तंभ, विविध मिथुन शिल्पे, बुद्ध आणि बोधिसत्वांच्या प्रतिमा आणि भिंतींवर बुद्ध जीवनावरील चित्रे आढळतात.सातवाहन काळातील बौद्ध कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.
कार्ला लेणी येथे तुम्हाला चैत्यगृह, विहार पाहायला मिळेल. याची भव्यता आणि पावित्र्य खूपच खास आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे नक्की भेट द्या.
कार्ला लेणी, भाजे लेणी आणि बेडसे लेणी ही तिन्ही ठिकाणे लोणावळ्याजवळील मावळ प्रदेशात अगदी जवळ आहेत आणि ती प्राचीन बौद्ध रॉक-कट लेणींचा एक महत्त्वाचा समूह आहे.
कार्ला लेणी महाराष्ट्राच्या समृद्ध ऐतिहासिक आणि कलात्मक वारशाचे प्रतिक आहेत. जिथे आजही शांतता आणि प्राचीन कलेचा अनुभव घेता येतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.