Shreya Maskar
प्रबळगड किल्ला रायगड जिल्ह्यात आहे, जो पनवेलजवळ माथेरान आणि मुंबई-पुणे हमरस्त्याच्या मध्ये वसलेला आहे.
प्रबळगड किल्ल्याला मुरंजन गड, प्रधानगड असेही म्हणतात. किल्ल्याच्या शेजारील कलावंतीण सुळक्यासाठी प्रसिद्ध आहे. ही दोन्ही ठिकाणे ट्रेकर्ससाठी लोकप्रिय आहेत.
प्रबळगड एक महत्त्वाचा आणि ऐतिहासिक गिरीदुर्ग आहे. जो सह्याद्रीच्या रांगेत आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.
प्रबळगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकल्यानंतर त्याचे नाव बदलले आणि तो मराठा स्वराज्याचा भाग बनला.
प्रबळगड किल्ल्यावर गेल्यावर उल्हास नदी, पाताळगंगा नदी, माणिकगड, कर्नाळा किल्ला आणि इर्शाळगड यांसारखे विहंगम आणि निसर्गरम्य देखावे दिसतात.
पनवेल स्टेशनला उतरून रिक्षा किंवा बसने प्रबळगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या ठाकूरवाडी गावात जाऊ शकता, जिथून किल्ल्यावर चढाई सुरू होते.
प्रबळगड किल्ल्याच्या परिसरातून कोकण प्रदेशावर नजर ठेवण्यात येते. तसेच तुम्ही येथे कॅम्पिंगचा देखील आनंद घेऊ शकता.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.