Shreya Maskar
अलिबागला गेल्यावर तुम्हाला बोटिंग, घोडेस्वारीचा आनंद घेतो येतो. तसेच तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट देखील करू शकता. तसेच येथे अनेक अनेक ऐतिहासिक ठिकाणे आहेत.
कुलाबा किल्ला हा अलिबाग जवळील अरबी समुद्रात वसलेला एक ऐतिहासिक सागरी किल्ला आहे. अलिबागला गेल्यावर या ठिकाणाला आवर्जून भेट द्या.
कुलाबा किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधला होता. या किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
कुलाबा किल्ला भरती असताना पाण्याने वेढलेला जलदुर्ग असतो, पण ओहोटी वेळेस अलिबागच्या किनाऱ्यावरून समुद्रात चालत जाऊन पोहोचता येते.
कुलाबा किल्ला समुद्राच्या मधोमध असूनही त्यात गोड्या पाण्याची विहिरी आणि तळी आहेत, जी पावसाचे पाणी साठवून ठेवतात.ज्यामुळे किल्ल्यावरील रहिवाशांना पिण्याचे पाणी उपलब्ध होते.
कुलाबा किल्ल्यावर दोन जुन्या ब्रिटिशकालीन तोफा आहेत, ज्या किल्ल्याच्या पश्चिमेकडील बुरुजावर ठेवलेल्या आहेत.
कुलाबा किल्ल्यात अनेक मंदिरे आहेत, ज्यात मुख्यत्वे सिद्धिविनायक गणपतीचे मंदिर, हनुमान मंदिर, भवानी देवीचे मंदिर, पद्मावती देवीचे मंदिर आणि इतर काही लहान मंदिरांचा समावेश आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.