Shreya Maskar
पुणे-मुंबई महामार्गावरील कामशेतजवळ टाकवे तलाव हे सुंदर लोकेशन आहे. वन डे पिकनिकसाठी येथे आवर्जून जा.
टाकवे तलाव बोटिंग, कयाकिंग आणि कॅम्पिंगसाठी खूप लोकप्रिय आहे. मित्रमंडळींसोबत येथे तुफान मजा-मस्ती करता येते.
टाकवे तलावाला गेल्यावर खाण्यापिण्याची-राहण्याची उत्तम सोय आहे. सुट्ट्यांमध्ये आउटिंगचे हे उत्तम ठिकाण आहे.
टाकवे तलाव मोरणा धरण आणि शिवणी तलावाच्या आसपास आहे. पावसाळ्यात आणि हिवाळ्यात येथे थंड वातावरण अनुभवता येते.
टाकवे तलावाकाठी तुम्ही भन्नाट फोटोशूट करू शकता. तसेच येथे हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण अनुभवता येते.
टाकवे तलावाजवळ काही अंतरावर लोणावळा, पवना धरण, शिवनेरी किल्ला, सिंहगड किल्ला, कोरीगड किल्ला आणि तिकोना किल्ला ही पर्यटन स्थळे आहेत.
टाकवे तलावावरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. हे ठिकाण गर्दीपासून दूर निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी खूप छान आहे.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.