Shreya Maskar
नवीन वर्ष काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. नवीन वर्षातील पहिला वीकेंडला मस्त पिकनिक प्लान करा. तुम्ही मुंबईजवळील कोंडेश्वर धबधब्याला भेट द्या.
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळ कोंडेश्वर धबधबा वसलेला आहे. हे महाराष्ट्रातील एक लोकप्रिय पावसाळी आणि हिवाळी पिकनिक स्पॉट आहे.
कोंडेश्वर धबधबा हिरवीगार वनराईमध्ये वसलेला आहे. धबधब्याच्या पायथ्याशी प्राचीन शिव मंदिर आहे. वन डे ट्रिपसाठी हे लोकेशन सर्वात बेस्ट आहे.
कोंडेश्वर धबधब्याजवळ भोज धरण आहे. बारवी धरण उल्हास नदीच्या उपनदीवर बांधलेले एक मोठे धरण आहे. येथे निसर्गाचा सुंदर नजारा पाहायला मिळतो.
बदलापूर स्टेशनवरून तुम्ही रिक्षाने कोंडेश्वर धबधब्याला पोहचाल. हे ठिकाण टेकिंगसाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे तुम्ही येथे मित्रांसोबत ट्रेकिंगचा प्लान करू शकता.
कोंडेश्वर धबधब्यापर्यंत तुम्हाला जंगल ट्रेक करत जाता येते. त्यामुळे सकाळी लवकर निघा. जेणेकरून संध्याकाळी काळोख व्हायच्या आधी तुम्ही येऊ शकता.
कोंडेश्वर धबधब्याजवळ गणेश मंदिर, कालिकामाता मंदिर आहे. तसेच येथून निसर्गरम्य पर्वतीय दृश्ये पाहायला मिळतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.