Shreya Maskar
पळशीचा किल्ला अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात आहे. हा ऐतिहासिक भुईकोट किल्ला आहे. तुम्ही येथे गेल्यावर निसर्गाच्या सानिध्यात फोटोशूट करू शकता.
पळशीचा किल्ला होळकरांचे दिवाण रामाजी कांबळे-पळशीकर यांनी बांधला होता. असे बोले जाते. नवीन वर्षात येथे आवर्जून भेट द्या.
पळशीचा किल्ल्यातील सर्वात मोठे आकर्षण म्हणजे पळशीकर वाडा, ज्यात लाकडी कोरीवकामाचा उत्तम नमुना आहे.
पळशीचा किल्ल्याच्या आतमध्ये विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, महादेव मंदिर, नागेश्वर मंदिर आणि मालवीर मंदिर आहे. जी हेमाडपंती शैलीत बांधलेली आहेत.
पळशी किल्ल्याला मजबूत दगडी तटबंदी आहे आणि त्याच्या दरवाज्यांवर, विशेषतः उत्तर दरवाज्यावर शिलालेख कोरलेले आहेत
किल्ल्याच्या परिसरात आणि मंदिरांजवळ प्राचीन वीरगळ (हेरो स्टोन्स) पाहायला मिळतात. जे शौर्य आणि इतिहासाची साक्ष देतात.
पळशीचा किल्ला ट्रेकिंगसाठी चांगला पर्याय आहे, विशेषतः तो सोपा असल्यामुळे नवीन ट्रेकर्स आणि कुटुंबासाठी उत्तम आहे. त्यामुळे येथे वन डे पिकनिकसाठी नक्की जा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.