Viral Video: दे दनादन! पेट्रोल भरण्यावरून दोन गटात तुफान हाणामारी; सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

देशात पेट्रोल-डिझेल टंचाईच्या चर्चेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उत्तरप्रदेशमधील एका पेट्रोल पंपावर रांगेतून वाद सुरू होऊन त्याचे हाणामारीत रूपांतर झाल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
petrol pump fight
petrol pump fightsaam tv
Published On

गेल्या काही दिवसांपासून देशात पेट्रोल-डिझेलची टंचाई होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे लोकांनी पेट्रोल पंपवर लांब रांगा लावल्या होत्या. सध्या सोशल मीडियावर उत्तरप्रदेशमधील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.

पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर ‘मी आधी पेट्रोल भरणार’ या कारणावरून दोन गटांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या मारामारीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

petrol pump fight
Angry Bull Attack: १,२ नव्हे ३ वेळा, रस्त्यावरच ट्रॅक्टरला जोरात बैलाने धडक दिली, ट्रक्टरचा चेंदामेंदा झाला, थरारक व्हिडिओ

सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एका पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झालेली दिसते. पेट्रोल भरण्यासाठी लोक रांगेत उभे असताना अचानक दोन जणांमध्ये वाद निर्माण झाल. सुरुवातीला शाब्दिक वाद झाला मात्र काही क्षणांतच त्याचं रूपांतर हाणामारीत झाल्याचं दिसून येतं

व्हिडिओमध्ये काही लोक एकमेकांना मारहाण करताना, धक्काबुक्की करताना दिसतात. यामुळे पेट्रोल पंपवर गोंधळ उडाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. या गोंधळामुळे काही काळासाठी पेट्रोल पंपावरील सेवा ठप्प झाली होती.

petrol pump fight
Viral trending news: एक खिडकी उघडी ठेऊन केली मोठी चूक; तीन वर्षांनी घरी परतला आणि पाहिलं तर...

सोशल मीडियावरील विविध कमेंट्स

हा व्हिडिओ विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. नेकांनी या घटनेवर नाराजी व्यक्त केली असून, 'अशा परिस्थितीत संयम राखणं आवश्यक आहे' अशी कमेंट केली आहे. काही युजर्सने सरकारवर टीका करत इंधन पुरवठा सुरळीत ठेवण्याची मागणी केलीये.

petrol pump fight
Social media viral: रेल्वे स्टेशनवर खोटा साप घेऊन फिरला तरुण, प्रवाशांची उडाली धांदल; VIDEO होतोय व्हायरल

(डिस्क्लेमर- हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये किती तथ्य आहे याची खातरजमा आम्ही करत नाही.)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com