ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लोणावळा हे महाराष्ट्रातील एक सुंदर असे हिल स्टेशन आहे जे प्राकृतिक सुंदरतेने भरलेले आहे.
हे तलाव शांत आणि आरामदायी क्षणांसाठी एक आदर्श ठिकाण आहे. येथे जाऊन शांत ठिकाणी बसण्याचा आनंद घेता येतो.
टायगर पॉइंट ला टायगर्स लीप म्हणून ओळखले जाते. हि खडकाळ खिंड निसर्गप्रेमींसाठी एक रोमांचक ठिकाण आहे.
पावसाळ्यात येथील पाणी आणि हिरवळ मनाला मोहून टाकते. भुशी डॅमच्या पायऱ्यांवरून वाहणारे पाणी बघण्याचा नजारा काही वेगळाच असतो.
इतिहासप्रेमींसाठी भेट देण्याचे ठिकाण म्हणजे कार्ला लेणी. या प्राचीन बौद्ध लेणी त्यांच्या स्थापत्यकलेसाठी ओळखल्या जातात.
पवना लेक हा लोणावळामधील कृत्रिम तलाव आहे. या ठिकाणी थंडीत कॅम्पिंग केली जाते. सनसेट, बोटिंग या गोष्टींची मज्जा घेता येते.
लोणावळ्यातील मॅप्रो गार्डन हे पर्यटकांकरिता एक आकर्षण आहे. येथे फ्रेश आइस्क्रीम मिळते तसेच तुम्ही इतर गोष्टीही खरेदी करू शकता.