Vrindavan : वृंदावनला जाताय? मग या ७ ठिकाणी नक्कीच भेट द्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

वृंदावन

वृंदावन हे उत्तर प्रदेशातील मथुरा शहरापासून १६ किमी अंतरावर वसलेले आहे. याचे नाव वृंदा आणि वन या दोन शब्दांपासून बनले आहे.

Vrindavan | GOOGLE

राधा कृष्ण नगरी

वृंदावनला राधा कृष्ण नगरीच्या नावाने सुध्दा ओळखले जाते. भगवान श्रीकृष्णांचे बालपण या नगरीतच गेले आहे.

Vrindavan | GOOGLE

फिरण्याची ठिकाणे

वृंदावन जात असाल तर, येथे फिरण्यालायक अनेक ठिकाणे आहेत. तुम्ही १ दिवसाच्या ट्रिपमध्येसुध्दा ठिकाणांना भेट देऊन फिरु शकता.

Vrindavan | GOOGLE

प्रेम मंदिर

वृंदावनातील सुंदर प्रेम मंदिर हे भगवान कृष्ण आणि राधा यांच्यातील प्रेमाचे प्रतीक मानले जाते. तुम्हाला त्यांच्या अनेक सुंदर मूर्ती येथे बघायला मिळतील.

Vrindavan | GOOGLE

व्दारकाधीश मंदिर

श्रीकृष्णांच्या एका भक्ताने व्दारकाधीश हे मंदिर बांधले होते. श्रावणात येथे झुले बांधले जातात आणि जन्माष्टमीपर्यंत सजवले जातात.

Vrindavan | GOOGLE

बांके बिहारी मंदिर

बांके बिहारी मंदिर एकदा तरी जरूर बघण्यास जावे. या मंदिराचा सुंदर नकाशा बघण्यासारखा आहे.

Vrindavan | GOOGLE

गोवर्धन पहाड

भगवान श्रीकृष्णाने पाण्यापासून वाचण्यासाठी गोवर्धन टेकडी बोटावर उचलली होती. या गोवर्धन टेकडीला नक्की भेट द्या.

Vrindavan | GOOGLE

कुसूम तलाव

कुसुम सरोवर गोवर्धन टेकडीपासून २ किमी अंतरावर आहे. भव्य वाळूच्या दगडापासून बनलेला हा सुंदर तलाव आकर्षणाचे केंद्र आहे.

Vrindavan | GOOGLE

केसी घाट

केसी घाट हे वृंदावनातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांपैकी एक आहे. येथेच भगवान श्रीकृष्णाने केसी राक्षसाचा वध केला होता.

Vrindavan | GOOGLE

यमुना नदी

वृंदावन हे यमुना नदीच्या काठावर वसलेले आहे आणि येथे भगवान श्रीकृष्णाने अनेक दिव्य कृत्ये केली आहेत. म्हणूनच, लोक येथे देखील भेट देतात.

Vrindavan | GOOGLE

India Religious Places : भारतातील या 7 पवित्र धार्मिक स्थळांना एकदा नक्की भेट द्या

Dharmik Sthale | GOOGLE
येथे क्लिक करा