ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वाराणसी शहर हे भारतातील सर्वात जुनी आणि पवित्र नगरी मानली जाते. येथे तुम्ही विश्वनाथ मंदिर आमि गंगा आरतीचा भव्य दिव्य असा अनुभव घेता येईल.
काश्मीरमध्ये स्थित असलेले हे मॉं वैष्णो देवीला समर्पित केलेले एक शक्तीपीठ आहे. १३ किलोमीटरच्या ट्रेकनंतर भाविकांना देवीचे दर्शन घेता येते.
अमृतसर हे शीख धर्मातील सर्वात पवित्र स्थळ आहे. जगातील सर्वात मोठे लंगर येथे मिळते. सुवर्ण मंदिरातील तलाव आणि गुरबानी मनाला शांती देतात.
आंध्रप्रदेशमध्ये स्ठित असलेले हे मंदिर जगातील श्रीमंत मंदिरा पैंकी एक आहे. येथे प्रत्येक वर्षी करोडो श्रध्दाळू लोकं भगवान व्येंकटेश्वराच्या दर्शनाकरिता येत असतात.
हरिद्वारमध्ये तुम्ही गंगा स्नान करु शकता. हर की पौडी येथे आरती आणि ऋषिकेशमध्ये योग आणि ध्यान अनुभवू शकता.
ओडिशातील भगवान जगन्नाथाचे भव्य मंदिर, जिथे वार्षिक रथयात्रा भरते. हे समुद्रकिनारी असलेले मंदिर हिंदू धर्माच्या चार पवित्र तीर्थस्थळांपैकी एक आहे.
चारधाममधील दोन प्रमुख तीर्थस्थळे उत्तराखंडमध्ये आहेत. केदारनाथ हे भगवान शिवाचे निवासस्थान आहे, तर बद्रीनाथ हे भगवान विष्णूचे पवित्र मंदिर आहे.