Shreya Maskar
रेवदंडा बीच हा रायगड जिल्ह्याच्या अलिबाग जवळच आहे. त्यामुळे हिवाळ्यात वन डे पिकनिकसाठी हे बेस्ट लोकेशन आहे.
रेवदंडा बीच काळ्या वाळूसाठी, शांत आणि स्वच्छ किनाऱ्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे तुम्ही फॅमिली ट्रिप, मित्रमंडळी सोबत फिरायला येऊ शकता.
रेवदंडा बीचजवळ ऐतिहासिक रेवदंडा किल्ला आहे. हा किल्ला १६ व्या शतकात पोर्तुगीजांनी बांधला होता.
रेवदंडा किल्ल्याला 'फोर्टालेझा दे चौल' म्हणून ओळखले जाते कारण तो पोर्तुगीजांनी बांधलेला किल्ला आहे. किल्ल्याला मोठे ऐतिहासिक महत्त्व आहे.
रेवदंडा बीचवरून सूर्यास्ताचा आणि सूर्योद्याचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. समुद्रकिनारी फोटोशूटसाठी रेवदंडा बीच हे एक उत्तम ठिकाण आहे
रेवदंडा हे समुद्रकिनारी कॅम्पिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे, जिथे अनेक कॅम्पसाईट्स आहेत. येथे रात्री शेकोटीचा आनंद घेता येतो.
रेवदंडा बीचवर अनेक जलक्रीडा होतात. उदा. पोहणे तसेच बीच मुलं क्रिकेट, फुटबॉल खेळताना दिसतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.