Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू

Lonavala Accident: लोणावळ्यात कार आणि डंपरचा भयंकर अपघात झाला. या अपघातामध्ये कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही पर्यटक गोव्यातील होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू
Lonavala Accident Saam Tv
Published On

Summary -

  • लोणावळ्यातील टायगर पॉईंटजवळ भरधाव कारची डंपरला धडक

  • अपघातामध्ये कारचा चक्काचूर

  • गोव्याच्या दोन पर्यटकांचा जागीच मृत्यू.

  • चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने झाला अपघात

दिलीप कांबळे, मावळ

गोव्यावरून लोणावळा येथे फिरण्यासाठी आलेल्या दोन पर्यटकांचा अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला. लोणावळा येथील टायगर पॉईंटजवळ हा भीषण अपघात झालाय भरधाव डंपर आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये कारचा चक्काचूर झाला आणि कारमध्ये असलेल्या दोन्ही पर्यटकांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण होते. पोलिस या अपघाताचा तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, लोणावळ्यातील टायगर पाईंटजवळील रस्त्यावर भीषण अपघात झाला. गोवा येथून काही पर्यटक कारने लोणावळ्यात आले होते. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कारने समोरून येणाऱ्या डंपरला जोरदार धडक दिली. कारचा वेग जात असल्याने धडक एवढी भीषण होती की कारचा चक्काचूर झाला. लोणावळ्यातून सहारा सिटीकडे जाणाऱ्या रस्त्यावर शिवलिंग पॉईंट येथे ही अपघाताची घटना घडली.

Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू
Accident : मध्यरात्री भीषण अपघात, कार थेट ट्रकमध्ये घुसली, ४ डॉक्टरांचा जागेवरच मृत्यू

या अपघातात कारचालक योगेश सुतार (२१ वर्षे) आणि मयूर वेंगुळकर (२४ वर्षे) या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. हे दोन्ही तरुण गोव्याच्या म्हापसा येथील राहणारे होते. या अपघातामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले होते. अतिरक्तस्राव होऊन त्यांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू
Accident : रत्नागिरी- कोल्हापूर महामार्गावर भीषण अपघात, ५० प्रवाशांना घेऊन जाणारी खासगी बस दरीत कोसळली

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन रस्त्यावरून बाजूला करत अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या दोघांचे मृतदेह ताब्यात घेतले. दोन्ही तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलिस निरीक्षक दिनेश तायडे करत आहेत. दोन्ही तरुणांच्या कुटुंबीयांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

Lonavala: लोणावळ्यात भयंकर अपघात! भरधाव कारची डंपरला धडक; गोव्याच्या २ पर्यटकांचा मृत्यू
Accident : अयोध्येला जाताना भीषण अपघात! भाविकांच्या बसला ट्रेलरची धडक, एकाचा मृत्यू तर ३० जखमी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com