Pune police officer: पोलीस अधिकाऱ्यानं उचललं टोकाचं पाऊल, लोणावळ्यातील घटनेने महाराष्ट्र पोलीस दलात खळबळ

Missing police officer found dead: पुणे पोलीस आयुक्ताल्यातील पोलीस उपनिरीक्षक यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. मावळा लोणावळा येथील टायगर पॉईंटवर त्यांनी आत्महत्या केली आहे.
Pune Police
Pune PoliceSaam Tv News
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही

पोलीस दलातून एक मोठी बातमी समोर येत आहे. पुणे पोलीस आयुक्तलयातील पोलीस उपनिरीक्षक यांनी गळफास घेत आत्महत्या केली आहे. मावळा लोणावळा येथील टायगर पॉईंटवर त्यांनी आत्महत्या केली आहे. एका झाडाला गळफास घेत त्यांनी आपलं आयुष्य संपवलं आहे.

तीन दिवसांपासून गुंजाळ गैरहजर होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. मात्र, आज गुंजाळ यांनी आत्महत्या केल्याची माहिती लोणावळा पोलीसांनी दिलीय. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

लोणावळ्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. पुणे पोलीस आयुक्तालयातील पोलीस उपनिरीक्षक यांनी टायगर पॉईंट परिसरातील एका झाडाला गळफास घेत आत्महत्या केली आहे. अण्णा गुंजाळ असे पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. गुंजाळ हे खडकी पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत होते.

Pune Police
Gold Purity Check: सोन्याचे दागिने खरे की बनावट ओळखण्याचा सोपा मार्ग; एक ॲप करेल लाखमोलाचं काम, जाणून घ्या

मात्र, ३ दिवसांपासून ते कर्तव्यावर नव्हते. तसेच त्यांचा संपर्कही होत नव्हता. त्यामुळे गुंजाळ नेमके गेले कुठे असा प्रश्न निर्माण झाला होता. खडकी पोलीस ठाण्यात मिसिंगची तक्रार दाखल करण्यात येणार होती. मात्र, आज त्यांनी गळफास घेत आत्महत्या केल्याचं समोर आल्यानंतर पोलीस दलात मोठी खळबळ उडाली आहे.

Pune Police
MSSC Scheme: फक्त २ वर्षात व्हाल मालामाल! २ महिन्यांत ५ लाख महिलांनी घेतला ' या ' सरकारी योजनेचा लाभ

टायगर पॉइंटवर त्यांची कार सुद्धा आढळलेली आहे. या कारमध्ये एक डायरी आहे. कदाचित या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येमागचं कारण दडलेलं असू शकतं, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस घटनास्थळी पोहचले. खडकी पोलीसही घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनीच आत्महत्येचं पाऊल उचलल्यामुळे पोलीस दलात तसेच परिसरात खळबळ उडाली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com